एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.
.
एक दिवस तिच्या जवळ एक तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
.
त्याने आजीला विचारले,"आजी संत्री कशी दिली ग?"
.
आजीने भाव सांगितला..
.
त्याने २ किलो संत्री विकत घेतली आणि त्यातल एक संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला,"आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"
.
आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली "लेकरा गोडच हाय की"
.
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
.
असे बरेच दिवस निघून गेले.
.
आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले,"तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन"
.
तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"अग वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो."
.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली,"अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत."
.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली ,"अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."
.
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.
.
मनात विचार करत असताना.शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली," बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या.."
.
मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या..
.
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका..
.
माणूसकी कमी होत चाललीय.
.
तेवढी फक्त जपायला शिका

No comments:
Post a Comment