✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /08/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९२० : अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला. 💥 जन्म :- १८७२ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :-  १९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात 72 तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करा. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजर राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *मी मुख्यमंत्री पदी तर भाजपाच्या प्रदेशाध्यपदी रावसाहेब दानवेच राहणार असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *एनडीआरएफच्या 119 टीम्सनी आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये पूरात अडकलेल्या 1334 लोकांची सुटका केली, 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपुर - राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांना आज दुपारी नागपुरात देवाज्ञा.* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली: 'ब्लू व्हेल' गेमविरोधातील याचिका हायकोर्टाने दाखल, 22 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी* ----------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर - शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कॉमन सेन्स......!*  .........म्हणजे काय ? जी व्यक्ती वेळ, काळ, परिस्थिती नुसार स्वतःचे वर्तन ठेवते तिला कॉमनसेन्स आहे असे म्हणतात तर जे याविरूध्द राहतात किंवा वागतात त्यांना नॉनसेन्स म्हणतात. ............. लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/jQ7Su9Fc4xD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रत्नागिरी*          रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *"" फ्रेश सुविचार ""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जीवनाचे सत्य आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता?* 👉🏼 अहमदनगर *२) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?* 👉🏼 मुंबई *३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?* 👉🏼 कर्नाळा (रायगड) *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 अगस्त्य तावरे 👤 गजानन देवकर 👤 गणेश थेटे 👤 भाग्यश्री बिराजदार, लातूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बनाव " स्वतःला पाहिजे तसा इथे बनाव केल्या जातो धोका दुस-याला नाही स्वतःला दिल्या जातो कितीही बनाव केला तरी तो स्वतः फसतो बनाव करणारालाच त्याचा फटका बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,* *तर जरा विचार करून पहा* *"नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🌼 बालगीत 🌼* आली आली चिऊताई इथे तिथे चिमण्यांची झाली चिवं चिवं सुरू पाठोपाठ लागल्या गं पहा सार्या अवतरुं ।।धृ।। येगं चिऊ नको भिऊ अंगणात तुरुतुरु सिध्दी लागली गं बोलू गाणे तुझे चुरुचुरु ।।१।। पाण्यामध्ये साचलेल्या चल बाई उड्या मारु भिजण्यात काय मजा सांग कोणास विचारु ।।२।। चिऊताई चिऊताई किती बाई हाका मारु दुध-भात म्हणते गं तुला इवलाच चारु ।।३।। तुझ्या साठी म्हणते गं दुधामधे पोळी चुरुं नको उडुनी जाऊस पण अशी भुरुभुरु ।।४।। पंखावरुन इवल्या तुझ्या म्हणते ग फिरुं थांब जरा नको बाई पळू अशी तुरुतुरु ।।५।। ----सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [ ठाणे येथून प्रकाशित होणार्या 'छोट्यांचा आवाज' दिवाळी अंक २०१२ मधून प्रकाशित ही माझी कविता ⬆ ] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *राजा आणि चोर* एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे जातील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

No comments:

Post a Comment