आत्मसात केलेले ज्ञान
एका महात्म्याचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यूजवळ आला, तेव्हा ‘वारस कोणाला करावे ? कुणाला गादी द्यावी’, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने दोन फळे घेतली. त्या शिष्यांना एक-एक फळ दिले आणि सांगितले, ‘‘ही फळे अशा जागी जाऊन खा की, तिथे तुम्हाला पहाणारा कुणीच नसेल.’’
एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला; पण कुणी नाही, असे स्थानच त्याला सापडले नाही; कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले.
〰 संकलित
No comments:
Post a Comment