भाऊराया

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!

भाऊबिजेला तुला बोलावते देऊन आग्रहाचं निमंत्रण...
राखीपौर्णिमेचं देशील का तू आमंत्रण?
आई वडिलांची खुशाली अन
 तुझ्या संसाराच सुख पाहून
भरेल माझे पोट!
माहेरपण म्हणजे प्रत्येक स्त्रीची ओढ़!!

आपुलकीचं बोलावणं करशील का ग वहिनी?
बहिण भावाच्या नात्यातला
 रेशमी धागा जपशील ना ग वहिनी?
नात्यांची भिस्त आता तुज़वरच आहे!
माझ्यासारखी तू देखील एक स्त्रीच आहेस!!

प्रेमाचा हिस्सा आणि मायेचा वाटा द्या ना!
तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकड़े येत राहावे, एवढा लोभ असु द्या ना!!

लग्न करून मी सासरी गेले,
तरी नाती तीच आहेत!
डोळे बंद केले अन्  सारं लहानपण समोरून गेलं !!

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट.

 संकलित

No comments:

Post a Comment