✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९२६ : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला. 💥 जन्म :- १९२६ : भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार. १९३३ : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९८१ : निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते. १९८२ : शेख अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *1993 मुंबई साखळी स्फोट : फिरोज खान, ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागासांना सर्वसामान्य कोट्यातून 25 टक्के आरक्षण द्यावे - रामदास आठवले* ----------------------------------------------------- 3⃣ *एकनाथ खडसेंविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *लोकमत गोवन ऑफ द इयर २०१७ पुरस्कार सोहळा - शिक्षण विभागातील पुरस्कार व्यंकटेश प्रभूदेसाई यांना प्रदान* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नवीन पक्ष स्थापन करणार, स्वाभिमानीला सोडचिठ्ठीनंतर खोत यांचा मोठा निर्णय* ----------------------------------------------------- 6⃣ *पंढरपूर - विठू माउलीच्या दर्शनासाठी आता टोकन पद्धत लागू करणार, मंदिर समितीची माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *यू एस ओपन टेनिस टुर्नामेंट. रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव. युआन डेल पोत्रोकडून रॉजरचा पराभव.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🦋 *स्वातंत्र्य* 🦋 ती खुप शिकलेली. तो देखील चांगला शिकल्यामुळेच त्याला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तसे दोघे पण पुरोगामी विचारांचे. एकमेकाला समजून घेणारे. मात्र घरात तसे वातावरण नव्हते.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Sebdj2pCFLX आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आशा भोसले आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदीआणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार ही त्यांना देण्यात आला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंकता येते. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) बालिका दिन कधी साजरा केला जातो?* 👉 ३जानेवारी *२) बालिका दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केल्या जातो?* 👉 सावित्रीबाई फुले *३) देशातील पहिली मुख्याध्यापिका कोण?* 👉 सावित्रीबाई फुले * संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव बाभळे, सहशिक्षक, माहूर 👤 योगेश जंगले, नांदेड 👤 कृष्णा हंबर्डे 👤 बालाजी वारले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बुडत्याचा पाय " बुडत्याचा पाय खोलाकडे असतो खरं सांगणाराच्या बोलाकडे नसतो खोलाकडे गेले की पाय खोलात फसतो खोल खोल फसला की मग रडत बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *निसर्गात पाखरांचं एक निरागस अन् निर्लोभी असं जग असतं. आपल्या पिलांसाठी ते एक खोपा तयार करतात. आपल्या सुस्वर भाषेनं सारा निसर्ग आनंददायी करतात. त्यांच्या अंगावरील रंग किमयेनं सृष्टीच्या अगाध करणीचा सौंदर्यमय अविष्कार नजरेत येतो. त्यांच्या भरा-यांनी आभाळ हरखून जातं, सगळीकडे आनंदी आनंद गाजत राहतो. मात्र माणूस यापैकी बरंच हरवून बसतो.* *दुस्वास, खोटारडेपणा, लबाडी, हव्यास, अधाशीपणा, कुरघोडी, सत्ता यासारख्या विकारांनी माणूस आपले आयुष्य अशांत-दु:खीत करतो. आपल्या मुर्खपणामुळे इतरांचेही आयुष्य दुषीत करून रिकामा होतो. खरंतर--* *'आनंदाचे डोही, आनंद तरंग'* *यापरतं सुख नाही. आनंद निर्माण करणं, तो सगळीकडे पेरीत जाणं व सारं पर्यावरण प्रसन्नतेनं सुखावून टाकणं हा माणसाच्या जगण्याचा 'परिपाक' आहे.* ••●🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ इतरांच्या कामाचे कौतुक मनातून भरभरुन करा.कारण तुमच्या कौतुकाची थाप त्यांच्यासाठी खुप काही प्रेरणा देऊन जाणारी असते.आपल्या प्रेरणेमुळे त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते. पण असे करु नका की,तो पुढे जात आहे आपल्याला काय फायदा होणार.त्याचे आपल्याशी काय देणे-घेणे आहे.असं म्हणून त्यांचे मागे पाय खेचू नका.कधी तोही आपल्या आपण केलेल्या कामाचे कौतुकच करेल. त्यांचीही प्रेरणा आपल्याही खुप काही देउन जाणारी असतेच. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वप्नपूर्ती* ----------------- सक्षम मी तुझ्या आशीर्वादाने जीवनाच्या या वाटे वरती सांग माझ्या सुखा साठी आई किती कष्ट तू करती जगता मधे थोर आहे ग कायम तुझी अनमोल किर्ती तुझ्या मुळे च लाभली मला संकटाशी लढण्याची स्फूर्ति तुझ्या अफाट ग थोरवी पुढे तुच्छ वाटते दगड देवाच्या मूर्ति जीवनभर करणार मी आई फक्त तुझीच सेवा आरती सुखात राहावी कायम तू येऊ दे तुझ्या आनंदा भरती हास्य माझे ग तुझ्या सुखात कणखर मी तुझ्या आधारा वरती आहे मी तर तुजविण पामर वंदन करतेय तुला ही धरती थकलिस आता कष्ट तू थांबव करणार मी तुझी *स्वप्नपूर्ती* *आजिनाथ वाडेकर* *आष्टी, बीड* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ कृष्णाने सांगितलेले *कलियुग* काय आहे? एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊ देत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 📞9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment