✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६० : भारताच्या मिल्खा सिंगने रोम येथील ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विक्रम तोडला. 💥 जन्म :- १८९२ : सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  १९७२ : अल्लाउद्दीन खॉं, सुप्रसिद्ध सरोजवादक. १९७९ : जे. जी. नवले, नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *महाराष्ट्रात श्रीचे विसर्जन उत्साहात संपन्न, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप, गणेश विसर्जनादरम्यान राज्यात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्रि सिद्धारमैय्या यांनी केला गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केली डिफर्ट अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल योजना, सात हजार भारतीयांना बसणार फटका* ----------------------------------------------------- 4⃣ *बंगळुरू- राजरेश्वरी नगरमध्ये वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश याची राहत्या घरात गोळी घालून केली हत्या* ----------------------------------------------------- 5⃣ *सातारा- कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हतिन क्याव यांची भेट* ----------------------------------------------------- 7⃣ *शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत! प्राथमिक शिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मोबाईल डिजिटल शाळा* डिजिटल म्हणजे काय ? असा प्रश्न आज प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पडलेला आहे. कारण सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. राज्यातील एक तरी शाळा रोज डिजिटल होत असल्याची बातमी विविध वृत्तपत्रातून वाचण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे डिजिटल होय......लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3UyeQNbhK1y आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मिल्खा सिंग* जन्म : ०८ ऑक्टोबर १९३५ ठिकाण : फैसलाबाद देश : भारत खेळ : धावपटू फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली. १९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्याने आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्याने चारशे मीटर शर्यतीत त्याने आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तो कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावला होता. त्याआधी त्याने १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्याचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचा आदर्श होता. त्याने जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्याने विक्रम मोडला ते बूट त्याने राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचा मुलगा ‍जीव सिंग हा प्रसिध्द गोल्फपटू आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *जागतिक महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 मार्च 2) *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 सप्टेंबर 3) *बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 03 जानेवारी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ मुळावकर कल्पना धोंडू (स शि) जि प प्रा शाळा बामणी बु 👤 सुनील ठाणेकर, सहशिक्षक, देगलुर 👤 महेश वडजे 👤 रोहित पोकलवार 👤 प्रशिक कैवारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " शर्मिंदे " कोणाचे निंदा कोणाचे वंदा आहे काहींचा माती खाणे धंदा आहे बरं म्हणा की वाईट ते माती खातात उघड झाल की ते शर्मिंदे होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🔻🔻🔻🔻🔻🔻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अज्ञानाचा अंधार सारुन ज्ञानाचा प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून जीवन समृद्ध करण्याचे महान कार्य केवळ ज्ञानी शिक्षकच करतात.त्याही पलिकडे जाऊन एक सुजाण, समृद्ध ध्येय उराशी बाळगून एक आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यक्षम असतात.त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड ज्ञानरुपी यज्ञाच्या चाललेला असतो.अशा शिक्षकांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करुन घ्यावे ही संधी सोडू नये.त्यांच्या बद्दलची कृतज्ञता नेहमी आपल्या हृदयात साठवून ठेवावी.ती नेहमी आपल्या भविष्यासाठी ज्ञानरुपी शिदोरीच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📚📖📙📘📚📖📘📖📚📘 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनगाणे* जीवन जगताना भेटतात ना ना प्रकारची माणसं म्हणे हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई गातील एकतेचे जीवनगाणे जीवन चालतचं राहतं श्रमाचे चालते हात रहावे आले लाखो अडथळे तरी जीवनगाणे गात रहावे उगीच जाती-धर्म-पक्ष यांचा करू नका उदो उदो तुम्ही मानवता धर्म खरा पाळा हीच शिकवण शिकलो आम्ही. कवी : प्रमोद जाधव 9403669738 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरे काय नि खोटे काय* एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, *तात्पर्यः* ओठात एक आणि पोटात एक वागणाऱ्या माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरी.ते म्हणतात न गळ्यात माळ आणि पोटात गाळ तसे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment