✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ : हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले 💥 जन्म :- १९५० : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान 💥 मृत्यू :-  १९९९ : हसरत जयपुरी, गीतकार. २००२ : वसंत बापट, कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेचं बालकुमार साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली होणार लोणावळ्यात.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : 2017 चे रेल्वेचे नवे वेळापत्रक 15 ऑक्टोबरपासून पासून अमलात येणार. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पुरवठा पूर्ववत होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज जे पी ड्यूमिनी याचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. मात्र कमी ओव्हर्सचे सामने खेळणार असल्याची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुखापतग्रस्त अक्षर पटेलऐवजी भारताच्या वन डे संघात रविंद्र जाडेजाचा समावेश. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांसाठी निवड.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वच्छता आणि आरोग्याचा संबंध* जो रस्त्यावर कुठेही थुंकतो किंवा जी व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत त्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणामुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता .......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/28R34BWyB9J *स्वच्छ भारत ; सुंदर भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वामी रामानंद तीर्थ :  एक पावन स्मृती*                                                                                         (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष)         राष्ट्रपुरुषांविषयी अधिकाधिक माहिती असणे म्हणजे प्रेरणेला मिळणारा जिवंत झराच होय.  राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील घटना आपल्या जीवनमार्गाला एक चांगले वळण देतात. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शब्दबद्ध असलेले स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी तथा स्वामी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ होय.       पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे केवळ हैद्राबाद मुक्ती संग्रामाचेच सेनानी नव्हते तर भारतीय संघराज्य पूर्ण करण्याची एक ऐतिहासिक कामगिरी त्यांनी पार पाडली त्या दृष्टीने युग कर्त्या व्यक्तीत त्यांची गणना व्हायला पाहिजे. त्यांनी भूतपूर्व हैद्राबाद राज्यात इतिहास घडविला व त्या राज्याचा भूगोल ही बदलला. गांधी युगाचा आरंभ झाला होता आणि असहकाराच्या आंदोलनाची चिन्हे दिसायला लागली होती. कलकत्त्यास लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात असहकारितेचा ठराव पास झाला होता सारा देश खडबडून जागा झाला होता बहिष्काराचा चतुसूत्री कार्यक्रम आखण्यात आला. १९२६ च्या एप्रिल महिन्यात मुंबई गिरणी कामगार संघाचा उप संगठक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी काम पाहिले. १९२९ मध्य ग्रामीण भारताच्या एका कानाकोपऱ्यात चाललेल्या एक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा हैद्राबाद संथानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगे या छोट्याशा गावी शिक्षणाची मशाल पेटवली. हैद्राबादच्या स्वातंत्रोदोलनाच्या इतिहासात १९३७ व १९३८ ही वर्ष अत्यंत घडामोडीची मानली जात, कारण याच काळात राजकीय विचारांना स्थैर्य प्राप्त होऊन त्यांना एक विशिष्ठ रऱोप प्राप्त झाले.           हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा विभागासाठी त्या भागातील जागरूक लोकांना एकत्र आणणारी संगठना नव्हती तेव्हा आंध्र व कर्नाटक परिषदांप्रमाणे महाराष्ट्र परिषद सुरू करण्याचा विचार स्वामी रामानंद यांनी केला त्यावेळी त्या परिषदेचे ध्येय स्पष्टपणे राजकीय असावे असे वाटू लागले होते केवळ सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक कार्य हीच तेवढ्या काळाची निकड नव्हती राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्या शिवाय कोणतीही सामाजिक वा साहित्यिक प्रगती साधने शक्य नाही याची पूर्ण जाणीव स्वामीना झाली होती. महाराष्ट्र परिषदचे पहिले आदिवेशन १९३७ च्या उन्हाळ्यात परतुरेत भरण्यात आले होते अध्यक्ष म्हणून गोविंद राव नानल होते परतूरच्या अधिवेशनामुळे मराठवाड्याच्या अंतरंगाचे दर्शन झाले राजकीय संघटनांचा मार्ग खुला झाला. कुठल्याही परिस्थितीत आगेकूच करण्याचा निर्णय झाला. औरंगाबाद येथील सरकारी इंटरमीजीयट कॉलेजातील विधार्थ्यांची मने देश भक्तीने भारावून गेली होती श्री गोविंद भाई श्राफ हे त्या वेळी त्या कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यांनी विध्यार्थ्यांच्या मनावर बी रुजवले होते. त्यावेळी सरकारी शाळातुन आसफजाही घराण्याच्या उत्कर्षासाठी एक प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती. ब्रिटिशांच्या गॉड सेव द कींग घ्यायची ती प्रार्थना होती वर्गसुरु होण्यापूर्वी संस्थानभर सर्व सरकारी शाळेतून हे गीत मुलांच्या कडून सांघिक स्वरूपात म्हणून घेतले जाई. हे गीत म्हणने म्हणजे आसफजाई घराण्याशी आपण राजनिष्ठ राहू अशी प्रतिज्ञा होती. तरुणांना हे पटले नाही त्या विरूद्ध जोरदार बंड करण्याचा विधार्थ्यांनी प्रयत्न केला व त्याऐवजी वंदे मातरम हे गीत गाऊ इच्छित होते. १४ जानेवारी १९४३ मध्य स्वामी रामानंद तीर्थ यांना हैद्राबादच्या केंद्रीय कारागृहात स्थानबद्ध असताना त्यांनी मानवाला दिलेला संदेश. जगात वावरत असताना जगाचा परिणाम होऊ देऊ नका, आत्मा सर्वव्यापी आहे मग हे हेलकावे व हिंसके का जाणवावेत?   