✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर. १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता. १९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश* ----------------------------------------------------- 2⃣ *तिहेरी तलाकवर आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय, देशभरातील मुस्लीम महिलांचे याकडे लक्ष.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचा-यांनी आज एक दिवसाचा संप* ----------------------------------------------------- 4⃣ *गुजरातमध्ये स्वाइन फ्लूने आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात भूकंप. घाबरून लोक घराबाहेर धावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपः पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने स्पेनच्या पाब्लो अबियनचा २१-८, १७-४ अशा दोन सेटमध्ये केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या लढतीत किदम्बी श्रीकांतचा रशियाच्या सेर्गेई सिरांतवर 21-13, 21-12 असा विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ श्रावण, पाऊस आणि पोळा या तीन शब्दाच्या आधार घेऊन लिहिलेला प्रसंग *श्रावणातील पोळ्याचा पाऊस* आज रामराव खुपच चिंताग्रस्त होऊन बसला होता. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याला शेतातील पिकाची काळजी लागली होती. त्याला आपल्या सर्जा आणि राजा या दोन बैलाची काळजी लागली होती. नव्हे त्याला परिवारातील सर्वांची काळजी लागली होती......... पूर्ण प्रसंग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/bb4FAx7VF4w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सिंधुदुर्ग* भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. *अर्वाचीन इतिहास* सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. *प्रेक्षणीय स्थळे** आचार खाडी (बेकवाटर) आंबोली थंड हवेचे ठिकाण कुणकेश्वर मंदिर (देवगड) तेरेखोल किल्ला देवगड किल्ला व दीपगृह राजवाडा (सावंतवाडी) विजयदुर्ग किल्ला संत राऊळ महाराज मठ कुडाळ सावडाव धबधबा सिंधुदुर्ग किल्ला सुवर्ण गणेश मंदिर मालवण *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " Whether you think you can, or you think you can't--you're right..." सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "मेरी झांशी नही दूंगी" असे कोण म्हणाले?* 👉🏼 राणी लक्ष्मीबाई *२) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवाणरच" असे कोण म्हणाले?* 👉🏼 लोकमान्य टिळक *३) ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरली नसून,ती कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे",असे कोण म्हणाले?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा संजय गैनवार, धर्माबाद 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशीष देशपांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "पटत नाही " खरं सांगितलेले कोणाला पटत नाही कितीही खरं सांगा खरं वाटत नाही धुंदीतल्यांना वाटते माझं सारं खरं आहे सांगणाराला वाटते आपल शांत बरं आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे काहीच न करता स्वस्थ बसून राहतात.आहे त्याच परिस्थितीत धन्यता मानतात.त्यांना काहीच करावेसे वाटत नाही.दुस-यांकडे पाहूनही आपण काहीतरी करावे असेही वाटत नाही.अशांचे जीवन म्हणजे एका डब्यातील बेडकाप्रमाणेच असते.ते आपल्या जीवनात कधीही सुखी होऊ शकत नाही. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590. 🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बालगीत - पोळा " आला आला पोळा, बैलाची पाट चोळा /१/ साबनाने बैल धूवा, शिंगाला वारनेस लावा /२/ बैलाला नवीन म्होरकी, वेसनीला दोर बारकी /३/ बैलाला नवीन कासरा, शेतकरी आमुचा हसरा /४/ अंगावर काढा नक्षी, पाटीवर बसेल पक्षी /५/ बैलाला बांदावर चारा, गोठ्यात आणा गवताचा भारा /६/ पाटीवर झुली घाला, गळ्यात घुंगराच्या माळा /७/ मंदिराला माळा चक्कर, ढवळ्या - पवळ्या खेळेल टक्कर /८/ गाईसोबत लावा लग्न, गाव सगळा सणात मग्न /९/ खाऊ घाला पुरणपोळ्या, आनंदाने वाजवा टाळ्या /१०/ " आनंदाने वाजवा टाळ्या.... " *रचनाकार * श्री.नवनाथ श्रीहरि बोराडे लातूरकर. शाळा पिकुळे नं. ०३ ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग भ्रमणध्वनी - ९४२३२१६१०४ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *हिऱ्याची परख* थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !! सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment