✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/08/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :- २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार. २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार. 💥 जन्म :- १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ. १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता. १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका. 💥 मृत्यू :- १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. २००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार २००१ - डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या, स्वागतासाठी भाविकांची जय्यत तयारी, ढोल-ताशा पथकंही सज्ज* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 3⃣ *नंदन निलकेणी यांची इन्फोसिसच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी झाली नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *अश्वनी लोहानी यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *200 रुपयांची नोट आजपासून चलनात येणार - आरबीआय.* ----------------------------------------------------- 6⃣ *जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: भारताच्या किदाम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसरा एकदिवसीय सामना भारताने तीन विकेटनं जिंकला, भुवनेश्वरने झळकावले दमदार अर्धशतक* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2100 किलो वजनाच्या चॉकलेट केकचा नैवेद्य.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आधी वंदू तुज मोरया...!* वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला आपण तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF आपले अभिप्राय जरूर द्यावे. गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपतीपुळे* गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो?* 👉🏼 २४ तास *२) पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?* 👉🏼 ३६५ दिवस *३) सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो?* 👉🏼 ८ मिनिट *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदि रामचंद्र 👤 गणेश मैडमवार, धर्माबाद 👤 प्रमोद गुरुपवार, तळणी 👤 नयन पेडगावकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "गणराज" वाजत गाजत गणराज येतील लहान थोर आनंदी होतील बाप्पा हा आनंद कायम टिकू द्या बळीराजाची शेती जोमात पिकू द्या शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 *गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आमची उत्सवप्रियता प्रेरक असावी, ती मारक असता उपयोगी नाही. येणा-या प्रत्येक नव्या पिढीला त्यात सृजनत्वाचे नवे बिंदू दिसावेत. त्यासाठी आम्ही काय करणार आहोत ? आम्ही जबाबदारी ओळखून वागणार आहोत की नाही ? की आला दिवस गेला दिवस, अशीच आमची उत्सवप्रियता असणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नवी पिढी आपल्याला विचारेल. त्यावेळी जर आपण निरूत्तर असू तर तर आपल्यावर पिढी नासवल्याचे आरोप होतील. म्हणून वेळीच सावध व्हायला हवे.* *आपली संस्कारांनी, परंपरांनी भरलेली ओंजळ येणा-या पिढीच्या हातात रिती करण्याचे काम या गणेशोत्सवांतून झाले पाहिजे. उत्सवाच्या प्रत्येक क्षणांतून आज आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे. संस्कृतीच्या या संघर्षकाळात तावून-सुलाखून निघण्यासाठी सुजाण नागरिकत्वाच्या दिशेने पावले पडली तरच गणपती आपल्याला पावला म्हणायचे. चला, तर मग असा गणेशोत्सव साजरा करू या आणि म्हणू या की--* *'--देवा तूचि गणेशु..'* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🔻🔻🔻🔻🔻🔻 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ समाजाला एका चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाण्यासाठीधर्मग्रंथ,पुराणग्रंथ, लोककथा,संतविचार, थोरविचारवंत,समाजसुधारक व आदर्श समाजहित जोपासणा-या साहित्यिकांचे लेखन हे सदैव समाजाला मदत आणि मार्गदर्शनच करतात. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात जास्त योगदान या सर्वांचे आहे. हे कधीही विसरून चालणार नाही.नेहमी त्यांच्या सहवासात राहून आपले जीवन समाजाप्रती सकारात्मक ठेऊन आपली व समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. - *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेशोत्सव - सन 2017* *बाप्पाचे मनोगत* मनोगत सांगतो बाप्पा तुम्ही लक्ष देऊन ऐका गतवर्षी शांताबाईने किटले कान यावर्षी नको तो सोनूचा ठेका घरी गेल्यावर गुणगुणल्याने ऐकून ओरडते आमची माता म्हणते वैतागून आम्हांस ती हे कसलं संगीत तिकडून घेऊन येता झांजा , ढोल ताशांनी आमचे बहिरे होतात दोन्ही कान ध्वनी प्रदूषणाने होते हानी याचे नसते का तुम्हां भान नेत्रदीपक रोषणाईचाही आम्हाला होतो फारच त्रास झिकमिक दिव्यांऐवजी शांत तेवणारी समईच खास भजन कीर्तन क्वचित कुठेतरी नाचगाणी , डामडौलाचाच जास्त थाट सरबराई आमची की मौज तुमची हाच प्रश्न घुमत राहतो डोक्यात तुमचे देव म्हणून आम्हास मानता आणि आम्हांस रस्त्यांवरही बसविता तेच तुमच्या मनात बसविलत तर कशाला राहील कसलीच चिंता ***************************** श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छांसह ! ----प्रविण शांताराम , पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश कथा* एक समय जब माता पार्वती मानसरोवर में स्नान कर रही थी तब उन्होंने स्नान स्थल पर कोई आ न सके इस हेतु अपनी माया से गणेश को जन्म देकर 'बाल गणेश' को पहरा देने के लिए नियुक्त कर दिया। इसी दौरान भगवान शिव उधर आ जाते हैं। गणेशजी उन्हें रोक कर कहते हैं कि आप उधर नहीं जा सकते हैं। यह सुनकर भगवान शिव क्रोधित हो जाते हैं और गणेश जी को रास्ते से हटने का कहते हैं किंतु गणेश जी अड़े रहते हैं तब दोनों में युद्ध हो जाता है। युद्ध के दौरान क्रोधित होकर शिवजी बाल गणेश का सिर धड़ से अलग कर देते हैं। शिव के इस कृत्य का जब पार्वती को पता चलता है तो वे विलाप और क्रोध से प्रलय का सृजन करते हुए कहती है कि तुमने मेरे पुत्र को मार डाला। माता का रौद्र रूप देख शिव एक हाथी का सिर गणेश के धड़ से जोड़कर गणेश जी को पुन: जीवित कर देते हैं। तभी से भगवान गणेश को गजानन गणेश कहा जाने लगा। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment