🌸💐✍💐🌸 *🌹ध्येय🌹* शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?" त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?" त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?" त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन." त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...." गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता. वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते. आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे." शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला .. *"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"* *धन्य ते शिक्षक व धन्य तो विद्यार्थी !*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment