काव्यगीत

जीवनस्तंभ

मन हरलेल्या शूरांना
मनगटी जोर द्यावे..
येतील अनेक वादळवारे
चिरस्थिर उभे टाकावे..

दीपस्तंभ तू हृदयाचा..
ना हेलकावे खावू द्यावे
तू तर जिंकण्याचे गीत
सदैवी ओठी येवू द्यावे

नम्र असावे, स्पष्ट असावे..
स्वाभिमानी, समृद्ध असावे
खडक झिजून होती मृदा..
म्हणून, सदा कार्यरत असावे .

No comments:

Post a Comment