आई बाप म्हणजे काय असते ? कविता

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

👤आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं.

👤तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं.

👤तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत,त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं.

👤आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं.

👤अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं.

👤आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं.

👤बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं.

👤आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं.

👤कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस ” असतं.

👤शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे”क्वारनटाईन” बटण असतं.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते.

👤बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते.

👤बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्षशक गुरु असतो.

👤दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो.

👤आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो.

👤त्या परमेश्वरापर्यंत , पोचवणारा बाप एक संत असतो.

👤आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं.

👤बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं.

👤कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य “आई गं SSS” असतं.

👤आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात “बाप रे बाप” असतं.

👤परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं.

👤त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं.

🌺म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं.

🍀त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं.

👤आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं.

उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत,🍁 “मातृ देवो भव- पितृ देवो भव”🍁 म्हणलेलं असतं..
👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽

No comments:

Post a Comment