जीवनाचा प्रवाह संथ पणे वाहू द्यावा, त्यावर वादळे उठू देऊ नयेत ही वादळे आसक्तीच्या भावनेतून निर्माण होतात. कुणा विषयी व कशा विषयी आसक्ती बाळगू नका पूर्ण पणे अलिप्त राहा असा संदेश त्यांनी आपण्याला दिला. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम रीतसर शरण आला. अशा रीतीने यथाविधी केलेला संकल्प सिद्धीस गेला.                                                                  शेख युसूफ मौलासाब शिक्षक रामाचातांडा/लोहा मो.९८६०९३८१७४                                                           -सदरील लेखक- शिक्षक,साहित्यिक, विषयतज्ज्ञ आहेत.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी ही संपत नसतो *संकलन : सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाडा केव्हा स्वतंत्र झाला?* 👉      १७ सप्टेंबर १९४८ *२)  हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी कोण्या संस्थानिकाच्या ताब्यात होते?* 👉        निजाम *३)    हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली?* 👉        स्वामी रामानंद तीर्थ *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 दयाकर रेड्डी, येताळा 👤 श्रीनिवास वंगल 👤 जितेंद्र टेकाळे, कुपटी, माहूर 👤 ज्ञानेश्वर पाटील हिवराळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   "अच्छे दिन" मच्छर म्हणाला आमचे अच्छे दिन आले बरे झाले कोळशाने काळे तोंड केले कोळसा म्हणे आमचेही अच्छे दिन येतील वाईट दिवस सरले की चांगले दिवस येतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला कर्म आणि कर्तव्य ह्या दोन गोष्टी त्याच्या प्रारब्धाकडे घेऊन जातात, पण प्रारब्ध कधीच कर्म आणि कर्तव्य सोडून बलवत्तर होतं नाही.उगीच प्रारब्धावर विसंबून राहून आपण आपले कर्म आणि कर्तव्य करणे थांबवू नये. आपण आपल्या जीवनात सातत्याने चांगले कर्म आणि घांगले कर्तव्य कसल्याही प्रकारची मनात अपेक्षा न बाळगता निःसंकोचपणे केले तर आपण आपले प्रारब्ध नक्कीच चांगले बनवू शकतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *मनीमाऊ* मनीमाऊ मनीमाऊ धसका तुझा किती खाऊ. दुध राहिल बाहेर की लागतेस गटागटा पिऊ. डोळे झाकून दुध पितेस जग सार आंधळच समजतेस . अंग तुझे गं किती मऊमऊ गालीचाच भासतॊ पाठीवर पाहू. घारे घारे तुझे चमकदार डोळे मिशीवरून जिभ फिरवत लोळे. तुला असतात पाठीवर पट्टे तु तरी वाघाची मावशीचीच वाटे. मनीमाऊ किती ग तू धाडसी उंदरांना एका झपाट्यात पकडशी, तुला पाहताच ते पोबारा ठोकतात मधूनचबिळातून डोकावून बघतात. कितीही उंचावरून टाकतेस उडी तरीही पायावर असतेस खडी. तुला नाही कधी मार कसा लागत हाडबिड तुझी  नाहीत कधी तुटत. तुला बाई मोकळी सारीच घरे म्याऊम्याऊ करत घरभर फिरे. सौ.सविता धर्माधिकारी. लातूर मो.न.९४२१३६९७३७ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                      *त्याग* ७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विनू नावाचा एक ६-७ वीतला मुलगा होता. तो मोठ्या वाड्यात राहायचा. त्या वाड्याच्या परसात फणसाचे झाड होते. एकदा त्या झाडाला मोठमोठे फणस लागले. विनूच्या आईने पिकलेले फणस झाडावरून काढून त्याचे गरे काढले. मग तिने विनूला पाच द्रोण आणायला सांगितले. त्या पाच द्रोणामध्ये तिने थोडे थोडे फणसाचे गरे घातले. आता विनूला काय वाटले, पहिला द्रोण आई मलाच देणार. आईने सांगितले, 'जा हा द्रोण देवापुढे ठेऊन देवाला नमस्कार करून ये.' विनूने तसे केले. आता आई मलाच देणार तेवढ्यात आई म्हणाली, ''हा द्रोण शेजारच्या काकूंना नेऊन दे.'' नंतर उरलेल्या दोन पैकी एक द्रोण आईने विनूला दिला आणि म्हणाली, ''हा द्रोण गल्लीतील त्या काकूंना देऊन ये.'' शेवटी विनू रागावला आता हा शेवटचा द्रोण कोणासाठी असेल असे त्याला वाटले; पण तेवढ्यात आईने शेवटच्या द्रोणातील एक गरा विनूला भरवला. तेव्हा विनू म्हणाला, ''काय ग आई आपल्या घरचा फणस गावाला आधी आणि मला शेवटी होय, का असे केलेस ?'' तेव्हा आई म्हणाली, ''विनू आपल्याला फणस कोणी दिला ? त्या झाडाने. ते झाड आपल्या दारात कसे वाढले ? देवानेच दिले ना ते आपल्याला ? मग केवळ आपणच त्याची फळे खायची ?'' तेव्हापासून कधीही विनूने मी, मला, माझे असे केले नाही; म्हणूनच तो विनू म्हणजे आचार्य विनोबा भावे देवाचे भक्त बनले. संस्कृतमधील भगवद्गीता त्यांनी मराठीत लिहली. ती म्हणजे गीताई. *तात्पर्य :-* आपल्यालाही देवासारखे व्हायचे आहे ना ! मग आपणही दुसऱ्यांना साहाय्य करायचे, भांडायचे नाही. आपल्याला काही चांगले मिळाले की, इतरांना द्यायचे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment