✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :-  २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यापासून स्वाईन फ्ल्यूने मध्यप्रदेशात 44 जणांचा मृत्यू.* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यात दोन नदी जो़ड प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - नितीन गडकरी* ----------------------------------------------------- 3⃣ *वर्धा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील 10 शिक्षण संस्थांचे (NON- AICTE) अभ्यासक्रम केले बंद, 9 संस्था विदर्भातील* ----------------------------------------------------- 4⃣ *नांदेड - कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जात मुदखेड तालुक्याचे नाव नसल्याने शेतकरी त्रस्त, शेकडो शेतक-यांनी तहसिलदाराना दिले निवेदन* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविली. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने निर्णय.* ----------------------------------------------------- 6⃣ *हुशार विद्यार्थ्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक १० नोव्हेंबरला होणार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आज दैनिक देशोन्नती मध्ये प्रकाशित झालेला लेख *एक दिवस अंगणवाडीसाठी* शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत जावे लागणार, अंगणवाडीच्या ताई ला प्राथमिक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची एक बातमी नुकतेच वाचण्यात आली आणि मराठी शाळांचा दर्जा यापुढे सुधारेल असा एक आशावाद निर्माण झाली.......... हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/NRiJHKMDm4J आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *डेनिस मॅकॲलिस्टेर रिची* डेनिस मॅकॲलिस्टेर रिची  यांचा जन्म: सप्टेंबर ९, १९४१ रोजी झाला. हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते.डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वर्ड विद्यापिठातून पदवि संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला. C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचेप्रमुख विकासक, आणि C ची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&Rम्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. डेनिस रिची बऱ्याचदा "डी एम् आर" (त्यांचा बेल लॅब्जमधील इ-मेल पत्ता) या नावाने ओळखले जातात.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ परिश्रम करूनच जीवनाचा खरा आनंद घेता येतो ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *गोवळकोंडा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या राज्यात आहे ?* आंध्र प्रदेश 2) *फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कोणते आहे ?* कच्छचे रण 3) *टेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात कोणती ?* एअरंडेल टेरिअर’ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 महेश ठाकरे 👤 गणेश कल्याणकर, नांदेड 👤 उमाकांत कोटूरवार, धर्माबाद 👤 पंढरीनाथ डोईफोडे, लोणारकर 👤 गंगाधर गुरलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " कुंपण " कुंपणच जेंव्हा कधी शेत खाते डोक्याची आग मस्तकात जाते असलं कुंपण झोडलं पाहिजे काहीला वेळीच तोडलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला शारीरिक विकार आणि मानसिक विकार हे हतबल करुन टाकतात. त्यामुळे मनुष्याला काहीच करता येत नाही.कोणत्याही कामात मन लागत नाही किंवा कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडता येत नाही.मग तो आपल्या जीवनात निरुत्साही बनतो.अशा रुक्ष जीवनातून मुक्तता हवी असेल तर पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.नियमित ठरलेल्या वेळेत अन्न सेवन करणे,वाईट व्यसनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम करणे यामुळे आरोग्य उत्तम राहील ,तर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी अधिक कामाचा ताण न घेणे,अवांतर गोष्टींना प्राधान्य न देणे, समुहात राहणे, विविध उपक्रमात सहभागी होणे,वाचनात लक्ष केंद्रित करणे अशा विविध गोष्टींमध्ये लक्ष घातले तर मानसिक आजारातून ही मुक्तता मिळू शकते.अशा सवयी मनुष्याने जीवनात सातत्याने ठेवल्यास शारीरीक व मानसिक विकार होणार नाहीत हे निश्चितपणे काही प्रमाणात सांगता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विषय-आक्रंदन* कोणत्याही जीवाचा। न होवो आक्रंदन प्रत्येक सजीवात। फुलावे नंदनवन। दुःख कुणाच्या। पदरी न येवो। न दिसो कुणाचा आक्रंदन। सारेच कसे हसत राहो। वसो साऱ्यांच्या ठायी। दया,क्षमा,शांती। हे सदगुण जोपासून। व्हावे लीन ईश्वराप्रती। उतरु दे स्वर्ग। या भूमीवर। फुले,फळे बहरुन। राहू दे नित्य अमर। सौ.वर्षा भांडारकर. त.मूल.जि.चंद्रपूर. 9422007150 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकार* शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे ! महासागरासारखे ! त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे? तात्पर्य :- कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको. मीच मोठा , महान आहे ही वृत्ती माणसास घातक ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment