✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- १९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. 💥 जन्म :- १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत आज संपूर्ण राज्यात मराठी विषयाची होणार पायाभूत चाचणी* ----------------------------------------------------- 2⃣ *स्वातंत्र्य लढ्यात म्यानमारची भूमिका महत्त्वपूर्ण, आपल्या सीमाच नाही तर भावनासुद्धा एकमेकांशी जोडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- परदेश शिष्यवृत्ती प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून मागवली सर्व माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे - जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणा-या 'टाइम्स' या संस्थेने मानांकन केले जाहीर, क्रमवारीत पुणे विद्यापीठ देशात सातव्या क्रमांकावर, तर पारंपरिक विद्यापीठात संयुक्तपणे पटकावलं अव्वल स्थान* ----------------------------------------------------- 5⃣ *अंदमानला बसला भूकंपाचा धक्का, रिष्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा भूकंप.* ----------------------------------------------------- 6⃣ *लंकेत विराटसेना अजिंक्य! कसोटी, वनडेपाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकाही जिंकली* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनिस - स्पेनच्या राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे रशियाच्या आंद्रे रुबलेववर मिळवला विजय, युएस ओपनच्या उपांत्य फेरीत दिली धडक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वाढदिवसाची भेट* आज ती फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. तो एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता........ https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/2NunSTYiidY वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बी.रघुनाथ* भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी.रघुनाथ (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते. बी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले. आपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे......."अपेक्षा"....स्वतःकडुनच ठेवा, समोरच्या कडुन नको !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *बी. रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय होते ?* भगवान रघुनाथ कुळकर्णी 2) *त्यांचा जन्म केंव्हा झाला ?* 15 ऑगस्ट 1913 3) *त्यांनी एकूण किती पुस्तके लिहिली ?* 15 पुस्तके *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्र श्री जाधव, सहशिक्षक, नांदेड 👤 त्र्यंबक स्वामी 👤 सुमीत पेटेकर, करखेली 👤 हणमंत गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अजीर्ण " तळं राखतो तो पाणी चाखत असतो माघं टाकता येईल तेवढे टाकत असतो फुकट मिळत म्हणून कितीही घेतात चाखून अजीर्ण झाले की मग सारे देतात ओकून शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●💧‼ *रामकृष्णहरी* ‼💧●•• 💧💧💧💧💧💧 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याप्रमाणे एखादा मूर्तीकार एखाद्या ओबडधोबड दगडाला आपल्या बुध्दीने आणि कौशल्याने एखाद्या सुंदर कलाकृतीला जन्म देतो आणि सा-यांना पाहण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचप्रमाणे माणसालाही माणूसपण मिळवण्यासाठी किंवा चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे ते संस्कार होण्यासाठी एखाद्या जेष्ठ,अनुभवी,आदर्श कलावंतांच्या किंवा विचारवंतांच्या सान्निध्यात राहून आपल्याला आदर्श माणूसही होता येते त्यासाठी आपल्या मनाचीही तयारी असावी लागते हे निश्चित . * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शाळेच्या पहिल्या दिवशी काय शिकवले आठवत नाही पण जसं कळायला लागले तेव्हा पहिले वाक्य कानी पडलेचे नक्की आठवते, गुरूजी म्हणाले होते, नेहमी खरे बोलावे... नंतर शाळेच्या भिंतीवर ते वाक्य अनेकवेळा वाचले भिंतीच त्या जे लिहाल ते लिहून घेतील मला मात्र कुतूहल वाटत रहीले की गुरूजींनी नेहमी खरे बोलावे हे वाक्य सुरूवातीलाच कसे शिकविले त्यांनी धडा म्हणून शिकविले की धडा मिळण्यासाठी या जगाच्या अंधारात प्रकाश शोधण्यासाठी सोडले हे मात्र अजून समजले नाही खरे बोलावे, या पेक्षा बरे बोलावे असे शिकविले असते तर मी अजून बरेचसे अंतर कापू शकलो असतो आणि मी जगाची भाषा सोडून माझी भाषा बोलू शकलो नसतो तर मी जिवंत राहू शकलो असतो ? अभिजीत पाटील सांगली 9970188661 ©®© ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मानवता* जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्यांच्याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्यूनंतर ते जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना सोन्याचा मुकुट घालण्यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्यांच्या डोक्यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्वात कोणत्याच दृष्टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्याचा मुकुट व त्या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्यांचे बोलून झाल्यावर देवदूत म्हणाला,’’ तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिलेली नव्हती तेव्हा तुम्हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्हणजे अश्रू होते. जे त्यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले व त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वरभक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो म्हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्हणाला,’’ तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला म्हणूनच तुम्हाला ईश्वराचा सोन्याचा मुकुट देण्यात आला आहे.’’ संताना स्वत:ची चुक समजली. ते स्वत:मध्येच मशगुल राहिले. त्यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्पर्य :-* ईश्वर भक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच खरी सेवा आहे.दुःखी लोकांचे दुःख जरी आपल्याला कमी करता आले नाही तरी त्यांना दुःख देण्याचा प्रयत्न करु नाही *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment