बहिणाबाई चौधरी (गीत)



बहिणाई...

खान्देशम्हा जलमनी
म्हणी एक बहिणाई
तिन्हा बोट धरीसन
अहिरानी मोठी झायी

घट्या बोले तिन्हा रोज
पायटाम्हा आयरानी
दये जिवार बाजरी
सक्कायम्हा उठीसनी

करे वावरम्हा काम
तिन्हा गाना तोंडीपाठ
देये न्यामीना दाखला
दाये जीवननी वाट

मानूसनं रूप दखी
त्याले शिकाडे जगनं
जर कोठे चुकायनं
त्यान्हं थोडसं वागनं

बोले मनम्हाना बोल
रीत सांगे जमानानी
करे वावरम्हा काम
गोट सांगे न्यामीतीनी

तिन्हं साधभोयं रूप
बोल तसा साधाभोया
उघडेत खडकनी
बठ्ठी दुनियाना डोया

बनो मानूस मानूस
बहिणानी कायपात
देये छोटूसा दाखला
त्याम्हा राहे मोठी बात


No comments:

Post a Comment