जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
*एखादे काम करताना चित्त शांत असले म्हणजे ते काम अधिक सुंदर होत असते, चित्ताचे समत्व हा एक मोठाच गुण आहे.आणि समत्व हीच जीवनाची कला आहे.*

   *कोणतंही कर्म करणाऱ्याची मनोवृत्ती उच्च दर्जाची असावी लागते.खरं तर स्वतःसाठी केलेले कर्म सर्वसामान्य मध्यम प्रतीच असतं. दुसऱ्याच्या हितासाठी केलेले कर्म सर्वश्रेष्ठ असतं.समाजाच्या सेवेसाठी केलेलं कर्म हे उच्च दर्जाच असतं.अशा कर्मातूनच आपल्याला मुक्त होता येतं.*

कोणत्याही कर्माची श्रेष्ठता कर्म करणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते.जगातील सर्व सुंदर गोष्टींची निर्मिती सुंदर विचारांनी नटलेल्या सुंदर कर्मातूनच होत असते.
*कर्म हे जीवनविकासाचे एकमेव साधन आहे.*
कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे.म्हणूनच टाँलस्टाँय यांच्या विचाराने कर्म म्हणजे कार्यमग्नता.
 *" कार्यमग्नता ही मानवी जीवनाची अटळ अशी व्यवस्था आहे ."* मानवाच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्विक असते.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment