चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर 🐊🐒आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे 🌳झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment