✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वायु सेना दिन - रशिया* 💥 घडामोडी :- १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 जन्म :- १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- खासगी मेडीकल कॉलेजांची प्रवेश यादी जाहीर. खासगीसोबत शासकीय कॉलेजांचीही यादी जाहीर. 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत.* ----------------------------------------------------- 2⃣ *काबूल - अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : रेशन दुकानदारांचा संप सुरू, कमिशन वाढीसाठी सुरू केलेल्या संपात 2600 पैकी दीड हजार दुकानदार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *पाकिस्तान पंतप्रधानपदाची निवडणूक शाहिद अब्बासी यांनी 221 मतांनी जिंकली- पाक मीडिया* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मेंदूरोग चिकित्सक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार घोषित* ----------------------------------------------------- 7⃣ *परभणी: मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/UJfMQi8RpTF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोंदिया* गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत. *पर्यटनस्थळे* - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर तुमचे विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही !!!* खंडु यरकलवाड बेळकोणीकर मो : 7758845592 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) सुप्रसिद्ध "फकिरा" या कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *२) अण्णाभाऊ यांचे पूर्ण नाव काय?* 👉🏼 तुकाराम भाऊराव साठे *३) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला?* 👉🏼 १ ऑगस्ट १९२० *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 आर्यन अनिल चौगले, रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर 👤 वाघमारे रविंद्र, सहशिक्षक, धर्माबाद 👤 जी.पी. मिसाळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, धर्माबाद 👤 दिगांबर वाघमारे, पत्रकार, कंधार 👤 शिलानंद गायकवाड 👤 कैलाश चंदोड, येताळा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "आचार ना विचार " आचार ना विचार कसे ही बोलतात काहीही बोलले की थरथर पाय हालतात बोलतांना कधी ही तोलून मापून बोलावं सरळ बोलून होते मग वाकड कशाला चालावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे आपापल्या खिडकीतून दिसलेला आभाळाचा तुकडा म्हणजेच ते विस्तीर्ण, अमर्याद आभाळ असल्याचा भ्रम निर्माण होतो. शोध मागे पडतो. माझ्याच मोजपट्टीनं जगाला मोजायच्या नादात मी विसरून जातो की एकाचवेळी आपापल्या अनुभवांच्या आणि अनुभूतींच्या खिडक्यांतून असंख्य डोळे या आकाशाकडे बघताहेत. मी माझी खिडकी मोठी करण्याऐवजी माझ्याच खिडकीची चौकट भक्कम करून घेतोय आणि आभाळाच्या कितीतरी रंगछटांना, आकारांना मुकतोय.* *हे सवंग...हे भिकारडं...हे सखोल.....हे बाजारू...* *असे शिक्के मारण्याच्या नशेत मीही एखाद्या साम्राज्यवाद्याच्या पंगतीत जाऊन बसल्याचं मला कळतही नाही. सत्य गवसल्याच्या भ्रमात मी सत्यापासून अधिकाधिक दूर जात राहतो. जर दुस-याच्या खिडकीचा आदर करणंही जमणार नसेल तर कशाला गप्पा मारायच्या वैश्विकतेच्या ?* *"सारं जग जोडायला निघालेल्यानं आधी स्वत:ला मोडायला शिकलं पाहिजे...'* ••●🍁‼ *रामकृष्णहरी*‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रकाशातून मार्ग तर काहीही प्रयत्न न करता सहजपणे सा-यांनाच काढता येतो आणि सहजच जीवनाचा प्रवास करता येतो.त्यात काही अवघड नाही,परंतु अंधारातून मार्ग शोधून काढणे फार कठीण आहे. त्यालाही धैर्य लागते. अशी धैर्यवान माणसे कितीही अंधार असला तरी ते प्रकाशाचा शोध काढल्याशिवाय थांबत नाहीत.कारण मार्ग जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांचे मनही स्वस्थ बसू देत नाही. मनाने एकदा निश्चय केला की, कितीही अवघड प्रसंगातून चांगला मार्ग शोधता येतो हे मात्र सत्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🛡 आजची काव्यसरिता 🛡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - वंचिता* अवघे विश्व पूजे तूला सृष्टी ची तू रचियता... भाग्य रेषा कशा ललाटी तूला बनवली वंचिता.... संकटाच्या पथमार्गावर तूझ्यात वसते निर्भिडता भ्याड म्हणूनी तूजला हासे हास्यापुढे बनवली तूला वंचिता... शिक्षणाचा हक्क तूझा पायदळी तूडवली तूझी अस्मिता जीव तूझा घुसमटतो तरी अंगठा दाखवूनी केलीया तूला वंचिता... काय गुन्हा झाला तूझा तू नारी होती जन्मतः अबला म्हणूनी हिणवती तूजला सबला बनली तरी वंचिता... ऊठ आता तू मार्ग सापडेल शोधता सावित्री आणि लक्ष्मीबाई बनूनी तू भाग्यरेषा पूस आपली नको ती वंचिता... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* *जि.प.उ.प्रा.शाळा सिंदगीतांडा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकारी राजाला धडा* एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला, *तात्पर्यः-* जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment