✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४३ - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती. १९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :-  १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर कोरियासोबत वाद वाढेल अशा गोष्टी टाळण्याची केली विनंती* ----------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीर : शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन लष्कराचे जवान शहीद* ----------------------------------------------------- 3⃣ *एनडीए मधून बाहेर पडण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार - खासदार राजू शेट्टी.* ----------------------------------------------------- 4⃣ *राजस्थान सरकारने विद्यापीठांसाठी सुट्यांची नवी यादी केली जाहीर, 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी रद्द.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडे यांचं नाव, बीड जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवस अखेर सहाबाद 329 धावा, शिखर धवनचे दमदार शतक.* ----------------------------------------------------- 7⃣ *लंडन : 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत जमैका संघाचा पराभव, उसैन बोल्ट जखमी, ग्रेट ब्रिटनने पटकावले सुवर्ण.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज*         आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/LrHDpYFQK9w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वर्धा* वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याच ेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली सुमारे १.०६ लाख लोकसंख्या असलेले वर्धा शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचेनिवासस्थान होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतीय लष्करातील सर्वोच्च सन्मान कोणता?* 👉🏼 परमवीर चक्र *२) परमवीरचक्र आतापर्यंत कितीजणाना देण्यात आला?* 👉🏼 फक्त २१ जणाना *३) परमवीर चक्र पदकाचे डिझाइन कोणी तयार केले आहे?* 👉🏼 सावित्रीबाई खानोलकर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापुर 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 संदेश लोखंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " वास्तव " कल्पने पेक्षा वास्तव एकदम वेगळं असतं कल्पना करतो ते वास्तवात सगळं नसतं कल्पना अन् वास्तव वेगवेगळेच असते कल्पनेत वाटते ते वास्तवात कधीच नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.* *माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.* *"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *☕ आली चहाची अॉर्डर ☕* नाही डब्यात साखर आली चहाची अॉर्डर आली चहाची अॉडर नाही चहा पावडर ।।धृ।। आली महिना अखेर महागाई बेसुमार खेळ दरमहा हाच असा चालतो संसार।।१।। संसारात नाही सार तरी चालतो संसार येवो किती झंझावात तरी चालतो संसार ।।२।। दोन जिवांचा संसार चालवितो हात चार आली चहाची अॉर्डर आम्ही पुरी करणार ।।३।। येवो कठीण समय तरी आम्ही तारणार साथ आम्हाला साथीची आम्हासाठी भरतार ।।४।। - सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? देवाचा मित्र व्हा *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment