*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी*पण जेव्हा नाहीसा होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment