✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /09/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार* ----------------------------------------------------- 2⃣ *हिंगोली : कळमनुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच संगणकांची चोरी.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबईः ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन. शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईत दीड वर्षांत होणार सायकल ट्रॅक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर - गायिका रजनी करकरे- देशपांडे यांचं रात्री ११.१५ वाजता फुप्फुसाच्या विकाराने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *न्युयॉर्क : अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्यांनी हीदर वॅटसन आणि हेन्री कोन्टीनेन या जोडीला ६-४, ४-६, १३-११ असे पराभूत केले.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी : वसमतच्या सौ. संगीता देशमुख यांच्या विचारवेध या पुस्तकाचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते आज नांदेडात प्रकाशन सोहळा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *बायको* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/X2H6Tz7P1ia वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                       *महाड* महाड हे अष्टविनायकां पैकी असलेले वरदविनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महड गाव जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोलीपासून ६ किमी अंतरावर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा  पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होत, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो..* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *वर्हाड निघालय लंडनला या एकपात्री नाटक कोणाचे आहे ?* डॉ. लक्ष्मण देशपांडे 2) *फास्टर फेणे हे पुस्तक कोणाचे आहे ?* भा.रा. भागवत 3) *रक्तचंदन हे कथा संग्रह कोणी लिहिले ?* जी. ए. कुलकर्णी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भिमराव माधवराव सोनटक्के, पाटोदा बु. 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "झुलवा झुलवी " स्वप्न पाहणारे आशेने स्वप्न फुलवत असतात स्वप्न दाखवून झुलवणारे उगीच झुलवत असतात  झुलवणाराला वाटते झुलवण्यात मजा आहे स्वप्न पहाणाराला मात्र वाटते ही तर सजा आहे      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*                     •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••             🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*    संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आत्महत्या* सुटले का कधी सारे प्रश्न केवळ आत्महत्या करून उलट गुंता वाढतच जातो जाता हे जग कायमचे सोडून हे जीवन घटनांचे रांजण जे नेहमीच असते भरून बऱ्यासह वाईटही असती पण त्याही जाती सरून केवळ क्षणिक नैराश्यापोटी कुणी कशास जावे हरून झटकून टाकता मरगळ चैतन्य येते नवे अजून सकारात्मकतेने सदा जीवन पहावे जगून नकारात्मकतेलाही मग जावे लागते पळून जीवन खरेच सुंदर आहे अनुभवावे नव्याने जगून  उगाच गुंता न वाढवावा आत्महत्या कुणी करून ----- प्रविण शांताराम, पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *स्वतःला सुधारणे आवश्यक !* एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला. *तात्पर्य :* जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment