✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यात 92 हजार 283 कोटींचा जीएसटी महसूल जमा झाल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पातून 945 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले.* ----------------------------------------------------- 4⃣ *परभणी : सेलू तालुक्यातील पिंपरी गोंडगे येथील जि.प.शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर भरवली शाळा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पाटणा - बेहिशेबी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून आरजेडी नेता तेजस्वी यादवची चौकशी, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी केली जात आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : इयत्ता 10च्या पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर. राज्याचा निकाल 24.44 टक्के.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक, बैठकीनंतर राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता - सूत्र.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" लिहिण्याला पर्याय नाही "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lihinyala-pryay-nahi वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सिद्धटेकचा सिद्धिविनायक* सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळीमखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. (हल्ली पूल झाला आहे, असे समजते.)           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो ; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नागभूषण माकोड, येवती 👤 अरुण चव्हाण 👤 गणेश बोळसेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "निसर्ग " आपत्ती व्यवस्थापनाचे नियम घोकलेले आहेत तरीही निसर्गाच्या पुढे मानवाने हात टेकलेले आहेत निसर्गाच्या पुढे मानवाचा निभाव लागत नाही निसर्ग कसा चांगला वागेल माणूस चांगला वागत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌹शाळा 🌹 ------------------ स्वच्छ सुंदर शाळा माझी छान, आम्हा ती जपते तिचा आम्हा अभिमान. शिस्तीचे आम्हा मिळती हो धडे, रोज देती हो आम्हा शिकण्यास पाढे. क,ख,ग,घ अक्षर गिरवितो, हूशार होऊन मान मिरवितो. शाळेत आमच्या मिळते सर्व, म्हणूनच तिचा आहे आम्हा गर्व. घेती तिथे खेळ गोष्टी आणि गाणे, शाळेत आम्ही जातो अति आनंदाने... आनंद यडपलवार,जारीकोटकर प्राथमिक शिक्षक, प्रा. शा. पांगरी ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विद्या विनयेन शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. *तात्‍पर्य :-* आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment