✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- १९६० : जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला. 💥 जन्म :- १९५७ : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १८८६ : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भारतीय स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईः एअर इंडियाच्या विमानात चढताना जवानांना प्राधान्य, एअर इंडियाचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे : बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने नौपाड्यातील दहीहंडी उत्सवात लावले 9 थर,मंडळाने मिळाले 11 लाख रुपयांचे बक्षीस* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाजारात आला, 3 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे येथील हनोगी माता मंदिरजवळील राष्ट्रीय महामार्ग 21 बंद करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *प्रो. कबड्डीः पुणेरी पलटनची बंगाल वॉरियर्सवर ३४-१७ अशी मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विचार बदला, देश बदलेल* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/MXWmLeEkQDd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुणे* पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जगाला काय या आवडतं, ते करू नका. तुम्हाला काय आवडते ते करा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण कोणते?* 👉🏼 जायकवाडी *२) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉🏼 गोदावरी *३) जायकवाडी धरणाचे नाव काय?* 👉🏼 नाथसागर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कवी निखिल खराबे, कुही नागपूर 👤 कोंगीरी राममोहन 👤 कु. श्रध्दा रामेश्वर चिंतलवाड, धर्माबाद 👤 सुभाष पालदेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "उत्साहाच्या भरात " उत्साहाच्या भरात नको ते धाडस करतात कारण नसतांना ही काही उगीच मरतात क्षमता आणि मर्यादा ओळखून धाडस करावं उत्साहाच्या भरात उगीच कशाला मरावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अंक गीत* एक एक एक लाल चेंडू फेक दोन दोन दोन मला आवडतो फोन तीन तीन तीन डोक्याला लावा पीन चार चार चार सुट्टीचा दिवस रविवार पाच पाच पाच ताल धरून नाच सहा सहा सहा रांगेत उभे रहा सात सात सात खाऊ दाळ भात आठ आठ आठ बसा सरळ ताठ नऊ नऊ नऊ मुलांना देऊ खाऊ दहा दहा दहा शाळा सुटली पहा नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment