✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली जीनाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले. २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 💥 जन्म :- १५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. १९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. 💥 मृत्यू :-  १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *आपण स्त्रियांचा आदर करतो का? जे महिलांचा आदर करतात त्यांना मी नमन करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *सीमेजवळ राहणारे लोक कुठल्याही देशाची सर्वात मोठी रणनितीक संपत्ती असते - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री.* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सतर्कतेचे आदेश.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : मानधनात वाढ करावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरुन वाद, हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाला अंनिसचा विरोध.* ----------------------------------------------------- 6⃣ *रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बंदुकाच्या गोळ्याने विचार मरत नाहीत* लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला ओळखले जाते ते म्हणजे प्रसारमाध्यम. ज्यात सर्व प्रकार आले जसे की वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या आणि इंटरनेट वरील ब्लॉग या सर्व माध्यमातून माणसे आपले विचार व्यक्त करू शकतात. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FisSeGxJ5JD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर*          हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.  बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. *ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक* व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत.  किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात. सवाई गंधर्व तथा रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचे पुण्यात १२ सप्टेंबर १९५२ ला निधन. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात. सौ. भारती कुंभार 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मोटारसायकलचा शोध कोणी लावला?* 👉 जी. डेम्लर *२) छपाई मशीनचा शोध कोणी लावला?* 👉 जॉन गुटेनबर्ग *३) तापमापकाचा शोध कोणी लावला?* 👉 फॅरनहाइट *संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शरद भोर 👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड 👤 पुंडलिक बिरगले 👤 शिवा शिवशेट्टे 👤 पोशट्टी सायन्ना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "साधी यादी" नकली भोंदूबाबांची ही आता यादी आहे ही फायनल नाही सध्या तरी साधी आहे गुन्हे जसे सिद्ध होतील तशी ती वाढत जाईल नवी नवी यादी पुन्हा प्रकाशक काढत जाईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनाचा खरा प्रवास जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंतच असतो. त्यानंतरचा प्रवास कुणीही पाहिलेला नाही.कारण जीवनाच्या नंतरचा प्रवास हा कल्पनेच्या प्रवास आहे.पण जो प्रवास आपण आज करत आहोत किंवा करणार आहोत ते कल्पनेत नसून वास्तव जीवनात .अशा जीवनात सुखाचा,सत्याचा, धैर्य आणि संयमतेचा, चांगल्या नि वाईट अनुभवांचा,दानधर्माचा या आणि इतर गोष्टींना सत्य मानून इतरांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सहप्रवासी म्हणून जीवन परिपूर्ण जंगले तर आपल्या जीवनाचा खरा प्रवास पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नंतरच्या कल्पित प्रवासाची अपेक्षा करणे अयोग्यच आहे. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कुठे आहे ?* कुठे आहे वैचारिक स्वातंत्र्य ? जिथे वाजते बिगूल परिवर्तनाचे तिथेच विचारवंताना संपविते 'त्या' बंदूकीची गोळी... कुठे आहेत बुध्दीजीवी माणसं ?  जिथे आहेत मानवतेचे विचार तिथेच खेळली जाते क्रूर निर्दयी रक्ताची होळी... कुठे आहे सुशिक्षित समाज ? जिथे मांडलाय धर्माचा बाजार तिथेच भरली जाते ढोंगी साधू संतांची झोळी... कुठे आहेत पुरोगामी विचार ? जिथे स्वप्नं पाहिले सुधारणेचे तिथेच चालते आजही समाजात  जातींची खेळी... - धनराज अवधुतवार, प्राथमिक शिक्षक भोकर ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिष्याची परीक्षा* रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

No comments:

Post a Comment