✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला. 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी 💥 मृत्यू :-  १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती  २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ब्रिक्‍स संमेलन: ९व्या ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मंत्रीमंडळाचा विस्तार, नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा आणि गंगा शुद्धिकरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर : गृहमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे नागपुरात थोड़े काही झाले तरी राष्ट्रीय बातमी ठरते, नागपुरात आता पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर: राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील यांचे निधन* ----------------------------------------------------- 5⃣ *सांगली : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे, व्हीडीओ आणि मेसेज पाठवणाऱ्या चार जणांना अटक. व्हॉट्स अँप ग्रुपवर मेसेज आढळले, या ग्रुपच्या अँडमीनवरसुद्धा कारवाई होणार : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे* ----------------------------------------------------- 6⃣ *पाचवी वन-डे : भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच, जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सीरीज, विराट कोहलीचे 30 वे शतक पूर्ण* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनीस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारिया शारापोवाला पराभवाचा धक्का* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय संस्कृती वाचविण्याची गरज* भारतीय संस्कृतीला एक परंपरा आहे, इतिहास आहे. पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहतात. भारतीय आदर्श संस्कृती विषयी अभ्यास करण्यासाठी विदेशातील अनेक ज्ञानी लोक याठिकाणी येऊन गेल्याचे इतिहासात पुरावे मिळतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/hSSioKE1NZo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बल्लाळेश्वर (पाली)  हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडकऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.      *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ सकारात्मक विचार सर्व निराशा दूर करते. सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता?* 👉🏼      बुध *२)  सूर्यमालेतील शेवटचा ग्रह कोणता?* 👉🏼      प्लूटो *३)  सूर्यमालेत कोणत्या ग्रहाभोवती कडे आहेत ?* 👉🏼      शनि *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 मुकेश धर्मले, नांदेड 👤 सायरेड्डी सामोड, सहशिक्षक, येताळा 👤 जयेंद्र कुणे 👤 मुकेश पाटील 👤 श्रीपाद जोशी येवतीकर 👤 संगमेश्वर नळगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धमकी " प्रेमाने जग जिंकता येते धमकी देऊन नाही मनात शिरायचे कोणाच्या तर मुजोर होऊन नाही मनात घर करायचे तर मुजोरी कशी चालेल मुजोरी करणाराला प्रेमाने कोण बोलेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.* *चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पर्जन्यराग तापल्या धरेवर थेंबांची शिंंपण ओलेल्या सरीवर स्वप्नांची गुंफण तापल्या दिशांना मृदगंधाची ऊटी थंडगार वार्‍याची हलकेच मिठी म्यॅओ म्याॅओ मोरांचा हुंकार हिरव्या कोंबावर जगाची मदार शहारा पानांवर थेंबाची नशा सरीत बांधल्या ऊद्याच्या आशा पिकल दाणा धरतीला पान्हा पहिल्या थेंबाला गार्‍हाण घाला अंजना कर्णिक , मुंबई ९८२०७५८८२३ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वक्ता आणि श्रोते* एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले. तात्पर्यः काही ठिकाणी आपल्या युक्तीचा वापर करून घेणे गरजेचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 📞9403046894 http://www pramilasenkude blogspot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment