" जगण्यातली मजा
वाढवण्याचे उपाय "
---------------------------
जगण्यातली मजा वाढवण्याचे
तसे बरेच उपाय आहेत
तुम्हीच पहा त्यातले कोणते
सहजपणे जमणार आहेत
जिथे राहता त्या कॉलनीत
चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा
जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल
गप्पा च्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल
महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे
पक्वाणाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे
ठेसा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही
सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हणलं पाहिजे
एखाद्या दिवशी सर्वांनी
Picture पहावा मिळून
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून
काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं
नवरा बायको दोन लेकरात
" दिवाळ सण " असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?
साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
सुख वस्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबर्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे
दोन दिवस का होत नाही
जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं
वर्षातून एखाद दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी
" त्यांचं आमचं पटत नाही "
ही ओळ खोडावी
आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या...!
वाढवण्याचे उपाय "
---------------------------
जगण्यातली मजा वाढवण्याचे
तसे बरेच उपाय आहेत
तुम्हीच पहा त्यातले कोणते
सहजपणे जमणार आहेत
जिथे राहता त्या कॉलनीत
चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा
जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल
गप्पा च्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल
महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे
पक्वाणाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे
ठेसा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही
सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हणलं पाहिजे
एखाद्या दिवशी सर्वांनी
Picture पहावा मिळून
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून
काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं
नवरा बायको दोन लेकरात
" दिवाळ सण " असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?
साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
सुख वस्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबर्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे
दोन दिवस का होत नाही
जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं
वर्षातून एखाद दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी
" त्यांचं आमचं पटत नाही "
ही ओळ खोडावी
आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या...!
No comments:
Post a Comment