✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक छायाचित्र दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८३९ : जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले. 💥 जन्म :- १९१८ : डॉ. शंकर द्याळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती. १९५० : डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका 💥 मृत्यू :- १९४७ : मास्टर विनायक, ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही पावासची स्थिती बिकट, नागपूर वेधशाळेची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *उत्तर प्रदेश: मदरशांच्या नोंदणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने वेबसाइट केली लाँच.* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : मनपा शाळेत वाटलेल्या जंतनाशकच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्याने विद्यार्थी मुजमील जमील शेख (१३) घाटी रुग्णालयात दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *गोरखपूर मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा; अलाहाबाद उच्च न्यायायाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश, पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली- जिल्ह्यात दोन ठिकाणांवरुन अडीच लाखांचा तबांखू जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई.* ----------------------------------------------------- 6⃣ *'नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे', महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य.* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई: मंत्रिमंडळातील जागेसंदर्भात भूमिका जाहीर करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारला अल्टिमेटम.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी *शरद पाटील, बर्लिन जर्मनी* यांची प्रतिक्रिया https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/e7V4x7yojQd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले बुलेटिन विषयी अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उस्मानाबाद* उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे. कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे. परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन तोच दरारा!!! --पेंडकर रामदास (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण?* 👉🏼 सुरेखा भोसले *२) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण?* 👉🏼 आनंदीबाई जोशी *३) अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिला महिला अध्यक्ष कोण?* 👉🏼 कुसुमावती देशपांडे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा टाले, मुख्याध्यापक राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड 👤 महेश हातझाडे, गोंदिया *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शब्द " दिला शब्द माणसा कडून हल्ली पाळला जात नाही विश्वासघात केला तरी आश्रू ढाळला जात नाही दिला शब्द माणसाला पाळता आला पाहिजे विश्वासघातकी प्रसंग टाळता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण सूर्याकडून प्रकाश, ढगाकडून पाणी, जमिनीकडून अन्न,वृक्षाकडून फळे आणि सावली,संत-सज्जनाकडून चांगले जीवन जगण्याचे उपदेश अशा कितीतरी अनेक गोष्टी आपल्या जीवनासाठी घेतच आलो आणि जीवन जगत आलो,पण थोडा आपणही विचार करायला हवा.जसा या सा-याकडून देण्याचा त्यांचा गुण आणि आपण घेण्याचा गुण नि:संकोचपणे घेतला आहे त्याचप्रमाणे आपणही काहीतरी देण्याचाही मानवतेचा धर्म स्वीकारायला हवा.यासाठी निसर्गाचे संगोपन,गरीब व होतकरुंना सहकार्य,भुकेल्या ना अन्न,तहानलेल्यांना पाणी,दु:खितांची सेवा आणि प्रसंगानुरुप मदतीला धावून जाणे ह्या देखील तितक्याच दातृत्वाच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत आणि हे निस्वार्थीपणे करायला हवे.यातच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ आहे.यासाठी आपले हात सदैव पुढे असू द्यावे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तो तुझा पावसाळा, हा माझा पावसाळा का वाटला खुळा. .. आपसात पावसाळा...ll का हे आपल्यात आज असे वैर जाहले किती होता तो उल्हासात पावसाळा ...ll कधी त्याने तुला भिजवले, कधी मला आज भिजतो स्वतःच्याच अश्रूंत पावसाळा...ll कधी तुला शोधतो, कधी शोधतो मला वणवण भटकतो विचारात पावसाळा ...ll त्याच्या पदरीचे जीणे न पाहवे मज आता शाल काळी पांघरून दडला ढगात पावसाळा ...ll तुझा पावसाळा कसा तुझे ते तुच जाणो भिजवत उशी जगतो माझा दिनरात पावसाळा...ll शैलजा वायझाडे ... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सबसे कीमती चीज* एक जाने-माने स्पीकर ने हाथ में पांच सौ का नोट लहराते हुए अपनी सेमीनार शुरू की. हाल में बैठे सैकड़ों लोगों से उसने पूछा ,” ये पांच सौ का नोट कौन लेना चाहता है?” हाथ उठना शुरू हो गए. फिर उसने कहा ,” मैं इस नोट को आपमें से किसी एक को दूंगा पर उससे पहले मुझे ये कर लेने दीजिये .” और उसने नोट को अपनी मुट्ठी में चिमोड़ना शुरू कर दिया. और फिर उसने पूछा,” कौन है जो अब भी यह नोट लेना चाहता है?” अभी भी लोगों के हाथ उठने शुरू हो गए. “अच्छा” उसने कहा,” अगर मैं ये कर दूं ? ” और उसने नोट को नीचे गिराकर पैरों से कुचलना शुरू कर दिया. उसने नोट उठाई , वह बिल्कुल चिमुड़ी और गन्दी हो गयी थी. ” क्या अभी भी कोई है जो इसे लेना चाहता है?”. और एक बार फिर हाथ उठने शुरू हो गए. ” दोस्तों , आप लोगों ने आज एक बहुत महत्त्वपूर्ण पाठ सीखा है. मैंने इस नोट के साथ इतना कुछ किया पर फिर भी आप इसे लेना चाहते थे क्योंकि ये सब होने के बावजूद नोट की कीमत घटी नहीं,उसका मूल्य अभी भी 500 था. जीवन में कई बार हम गिरते हैं, हारते हैं, हमारे लिए हुए निर्णय हमें मिटटी में मिला देते हैं. हमें ऐसा लगने लगता है कि हमारी कोई कीमत नहीं है. लेकिन आपके साथ चाहे जो हुआ हो या भविष्य में जो हो जाए , आपका मूल्य कम नहीं होता. आप स्पेशल हैं, इस बात को कभी मत भूलिए. कभी भी बीते हुए कल की निराशा को आने वाले कल के सपनो को बर्बाद मत करने दीजिये. याद रखिये आपके पास जो सबसे कीमती चीज है, वो है आपका जीवन.” *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment