✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *न्यू इंडियामध्ये सर्व भारतीय सुखी राहावेत, देशवासियांनी जीएसटीचा स्वीकार केल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद* ----------------------------------------------------- 2⃣ *झारखंडमधील बहारगोडा येथील रस्ते अपघातात दहा जणांचा मृत्यू तर 12 जखमी जखमी झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 3⃣ *पाटणा - बिहारला पुराचा तडाखा, १२ जिल्हे पुराच्या पाण्याखाली* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर येथील सुरक्षा शाखेतील सहा़ पोलीस फौजदार रऊफ शेख राष्ट्रपती पदकाचे मानकरी़* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणेः शहीद मेजर कुणाल गोसावी यांना लष्कराचे मरणोत्तर शौर्यपदक जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताने तिसरी कसोटी 1 डाव 171 धावांनी जिंकली, मालिकेत 3-0 ने विजय.* ----------------------------------------------------- 7⃣ *रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिळालेला विजय ही चांगली सुरुवात आहे - सी. के. खन्ना, बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्*ष ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या दोन वर्षपूर्ती निमित्त *कवयित्री शशिकला बनकर* यांची प्रतिक्रिया पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/VZVbajbejxt आपले अभिप्राय जरूर द्यावे. असेच क्रमशः प्रकशित होतील. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वाशीम* वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जेव्हा देव आपले संकट निवारण करीत नाही, तेव्हा देवाचा आपल्यावर विश्वास असतो कि ती संकटे आपण सहज पार करू शकू* - रामदास पेंडकर (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *२) भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼 ७०वर्षे *३) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼 लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार ( स.शि.) विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment