✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००५ - बांगलादेशच्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार. २००८ - मायकेल फेल्प्सने २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला. 💥 जन्म :- १९१३ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबर्‍या. 💥 मृत्यू :-  १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- राज्यात तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर ग्रामीण भागात फक्त 12 तास वीज देणार, पाण्याच्या कमतरतेमुळे वीजकपात; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - लोकमतचे समीर इनामदार यांना किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार, नाना पाटेकर यांनी केला गौरव* ----------------------------------------------------- 4⃣ *बैलगाडी शर्यतींना हायकोर्टाची मनाई, राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश: चंबामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे. मागणीसाठी कुटुंबियांचं आझाद मैदानात उपोषण सुरू.*  ----------------------------------------------------- 7⃣ *शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार, नवी शेतकरी संघटना सुरु करणार - सदाभाऊ खोत.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *यंदा कर्तव्य आहे ......!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/88Vmobw9iPh वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                     *रायगड* रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. *सीमा* पश्चिम- अरबी समुद्र, उत्त्तरेला- ठाणे जिल्हा, पूर्वेला- पुणे जिल्हा दक्षिणेला- रत्नागिरी जिल्हा आहेत. *तालुके* पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणूस विचार करतो देव आहे का नाही पण .....हे कधी विचार करत नाही मी माणूस आहे का नाही सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत?* 👉🏼      आठ जिल्हे *२)  मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे?* 👉🏼     नांदेड *३)  मराठवाड्यात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?* 👉🏼      तीन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ. अरुणा राजीव भोसले 👤 सौ. श्रुतिका रवि यम्मेवार, धर्माबाद 👤 बालाजी बरडे, धर्माबाद 👤 अनिल मादसवार, हिमायतनगर 👤 सचिन एडके, धर्माबाद 👤 आदित्य अनिल चौगले रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *" खचू नका "* तुम्हीच सांगा मिञांनो किती जीव देणार आहेत जीवन संपवल्याने प्रश्न थोडे कमी होणार आहेत जीवन संपवून असे प्रश्न कधी सुटतं नाहीत संकट काळी खचून प्रश्न कधी मिटतं नाहीत     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*    ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••               🔱🔱🔱🔱🔱🔱     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांचे मन आणि विचार चांगले असतील तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि वैभव नांदत असते. * व्यंकटेश काटकर, नांदेड.   संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                                          *विषय-हक्क*                                      निस्वार्थपणे वागणारी।                            हिरवी हिरवी झाडं।                                आपलं सर्वस्व।                                    देतात मानवाला।                                       कधीच आपल्या।                                  कर्तव्यात चुकत नाही।                            मग माणूसच का चुकतो?                           का घाव घालतो?                                     त्या निस्वार्थ झाडावर।                              एवढं जिव्हाळा,प्रेम देणारा।                               हिरव्या झाडावर आपलेही।                      काही *हक्क* अन् कर्तव्य                         त्याच्याप्रति नक्कीच आहे।                       त्याचं जीवापाड रक्षण करायचं।                  *हक्क*आहे आपला झाडावर।              म्हणून करु या त्याचे रक्षण।                     पर्यावरण संवर्धन व विकास साधून।          झाडे *जगवू* झाडे *वाचवू*                   सौ.वर्षा भांडारकर.                                 त.मूल.जि.चंद्रपूर. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा .. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट  एकदम शांत झाला .   आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला,                                                                      " फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं.  त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते .   तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं .. ," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."     शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले  ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . " शिक्षक निघुन गेले . जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय " "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ." " बापरे , कीती दुखत असेल त्याला  " " काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला ..   मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले .... फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले .....   मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,, शांत पणे जागेवर जाऊन बसली ..   सर परत आले ... वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं  ...    फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ... शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ...      "  मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात.       आयुष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं . जीवनातले  कष्ट  हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे .  "      ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ..... पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,,       की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे ..   सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय .  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात. सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं  राहणं अशक्य आहे .   म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

No comments:

Post a Comment