✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- १८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय. 💥 जन्म :- १९११ - राप्पल संगमेश्वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते. १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९५० - डॉ. अभय बंग. १९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार. १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूरमध्ये देशाच्या विकासाचे केंद्र बनण्याची क्षमता : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - आयकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामीसह तीन जणाना अटके, आयकर भवनमध्ये तीन कोटींची लाच घेताना कारवाई.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापुरात स्मार्ट सिटी कामांचा झाला शुभारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली : राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड. येत्या 13 आणि 14 ऑक्टोबरला गडचिरोलीत संमेलनाचे आयोजन.* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताकडून न्यूटन सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, राजकुमार राव यांच्या न्यूटनचं ऑस्करसाठी नामांकन.* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणातून 10 हजार क्युसेक पाणी सोडलं, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडीचे दरवाजे उघडले* ----------------------------------------------------- 8⃣ *मध्य प्रदेश : भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या वन डे स्पर्धेसाठी इंदुरला पोहोचली* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लोकसहभागातून शाळेची प्रगती* गावातील शाळा ही सर्वासाठी एक आधार असते. प्रत्येक शाळेला ही गावाचा आधार खुप महत्वाचा असतो. जेथे हे दोन एकमेकाच्या हातात हात घालून चालतात तेथे शाळेची आणि गावाची प्रगती लक्षणीय असते, यात शंका.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/9L8DEuAG2Nu आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नवरात्र विशेष - तुळजाभवानी* उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवताहोय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंतीआहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वैदिक वाड;मयाची भाषा कोणती आहे?* 👉 संस्कृत *२) वेद किती आहेत?* 👉 चार *३) हे चार वेद कोणते?* 👉 ऋग्वेद,अथर्ववेद,सामवेद,यजुर्वेद *संकलन : - संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 डॉ. सुरेश सायन्ना येवतीकर आय टी व्यवस्थापक MGB मुख्य शाखा औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " खळं" माहिती असतांना कोणी खळं लुटू देत नाही स्वतः कष्ट करून खळं दुस-याला वाटू देत नाही हे शेतकरी थोडे आहेत खळं वाटून खायला सारं रान कमी आहे यांना चाटून खायला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●🍀‼ *रामकृष्णहरी*‼🍀●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, चांदिवरी, मुंबई* *मोबाईल -पाप 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला राग येतो तो काही काळापुरता आणि काही काळानंतर तो शांत होतो.राग येण्याची काही कारणे असू शकतात.एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली किंवा होत नसली तरी राग येतो.परंतु राग संपला की,तो विचार करायला लागतो आणि आपण उगीच रागाच्या भरात काही बोलून गेलो यांचा पश्चात्ताप ही व्हायला लागतो. अशावेळी तो आपण काहीतरी केले आहे ते यापुढे करणार नाही याची जाणीव होऊन समोरच्याची जेव्हा माफी मागायला लागतो तेव्हा समोरच्याने सुद्धा मोठ्या मनाने माफ करुन त्याला आपलेसे करुन आपल्यात सामावून घेणे हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *चिऊ-काऊ* चिऊ काऊच जग कित्ती कित्ती छान उडत जातात नभी घेऊन उंच "उडाण". चिव काव करीत टिपतात अंगणी दाणे भेटलं नाही खायला तरी उडती आनंदाने. चिऊ काऊची जोडी शोभते गोष्टीत जशी प्रत्यक्षात मात्र ती बोलत नाहीत फारशी. चिऊला देतो आपण मेणाच घर छान कावळ्याच्या घराची तुटते सारखी मान. पण देऊन कावळेदादाला घरामध्ये आसरा शिकविते चिऊ आपल्याला भेदभाव सारे विसरा. चिऊ काऊचंच जग कित्ती कित्ती छान आहे त्यांच्या जगात प्रत्येकाला मान समान जाती पंथ धर्मला ते देत नाही थारा जाणुन आहेत ते सर्वांसाठी आहे ऊन, पाऊस,वारा. संगीता वाढोणकर जि.प.कें.प्रा.शा.पाल ता.फुलंब्री जि.औरंगाबाद 9850085155 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment