✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्र सरकारी कर्मचा-यांचा एक टक्क्याने महागाई भत्ता वाढणार* ----------------------------------------------------- 2⃣ *धम्म चक्र परिवर्तन दिनी राज्यातील 3692 ग्रामपंचायतींचे मतदान होणार नाही, शासनाने काढला अध्यादेश* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर : देशातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी लढा उभारणार - खा. राजू शेट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला तर 17 ला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड- 30 सप्टेंबरला भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतची शिष्टमंडळाची चर्चा फिस्कटली.* ----------------------------------------------------- 7⃣ *धावपटू प्रियंका पवार 8 वर्षांकरीत निलंबित.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- मुंबई : आजचे पेट्रोलचे दर प्रति लिटर- ७९.४८ रुपये, डिझेलचे दर प्रति लिटर -६२,३७ रुपये.* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील. शिक्षकांनी दुःखी होऊन................ लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा* वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा (१३ सप्टेंबर, इ.स. १९८०:महाराष्ट्र, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा भारतीय राष्ट्रीय संघाचा संघनायक होता.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ...पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते. रामदास पेंडकर(तानुरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) अ जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 रातआंधळेपणा *२) ब जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 बेरीबेरी *३) ड जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 मुडदूस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कु. श्रेया रमेश ईटलोड, कुंडलवाडी 👤 कबीरदास गंगासागरे, माध्य.शिक्षक जि. प.हा. करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धंदा " धंदा करायला आता कावळेही पाळले आहेत तुम्हीच सांगा मित्रांनो कोणते प्राणी टाळले आहेत प्राणी पक्षी ही आम्हाला धंद्याला पुरत नाहीत मानव कुठल्या प्राण्याचा सांगा धंदा करत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगल्या माणसांनाच जीवनाच्या खडतड प्रवासातूनच चांगले जीवन जगण्याचा मार्ग काढावा लागतो.कारण त्यांना त्यांच्या जीवनात जीवन चांगले जगायचे असते.आपल्या जगण्याबरोबरच इतरांच्या जगण्याचाही विचार ते करत असतात. एवढेच नाही तर आपल्या जगण्याच्या पद्धतीमुळे इतरांना त्रास होऊ नये याचा नेहमी चांगला विचारही करत असतात. अशी माणसे कळत नकळत इतरांना व समाजाला खूप काही प्रेरणा देऊन जातात. अशा माणसांचा समाज नेहमी आदर करत असतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📙🌺📙🌺📙🌺📙🌺📙🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोण आहेस तू ?* शोधू कुठे तुला कोठे आहेस तू ? आई माझ्यासाठी कोण आहेस तू ?.....||१|| माझ्या अंतरीचा श्वास आहेस तू ! माझ्या जगण्याचा ध्यास आहेस तू !.....||२|| माझ्या जीवनाचा रंग आहेस तू ! माझ्या स्वप्नामध्ये दंग आहेस तू !.......||३|| माझ्या पाठीवरी थाप आहेस तू ! आई असूनही बाप आहेस तू !......||४|| मूल्ये संस्कारांची ठेव आहेस तू ! आई माझ्यासाठी देव आहेस तू !......||५|| -- श्री. संजय रुस्तुम घोगरे औरंगाबाद.9923463899 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तीन माशांची गोष्ट* स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला. *तात्पर्य* - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment