✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* 💥 घडामोडी : १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना. 💥 जन्म : १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी. १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥मृत्यू : १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूर - नागपूर मध्ये आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम साठी मेडिकल हब होण्याची क्षमता, इंडो यूके इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ मेडिसिटीमुळे मिहानचा चेहरामोहरा बदलेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 695 रूग्ण, लखनऊमध्ये 394 रूग्ण. स्वाइन फ्लूने आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : अंबाजोगाई येथे होणा-या 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *जम्मू आणि काश्मीर - शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सुमेध गवई यांना वीरमरण, शहिद सुमेध गवई यांचे पार्थिव आज रात्री नागपुरात येणार ; उद्या अकोल्यातील गावी रवाना होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडी भूस्खलनमध्ये आतापर्यंत 46 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात यश, सकाळी पुन्हा मदतकार्य पुन्हा सुरु होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरूद्ध पाच वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, रोहीत शर्माकडे उपकर्णधारपद.* ----------------------------------------------------- 7⃣ *पल्लेकल कसोटी : श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांमध्ये संपुष्टात, 352 धावांनी अजूनही पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रेल्वेत प्रवाश्याना होणारा त्रास* रेल्वेचा प्रवास सर्वात सुखकर आणि स्वस्त असल्या मुळे जास्तीत जास्त लोक या मार्गाने प्रवास करताना दिसून येतात. आज संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरले असून अनेक खेडी या रेल्वेने जोडली गेली आहेत. रेल्वेचा प्रवास फक्त नावाला च सुखकारक वाटते. पण येथे सुद्धा अनेक त्रासदायक गोष्टी घडतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/iCJoi1wUm93 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उस्मानाबाद* हे शहर उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ८०,६१२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रिया होत्या. १४% व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. येथील साक्षरता प्रमाण ७४% आहे. ८०% पुरुष तर ६७% स्त्रिया साक्षर आहेत.उस्मानाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे सब कॅम्पस आहे. *इतिहास* उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. (आधार हवा!) शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ✍🏻 *'इमानदारी'हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे.त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) क्रांतिदिन कधी साजरा केला जातो?* 👉🏼 ९ ऑगस्ट *२) "छोडो भारत" हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले होते?* 👉🏼 महात्मा गांधी *3) यादिवशी महात्मा गांधीनी भारतीयांना कोणता मंत्र दिला?* 👉🏼 करेंगे या मरेंगे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गजानन गंगाधरराव रामोड, जारीकोट 👤 राजू टोम्पे 👤 राम दिगांबर होले 👤 सुनील गुडेवार 👤 राहुल तलाठी, पुणे 👤 गजानन पाटील 👤 मुनेश्वर सुतार 👤 गणेश इबितवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "रूची " न आवडणाराला वाटते हे काही धड नाही साखर खाऊ घातली तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय निर्माण होत नाही आवड रूचीहीन कशाला कोण काढील सांगा बरं सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.* *शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो.अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही.असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही.त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे.अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* आज गोकुळात सखी मोद कसा आला, येईल ती गोपी घेई हाती फुलमाला। वसुदेव-देवकीला पुत्र आज झाला, नंद-यशोदेस परि मोद किती झाला। कंस किती दुष्ट कसा मामा म्हणु त्याला, जन्मताच मारितो तो देवकीसुताला। लपुनछपुन आला पहा यमुनेच्या तिरी, वासुदेवा वंदुनी त्या दुहिता नम्र शिरी। ओसरता पाणलोट वसुदेव धाला, यशोदेच्या हाती मग सोपविले त्याला। षड्रिपुसंगे होते जग हे भ्रमात, गीतेचे हो अमृत पाजी बालक ते शांत। उद्धरिण्या जगा त्याने गीता ही ओपिली, जन्माचिया सार्थकाने मती गुंग केली। अजि त्याचा आहे पहा जगी जन्मदिन, नाचु गाऊ चरणी त्या होऊ आता लीन!! @ डॉ श्रीकांत 9850923772 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये संकलक *ना.सा.येवतीकर* व टीमचा तोपर्यंत नमस्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment