✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी १९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ओबीसींची ‘क्रीमी लेयर’ मर्यादा आठ लाख, जातींच्या पोटवर्गीकरणासाठी आयोग, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 2⃣ *१२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही. दाभोळकर-पानसरे हत्याकांड खटल्यावरील सुनावणीत हायकोर्टानं व्यक्त केली चिंता.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 5.0 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *गेल्या आठ महिन्यात स्वाइन फ्लूने भारतात 1094 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर मात करुन उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - बी.साई प्रणीतने इंडोनेशियाच्या अॅन्थोनी सीनीसुकावर 14-21, 21-18,21-19 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.* ----------------------------------------------------- 7⃣ *ए. बी. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपद सोडले* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- दुसरी वन डे आज, विजयाचा अश्वमेध दौडणार, लंकेला पराभूत करण्यासाठी भारत सज्ज* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गजानना श्री गणराया* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *कंधारचा किल्ला* कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. *स्थापना* या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्‍या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्‍यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपले अज्ञान ओळखणे हीच ज्ञानप्राप्ती ची पहिली पायरी होय* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "अभिनव भारत" या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली?* 👉🏼 वि. दा. सावरकर *२) सावरकराना काळ्या पाण्याची शिक्षा कोठे झाली?* 👉🏼 अंदमान *३) वि. दा. सावरकराना "स्वातंत्र्यवीर" ही पदवी कोणी दिली?* 👉🏼 प्र. के. अत्रे *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 जी. एस. ऐनवाले, सेवानिवृत्त 👤 हणमंत बोलचटवार, धर्माबाद 👤 संजय पाटील, पुणे 👤 ऋषिकेश शिंदे 👤 मा. श्रीकांत भुजबळ, तहसीलदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तोंड गोड " साखर खाऊ घालून तोंड गोड केलं आहे शब्द पाळल्याने लोकांना नवल झालं आहे दिला शब्द पाळला म्हणजे नवल वाटतं सांगितलेल सारं काही मग सहज पटतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनात ० त ९ हे अंक अतिशय महत्वाचे आहेत. कारण या अंकाशिवाय कोणताही जीवन व्यवहार होत नाही.परंतु आम्ही काही अंकांना शुभ मानतो तर काहींना अशुभ.असे मानणे म्हणजे अज्ञान पणाचे लक्ष्मण म्हणावे लागेल.० ते ९ या अंकातल्या एक जरी अंक कमी केला तरी कोणतेही गणित जुळत नाही.गणिताचेच नाही तर जीवनात व्यवहारात देखील कोणत्याही अंकाला सोडता येत नाही.म्हणून ० ते ९ या अंकांना जीवनात समानतेचा दर्जा देऊन आणि तितकेच प्रत्येक अंकांना महत्वाचे मानून जीवनात मनात काही एक अविचार किंवा संकोच न आणता ते सहज स्विकारले पाहिजे. कोणत्याही अंकांना कमी दर्जाचे न लेखता सगळ्यांना सारखेच मानने हे सुज्ञ आणि शहाणपणाचे माणसाचे लक्षण समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔰हरवलेले डोळे🔰* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आज जरा तिला निरखून मी पाहिले भावनाशुन्य मन तिचे हरवलेले डोळे... थक्क मी झालो अवाक होऊन बसलो असा कसा तिच्याशी मी रिता होऊन गेलो... कधी केंव्हा कशी ती माझ्यापासून दूरावून गेली कळी माझी गूलाबाची कशी ही सूकून गेली... गूंग मी होतो नूसता पैश्यासाठी धावत मी होतो सार वैभव माझ्या जवळी अशा भ्रमात मी होतो... पैसा अडका नको माझा फक्त प्रेम हवे होते तिला रुपे अंलकार दागिने नाही तर वेळ हवा होता साधा... ऊशिर खूप होता झालेला तूटले होते तिचे मन भोळे येईल का तिच्या नयनी चमक होते तिचे हरवलेले डोळे... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏शब्दांकन/समूह सदस्या🙏* *✍ सुचिता नाईक* *जि.प.उच्च प्रा.शाळा सिंदगितांडा* *ता. किनवट जि.नांदेड* *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/groups/100274427177019/ ➖➖➖🌀🙏🌀➖➖➖➖ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लबाड गाढव* एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment