गीत

फक्त शिक्षकांसाठी..

💥✨✨ 'खडू ' ✨✨💥

ओळखलंत का साहेब मला ?
ऑफिसात आला कोणी ,

हातांमध्ये फाईल होती,
डोळ्यांमध्ये पाणी ,

टेबलापुढे उभा राहिला,
बोलला डोळ्यात पाहून ,

तपासणीची 'टीम' आली,
गेली शाळा पाहून ,

महाशयांनी प्रश्नांची,
तुफान बरसात केली ,

मोकळ्या हाती जाईल कशी ?
नोकरी तेवढी वाचली ,

अहवाल घेतले;

मित्र 'धुतले',

होते नव्हते गेले ,

आठवणीला रंगवलेले,
शेरेबुक तेवढे ठेवले ,

सोबत घेऊन मित्रांना,
साहेब आता लढतो आहे ,

कागदावरची गुणवत्ता घेऊन,
चकरा मारतो आहे ,

पेनाकडे हात जाताच,
हसत-हसत बोलला ,

शिफारस नको साहेब,

माझ्यातला 'गुरुजी' तेवढा जपा ,

हजार आल्या योजना,
तरी टिकवून ठेवला 'बाणा',

हातामध्ये 'खडू' देऊन,
नुसतं शिकव म्हणा . . . ……


No comments:

Post a Comment