✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ स्वभाषा दिन - मोल्दोव्हा. स्वातंत्र्य दिन - त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान. 💥 ठळक घडामोडी :-  १९९१ - किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९७ - पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार. 💥 जन्म :- १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८६ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष. १९९५ -बियंत सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *अमेरिका - पेंटागनच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये 11,000 अमेरिकी सैनिक आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी 70 टक्क्यांच्या वर, मोठ्या प्रमाणात आवक सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ, लाभ क्षेत्रांना मोठा दिलासा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - जे काळ्या पैशाविरोधात लढले नाहीत अशी मंडळी नोटाबंदीवरुन भ्रम निर्माण करत आहेत: अरुण जेटली, अर्थमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या - खासदार विकास महात्मे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *बिहारमध्ये आतापर्यंत पावसामुळे आलेल्या पुरात 103 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत आणि श्रीलंका यांच्यात चौथा एकदिवसीय सामना, महेंद्रसिंग धोनीचा तीनशेवा सामना* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा *" रक्तदान सर्वश्रेष्ठ दान "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sarvshresth-dan अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि मित्रांसोबत शेयर करा वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रांजणगाव* अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीलामहागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूरतालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :-त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुरस्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!!!!!!!!!* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारताचा पहिला उपग्रह कोणता?* 👉🏼 आर्यभट्ट *२) तो कधी सोडण्यात आला?* 👉🏼 १९ एप्रिल १९७५ *३) भारतात उपग्रह कोणत्या संस्थेमार्फत सोडले जातात?* 👉🏼 इस्रो (ISRO) *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 रत्नाकर पाटील कदम, अध्यक्ष व्यापारी असोशिएशन, धर्माबाद 👤 सचिन वाघ, प्राथमिक शिक्षक 👤 सुभाष जाधव 👤 अशोक जायवाड 👤 संतोष पाटील साखरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "प्रगल्भ व्हा " कोणतीही जबाबदारी सहज टाळत असतात श्रेय घ्यायला मात्र पुढे पळत असतात श्रेय घ्यावं वाटतं तशी जबाबदारी घ्या सर्वांना सारं कळतं थोडे प्रगल्भ व्हा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येक व्यक्तिची एक स्वतंत्र ओळख असते. त्याची स्वत:ची एक प्रकृती असते. त्याचं अवतीभवतीचे वातावरण वेगळे असते. त्याची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी निराळी असते. त्याच्यावर झालेले संस्कार भिन्न असतात. एकाच पर्यावरणात राहिलेले व एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंडसुद्धा सारख्या विचारांची नसतात.* *कारण प्रत्येक व्यक्तिचं भावविश्व वेगळं असतं. त्याची भावनिक व मानसिक गरज भिन्न असते. अंगभूत संवेदनशिलताही वेगळी असते. एखादा प्रसंग बघितला अथवा घडलेला असला तर त्यावरील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो.* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्या अवतीभोवती असणारी माणसे थोडं ओळखायला शिका म्हणजे तुम्हाला तुमची खरी माणसं कोण आहेत ते समजेल. तुम्हाला कामापुरती गोड बोलणारी,तुमच्यासमोर तुमची स्तुती करणारी, तुमच्यासमोर एक आणि तुमच्या माघारी एक बोलणारी,काम असेल तरच तुमच्याशी मैत्री करणारी, संकटाच्या वेळी आपल्यापासून दूर जाणारी आणि काय होते नि कसे होते असा विचार करणारी आणि ऐनवेळी धोका देणारी अशी माणसे यांच्यापासून थोडे दूर राहायला शिका म्हणजे आपण सुव्यवस्थित पणे राहून सुखाने आणि समाधानाने जीवन जगू शकू अन्यथा अशा व्यक्तींपासून पश्चातापाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही.अशी माणसे लवकरच ओळखायला शिकली पाहिजे आणि अशा माणसापासून नेहमी सावध रहायला शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..9421839590. 🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌼 प्रथम प्रार्थिते प्रथमेशा 🌼 तुझिया चरणी सार्या अमुच्या आशा आकांशा अन् अभिलाषा मनी कोठली जागो मनिषा दिशा दाविसी तू अधिईशा ।।धृ।। अधरी तूच वदविली माझ्या बालसुलभ ही बोली भाषा त्यातून उद्भविला पसारा 'बालगीतोत्सव' सुंदर खाशा।।१।। प्रारंभ गीताने तुझ्याच ईशा प्रथमईशा हे प्रथमेशा प्रारंभ हेतू मंगल व्हावा प्रार्थिते तुज मंगलस्नुषा ।।२।। ----सौ.मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [माझ्या 'बालगीतोत्सव' [२००६] ह्या कविता संग्रहाचा प्रारंभ मी ह्या प्रार्थनेने केला होता.] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment