✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक. १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सुनिल अरोरा यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत २३ ठार, १५ जखमी, ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भिती* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची केंद्र सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोने रिजनल नेव्हिगेशन सॅटलाइट IRNSS-1 चे प्रेक्षपण अयशस्वी.* ----------------------------------------------------- 5⃣ *पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली - केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांचा मंत्रिपदाचा राजीनामा.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध श्रीलंका चौथा एकदिवसीय सामना - विराट कोहलीचं शानदार शतक, फक्त 76 चेंडूत ठोकलं दणदणीत शतक, भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा " मला माणूस व्हावेसे वाटते. " https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/mala-manus-vhavese-vatte वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ओझर* अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्यातीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेलाशिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते.. आणि विश्वास च नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. - रामदास पेंडकर ( तानूरकर ) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *1) नेपाळ ची राजधानी कोणती ?* 👉🏻 काठमांडू *2) खारी साठी चे ग्रिझल्ड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* 👉🏻 तामिळनाडु *3) गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?* 👉🏻 रत्नागिरी *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 विजय भगत, सहशिक्षक 👤 गणेश गिरी, धर्माबाद 👤 नवनाथ पिसे 👤 रामेश्वर चिंतलवार, धर्माबाद 👤 सुनीता गायकवाड 👤 धनराज पाटील बाभळीकर 👤 नवनाथ कौठगावे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " निकाल " नको त्या गोष्टीसाठी चाल ढकल करतात हास्यास्पद वाटेल अशी उकल करतात ज्याची नाही त्याची चाल ढकल नसावी कशाची करावी कशाची नाही अक्कल असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही.केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल.म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *काका कालेलकर* काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्यांची विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काका म्हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेच त्याच्याशी उलटपक्षी वागले असता म्हणजेच घरातल्यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्यास तो अशा घराचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’काकांच्या नव्या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले. *तात्पर्य :-* आजारापेक्षा जास्त त्याची चिंता तणाव वाढवते. त्यामुळे कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेला सकारात्मक विचाराने घेण्याचा प्रयत्न करा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment