✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :- १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे, सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किमत मिळाली.* ----------------------------------------------------- 2⃣ *डीआरडीओने नाग क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्व जिल्हा रुग्णालयांना पेडियाट्रिक व्हेंटिलेटर पुरविणार - दीपक सावंत, आरोग्यमंत्री.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवरात्रीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ११ सप्टेंबरला राज्यील सर्व जिल्ह्यात काढणार मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा कृषि विद्यापीठाच्या वतीने पासून 4 दिवस कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *यूएस ओपन : राफेल नदाल अंतिम फेरीत, नदालचा अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोवर 4 सेटमध्ये विजय.* ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेला 3-0 ने पराभव केल्यामुळे कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर विराजमान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *👜🦋 काटकसर 🦋💼* जीवनात काटकसर खुप महत्वाचे आहे. त्या शिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घरा चा विकास तरी कसा होईल. म्हणून मराठीत एक म्हण आहे की, अंथरण पाहून पाय पसरावे. याचा विचार............ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3zA2TfNSDCY आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *के.एस.रणजीतसिंह* ‘के.एस.रणजीतसिंह’ किंवा ‘रणजी’ या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे ‘ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. ‘रणजी ट्रॉफी’ या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता. सौ.भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 राजघाट(दिल्ली) *२) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शांतिवन(दिल्ली) *३) इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शक्तिस्थळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 क्रांतिकुमार भूक्तरे, नांदेड 👤 ईश्वर येमुल, नांदेड 👤 विश्वंभर पपुलवाड, धर्माबाद 👤 संतोष पांडागळे, नांदेड 👤 राजेश बाबुराव चिटकुलवार 👤 संभाजी सालुंखे 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 प्रवीण भिसे पाटील 👤 ज्ञानेश्वर इरलोड 👤 गंगा पुट्ठेवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " गृहित " एक रडवतो तर दुसरा हसवत असतो रडवणारा अन् हसवणारा आपल्याला फसवत असतो ते आपले चोंभाळायचे काम करत असतात सामान्याला मात्र सारे गृहित धरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*, ” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*. *तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ? *तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?” *भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” *बाळा, *तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* . *तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल* .” ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आगमन सोनपरीचे* आगमन सोनपरीचे झाले सोनपावलांनी आनंदाने भरले घर निघाले त्यात न्हाऊनी कौतुके तिला सारे पाहती देती प्रेमे आलिंगन पाहून तिचे मुखकमल झाले आनंदी मन सानुली बाहुली जणू गोड गोजिरी साऱ्यांचीच छकुली दिसे साजिरी पाहताच मोहवी मन घराला आले घरपण हर्षभराने करुया स्वागत तिचे आपण सारेजण सौ वैभवी गावडे , मुंबई 9221804027 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अधिक चतुर* बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले. पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण ? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती? बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment