✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक हृदय दिन आणि जागतिक फार्मासिस्ट दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली. 💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य १९६२ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लोकांनी खादीच्या वस्तू देण्यास सुरुवात केली, खादी अभियान व्यापक होण्याची गरज, दिवाळीत खादीच्या भेटवस्तू द्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *एक्झिट पोलनुसार जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याचा अंदाज*  ----------------------------------------------------- 3⃣ *31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक- राज्य सरकार विरुद्ध 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, जयंत पाटील यांची बैठकीत माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे- जिल्ह्यातून शेतकरी कर्जमाफीसाठी 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मिळविले नंबर एकचे स्थान* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पर्यटकांनी जबाबदारीने वागावे* आपल्या भारतीय परंपरेला एक इतिहास आहे. आणि हा सर्व इतिहास आपणास गड आणि किल्ल्याच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरुन लक्षात येते. अनेक इतिहासतज्ञ या पुरातन वस्तूवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Y3JzBf5ntVj आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬  *अंबादेवी (अमरावती )* महाराष्ट्रातील अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी  जोडला जातो. मोगलांनी १५०० च्या कालखंडात वर्‍हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदूमंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यांत अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन/ स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने व काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत योगदान दिले. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. - रवींद्रनाथ टागोर  *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 मदर तेरेसा *२) रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 कमलादेवी चटोपाध्याय *३) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण?* 👉 आरती सहा(गुप्ता) *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रा. तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड 👤 सुयश पेटेकर, करखेली 👤 श्यामसुंदर मोकमोड, सहाशिक्षक, येताळा 👤 योगेश धनेवार 👤 शिवशंकर नर्तावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तमाशा " हल्ली पातळी सोडून यांची टीका आहे तमाशाही यांच्या पुढे एकदम फिका आहे तमाशा पेक्षा ही यांची खालची भाषा आहे यांच्या कडून चांगल्याची मग काय आशा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?*' *त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ, शोभीवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.* *"मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये."* ••✹✹‼ *रामकृष्णहरी* ‼✹✹•• 🌲🌲🌲🌲🌲🌲 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपणास जर असे वाटत असेल की,आपण आपल्या जीवनात आपल्या शिवाय इतरांना कधीच काही दिले नाही किंवा काहीच केले नाही त्यामुळे आपल्या जीवनाला आता काहीच अर्थ राहिला नाही.असं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे महत्व कमी करत आहात.अजुनही तुमच्या हातून बरेच काही चांगले घडू शकते.तुम्ही आतापर्यंत काही केले नाही याची तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुमचे मन तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे असे समजावे. अजुनही तुम्ही इतरांसाठी खूप काही करु शकता.फक्त तुम्ही आणि तुमची मानसिकता बदलून टाका तेवढ्याच जोमाने काम करण्यासाठी पुढे व्हा आणि थोडा तुमच्या मनालाच विचारा की,आपण आपल्या व्यतिरिक्त दुस-या साठी काही केले का ? नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी करत आहात मग तुम्ही नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करायला लागलात हे निश्चित कळेल..तुम्ही काहीतरी करत असल्याचे आणि जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ही आमुची शिदोरी* या गोड नातवांचा आधार या मनाला अस्सा सुरेख देती आकार जीवनाला आहे अपूर्व भारी ही आमुची शिदोरी जगणे सवेसवे तर उपचार ते कशाला ? नांदे घरात शांती दाटे उरी निवांती येतो परीस भेटी हुंकार द्यावयाला वाढे कणाकणाने सुख हे मणामणाने हा कल्पवृक्ष आहे हळुवार या जिवाला चैतन्य या घराचे ये नेहाळ भावनेचे चिंता फिरून जाई माघार घ्यावयाला डाॅ. शरयू शहा, मुंबई. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दुष्टाचा स्वभाव* *एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे* पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले. याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई. पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी. धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले. *तात्पर्य* : - *वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.*. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* http:/www pramilasenkude blogspot.in. 📞9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment