तांत्रिक कारणामुळे काल बुलेटिन पोस्ट करता आले नाही, त्याबद्दल बुलेटिन टीम दिलगीर व्यक्त करते. ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *राष्ट्रीय क्रीडा दिन* 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांनी मुंबई विद्यापीठाचे नवीन प्रभारी कुलसचिव म्हणून आजपासून पदभार स्वीकारला* ----------------------------------------------------- 2⃣ *अमेरिका: ह्युस्टन विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी सुखरुप; चक्रीवादळामुळे ह्युस्टनमध्ये मोठं नुकसान* ----------------------------------------------------- 3⃣ *लखनऊ: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ५ सप्टेंबर रोजी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन करणार; ६ सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रो सेवा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना 9 महिने प्रसुती रजा मिळणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निर्णय, परिपत्रक जारी* ----------------------------------------------------- 5⃣ *हरयाणा - राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने एकूण 20 वर्षांचा कारावास ठोठावला* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर: गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास सामान जप्त करून मंडळांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे नोंदवा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *आंध्र प्रदेश : नंदयाल विधानसभा पोटनिवडणुकीत तेलगू देसम पार्टीचा विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोष्ट एका रूपयाची* तसे तर एक रूपयाला आज तेवढी किंमत नाही. अगदी 20 - 25 वर्षापूर्वीची जर बाब विचारात घेतली तर लक्षात येईल की, एक रूपया किती महत्वाचे आहे ? त्या काळी 5 पैश्याला सुद्धा वस्तु मिळत होती आणि खिशात एक रूपया आहे म्हणजे खुप बरे वाटायाचे.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/KCVxxKZocXo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *थेऊर* अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातीलपेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांचीसमाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर,तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.) *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *"जे लोक नेहमी फुले वाटतात,* *त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत राहतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) रेडिओचा शोध कोणी लावला?* 👉🏼 मार्कोनी *२) गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?* 👉🏼 न्यूटन *३) सापेक्षतावादाचा शोध कोणी लावला?* 👉🏼 आइनस्टाइन *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 योगिता सुरेश येवतीकर गणेश नगर, नांदेड 👤 रविंद्र केंचे 👤 शिवराज पाटील चोळाखेकर, धर्माबाद 👤 ईश्वर शेठीये *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "लबाड " डोळे झाकुन लहान मोठे बुवा बाबांच्या चरणीआहेत विचार करवत नाही असल्या यांच्या करणी आहेत गरजच काय मग जायची यांच्या चरणाला नतमस्तक कसे होतात लबाडांच्या धोरणाला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ? बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?* *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे कितीही कामे आपल्यासमोर असली आणि कोणत्याही कामात गुंतलेली असली तरी ती काम करत असताना किंवा रिकाम्या वेळी आपल्या मुखातून एखाद्या परमेश्वराचे नाम, एखादे आवडते गाणे किंवा काहीतरी गुणगुणत काम करत असतात.अशी माणसे नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारीच असतात.ते कधीही कितीही कामाचा व्याप असला किंवा कितीही अवघड असले तरी ते सहज त्यातून मार्ग काढत आपले सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो. आपण जर त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही जीवनाला सहज जीवन जगण्याचा मार्ग सापडेल हे निश्चित. 🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपती बाप्पा* बाप्पाला पाहताक्षणी मनाचा लागतो शोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद त्याच्या येण्याची उत्सुकता मला लागते वर्षभर तो आला वाजत गाजत की उत्साह पसरतो घरभर तयारी चाले आगमनाची मग काम करी दिवसभर त्याच्याकडे पाहून माझा संपतो सगळा क्रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद अकरा दिवस चाले त्याची पूजा आराधना रोज वेगळा कार्यक्रम रोज आगळा सामना बाप्पा खुश व्हावा म्हणून आम्ही सारे करतो साधना उत्सवातील सेवा करून कमी होतो सर्वांचा रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद - नागोराव सा. येवतीकर प्राथमिक शिक्षक मु. येवती ता. धर्माबाद 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रामाणिकपणा* एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.'' *तात्पर्य :-* लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment