✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *गरिबांचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती भवनात जातोय - भारताचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिनंदन* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - अतुल भोसले यांनी घेतला पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार* ----------------------------------------------------- 4⃣ *⁠⁠⁠⁠⁠नांदेड : लोहा येथील पाल वस्ती वरील भटक्यांना रेशनकार्ड व धान्य वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भटक्यांना एका वर्षाच्या आत हक्काचे घर मिळेल असा आशावाद व्यक्त केला* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- महापालिका शाळामधील शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले असतील त्यांचीं सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी आज झालेल्या महासभेत दिले.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण अंनिसचे 'जबाब दो' आंदोलन सुरु.* ----------------------------------------------------- 7⃣ *डर्बी- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दिमाखदार प्रवेश, भारतानं ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मिळवला विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     *✈  ✈  गुगलयान  ✈  ✈* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संस्काराचे महत्त्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FHV28hBmrkW पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नांदेड* हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून आले असल्याचे सांगण्यात येते. नांदेडात शिखांचे शेवटचे गुरू गोबिंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड हे संतकवी विष्णुपंत, रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   चांगली भुमिका आणि चांगले विचार असणारे, लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दांतही आणि प्रार्थनेतही..! सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारत व चीनचे युध्द केव्हा झाले?* 👉🏼 १९६२ *२) भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *३) तत्कालीन सरक्षंण मंत्री कोण होते?* 👉🏼 कृष्ण मेनन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 वृषाली शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रतिलिपी डॉट कॉम 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "खोटी प्रतिष्ठा " जो तो आसुसला आहे खोटी प्रतिष्ठा जपायला त्याचे त्यालाच लागते वर्तन आपले वपायला त्याचे त्याला आपले वाईट वर्तन वपते चांगले सांगितले कोणी की खरे फार खुपते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्‌भावना' आणि 'सद्‌विचार' प्राप्त होतात."* ••●♻ ‼ *रामकृष्णहरी* ‼♻●•• ☘☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्याकडे श्रीमंती आहे पण माणुसकीचा थोडाही ओलावा नाही.चांगला विचार नाही,दानधर्म करण्याची इच्छा नाही, श्रीमंतीच्या नशेत चूर होतात.त्यांना इतर जगाचे काय होते हे काहीच माहीत नाही आणि अशा स्वार्थी,मतलबी माणसांना सर्वसामान्य माणूसही ओळखत नाही.अशा माणसांचं जीवंतपणी कोणी नाव घेत नाही आणि त्यांच्या पश्चात ही नावं कोणी घेत नाही. पण ज्यांच्याकडे माणुसकी नावाची श्रीमंती आहे, 'मी 'पणाचा गर्व नाही, दुस-या बद्दल मायेबद्दलचा ओलावा आहे.आहे त्या परिस्थितीला सामावून घेण्याचे धैर्य आहे.कोणत्याही प्रसंगी दुस-यांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी आहे .अशाच माणसांची नावे सारे लोक घेतात आणि अशाच माणसांचा पश्चातही उदो उदो होतो .त्यांचेच नाव इतरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.८०८७९१७०६३ ९४२१८३९५९०. ☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा." ब्राह्मण "हो" म्हणाला ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले. *भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते." तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले, आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती. म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते. शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला. यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ? चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो." दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले. हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या. एकबाई ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?" ताई म्हणाल्या, "नाही हो" तेंव्हा एक बाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले." चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा. आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांना या कर्माचे भागिदार बनवले...व जे जे बोलतात.. अफवा पसरवतात.. एखाद्याची बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माथी मारले गेले. थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे. म्हणून आजचा सुबोध दिला आहे. *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.* *माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो* *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* ============================= *" आयुष्य खुप सुंदर आहे "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment