✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - पावसाचा जोर येत्या ४८ तासांसाठी कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : बँकिंग सुधारणांविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात, बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- पुढच्या वर्षापासून आयआयटीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाणार* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, नांदेडमध्ये १६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टी, गेल्या २४ तासांत १४४ मिमी विक्रमी पावसाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेशः गोरखपूरमध्ये पुरात अडकलेल्या 450 लोकांना लष्करानं काढलं सुखरूप बाहेर* ----------------------------------------------------- 6⃣ *हॉलिवूडमधील विनोदी अभिनेते जेरी लेविस यांचे 91व्या वर्षी निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सोशल मिडीया: जरा जपून वापरा* सोशल मीडियामधील फेसबुक, ट्विटर, लिंकदिन, व्हाट्सएप्प, टेलीग्राम यासारख्या माध्यमाचा सध्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे...... https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/QLiHKmfBNs9 वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पालघर* पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात ,आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दुंगा" हे कोणी म्हटले आहे?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *२) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?* 👉🏼 फॉरवर्ड ब्लॉक *३) आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 विश्वास बदापूरकर, येताळा 👤 भीमाशंकर जुजगार, धर्माबाद सेवानिवृत्त, हु. पानसरे हायस्कूल 👤 संतोष गुम्मलवार, नांदेड 👤 दत्ता नरवाडे 👤 साईनाथ राचेवाड, सहशिक्षक जि. प. प्रा. शाळा बेळकोणी बु. 👤 साईनाथ हवालदार, येवती 👤 गोपाल पवार 👤 Feroj Shaikh, ( Plant head ) Badve Engineering Ltd, Aurangabad *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अंदाज " अंदाज सांगणाराच्या तोंडात आज साखर आहे धरणी मातेचाही पहा तृप्ततेचा ढेकर आहे अंदाज सांगणाराचा अंदाज सदा खरा ठरावा कोणी तरी त्यांच्या तोंडात गोड घास भरावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाने एकदा एक काम हातात घेतले असताना दुसरे काम पुन्हा हातात घेऊ नये.जर घेतले तर कोणतेही एक काम पूर्ण होत नाही.हे काम करु की,ते काम करु अशा संभ्रमावस्थेत मग तो राहतो.त्यामुळे दोन्ही कामे अर्धवटच राहतात.असे न करता एकावेळी एकच काम करावे.असे केल्याने एकाच कामात पूर्ण लक्ष्य दिल्या जाते व काम वेळेवर पूर्ण होते आणि अधिक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ही होते.काम पूर्ण झाल्याचे समाधानही लाभेल.म्हणून एकावेळी एकच काम हातात घ्यावे व पूर्णत्वास न्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....9421839590 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - बैलपोळा* आला श्रावण सरत आनंदोत्सव भरला मनात अवनी हसली हिरवे साज नेसत... नंदीबैलाच्या नावाचा सर्जा राजाचा जोडीचा सण आला आवडीचा बैलपोळा सगळ्याच्या घरात... कृतज्ञ आपला व्यक्त कराया बळीराजा लागला पोळा साजरा कराया... हर सालातून एकदा बळीराजा करीतो तूझी पूजा मनोभावाने ओवाळूनी दान मागितो भरभराटीचा... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरा मित्र* रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment