✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥ठळक घडामोडी :- १८३३ : शिकागो शहराची स्थापना. 💥जन्म :- १९१९ : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : पावसाळी अधिवेशन संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 11 डिसेंबर 2017 पासून सुरू होणार, विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- शुद्ध खाद्यतेलावरील आयात कर 10 टक्क्यांनी वाढवून 15 टक्क्यांवरून केला 25 टक्के- सीबीईसी* ----------------------------------------------------- 3⃣ *पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, प्रसून जोशी यांची नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- नेपाळचा विकास झाला पाहिजे, आम्ही त्यांच्याशी भागीदारी करतो, तसेच त्यांना साथ देऊ इच्छितो, सबका साथ सबका विकास पूर्ण क्षेत्रासाठी आहे- सुषमा स्वराज* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : चार-पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बेस्ट कर्मचा-यांना या महिन्याचा पगार वेळेत म्हणजे 10 तारखेला मिळाला* ----------------------------------------------------- 6⃣ *15 ऑगस्टला उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये ध्वजारोहण होणार, उत्तरप्रदेशातल्या मदरशा शिक्षा परिषदेचे निर्देश.* ----------------------------------------------------- 7⃣ *यावर्षी ग्रामीण आणि शेती क्षेत्रात 2.93 लाख कोटींची गुंतवणूक केली, ही विक्रमी गुंतवणूक आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मी भारतीय आहे ......!* शाळेत असताना " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञेचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा काही एक संबंध नाही. म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत........ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BDmiERKqz2w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सांगली* सांगली हे शहर दक्षिण महाराष्ट्रात वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वर्तुळाला व्यास किती असतात?* 👉🏼 असंख्य *२) सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?* 👉🏼 ० शून्य *३) ६४चे घनमूळ किती?* 👉🏼 ४ चार *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 व्यंकटराव पाटील जाधव रोषनगावकर 👤 मंगेश राजेश पापनवार, वसमत 👤 रविकुमार येळवीकर, नांदेड 👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " बांड " केलेले उपकार विसरतात माणसं ज्वारीत येतात जशी बांड कणसं बांड म्हणून त्याला टाकून देतात माणसं बांडापेक्षा चांगली जास्त असतात कणसं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.* *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."* ••●🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ धैर्य आणि संयम यांच्या वेलीवर तर सुख दु:खाची पाने आणि फुले उमलतात. त्यात कोमेजणारी फुलं ही दु:खाची असतात.त्यांना ऊन सहन होत नाही.म्हणून कोमेजून जातात.त्याच प्रकारे मानवी जीवनाचे असते.दु:ख सहन होत नाही म्हणून मनाने क्षीण होतात. त्यांचे धैर्य कमकुवत होत जाते.उलट ज्या फुलांमध्ये धैर्य आणि संयम असते ती बहरतात नि फुलतात. ज्यांच्या जीवनात धैर्य आणि संयम असते ती माणसे कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने मन ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि तेच जीवनात फुलणा-या फुलाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता -* 🌹 *वाढदिवसाच्या* *शुभेच्छा* 🌹 आज तूझ्या जन्मदिनी देते सख्या मनापासूनी शुभेच्छा जीव ही ओवाळून टाकेल तूझ्यावर सांग आज तूझी काय आहे ईच्छा... तू असा सदा हसत रहा खळखळत असाच वाहत रहा मनोकामना पूर्ण हो तूझी मनी माझ्या अशी सदिच्छा... हर सुख तूझ्या दारी प्राजक्त बहरो तूझ्या अंगणी मागे तू ना वळून पाहू सुख सारे राहो तूझ्या जीवनी... जीवनातील ध्येय तूझ्या तू असाच गाठीत जा यशाची शिखरे पार करीत स्वप्न तूझी गुंफित जा.... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक, किनवट* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर मनच अशुद्ध तर.....* खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते. त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्याने कबीरांना विनंती केली, 'मला तुम्हाला माझा गुरू करायचे आहे, तुम्ही मला गुरुमंत्र द्या' तेव्हा संत कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितले आधी तू पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो. त्या व्यापाऱ्याला खूप घाई होती. तो तडक धावत गेला आणि त्याने दूध कबीरांना आणून दिले. कबीरांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले, हे दूध या भांड्यात ओत. त्याने ते भांडे घेतले, त्यात प्रचंड घाण साचली होती. त्या व्यापाऱ्याने कबीरांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, बघ जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर, मग मी तुझ्या अशुद्ध मनात राम नावाचा मंत्र कसा देऊ? ' कबीरांनी म्हटलेले वाक्य किती खरे आहे बघा? जर तुमचे मनच शुद्ध नाही तर तुम्ही देवाचे दर्शन घेतले काय, किंवा संत सानिध्यात राहिलात काय, त्याचा काय परिणाम होणार? संतांनीही हेच सांगितले आहे. भलेही तुम्ही पुजा नका करू, परंतु तुम्ही तुमचे आचरण, आणि मन शुद्ध ठेवा. आपण इतरांना एखाद्या कामासाठी दोष देत असतो, पण त्याची त्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे असते. आणि आपण नेमके या उलटच करतो. आपल्या दैनंदिन कामात आपण अनेकांना भेटत असतो, यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलीच भेटते असे नाही, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असून शकतो. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम देणे गरजेचे आहे. बदलायची असतील तर त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांच्या मनातील कटुता कमी करा. कारण कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, खराब भांड्यात ज्या प्रमाणे तुम्ही दूध नाही टाकणार त्या प्रमाणेच एखाद्याचे मन परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही त्याला बदलू नाही शकणार. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment