गीत (शिक्षक )


शिक्षका,तू वेडा कुंभार
*************************
शाळेच्या बाकावरती देसी,
मुलांना आकार
शिक्षका,तू वेडा कुंभार !
खडु,फळा अन् प्रश्न उतारा
तूच शिकविसी सर्व उत्तरा
सदगुणच मग,ये आकारा
तुझ्या मुलांच्या शिकवीण्याला
नसे अंत ना पार
शिक्षका,तू वेडा कुंभार
मुलामुलांचे रूप आगळे
प्रत्येकाचे गुण वेगळे
तुझ्याविना ते,कोणा न कळे
पाठी कुणाच्या पड़ते थाप
कुणा हाती छडीमार
शिक्षका,तू वेडा कुंभार
तूच घडविसी,तूच तुडविसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी
कळते यातून राष्ट्र घडवीसी
देउन ज्ञान, दूर करिसी
तयापुढील अंधार
शिक्षका,तू वेडा कुंभार
*************

No comments:

Post a Comment