🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* *माणसाचे जीवन हे विद्येवाचून निरर्थक आहे.* विद्येसारखी शोभा देणारी ,दुसरी कोणतीच वस्तू नसते. *विद्या* ही माणसाचे आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे कल्याणाची काळजी घेते,व कौटुंबिक उदासिनता घालवते.आणि आपली कीर्ती दशदिशांमध्ये उजळविते.म्हणूनच विद्या ही जणू आपली कल्पकता आहे असे म्हटले आहे. विद्येविना मनुष्य पशूच असतो. विद्यारूपी धन हे सर्व धनापेक्षा अधिक मौलिक आहे.आपल्या जीवनात ह्या रत्नरूपी विद्येचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे हे ह्या श्लोकांवरून अधिक कळून येते. "किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनःl अकुलीनोsपि विद्यावान देवैरपि स पूज्यते l l" *विद्याहीन माणसाच्या थोर कुलाचा काय उपयोग? विद्वान मनुष्य कुलीन नसला तरी त्याची देवदेखील पूजा करतात.* आपल्या सुखी जीवनाची पायरी आहे विद्या.ज्ञानमुळं का जगावं आणि कस जगावं हे कळत.आणि असं जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कस असावं हा प्रश्न ??कधीच पडत नाही.ज्ञानाचा हा प्रकाश सर्वांमध्ये सर्वोतपरी सततचा असावा आणि पसरावा. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन/संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड

No comments:

Post a Comment