माझ्या शाळेतील उपक्रम

💠🎀🔰🎀🔰🎀🔰🎀💠

 *🔮माझी शाळा माझे उपक्रम🔮*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*सर्वांना दहिहंडीचा हार्दिक शुभेच्छा!*💐🌹🌹💐

*🏺 रचनावादी दहीहंडी गोपाळकाला*🏺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        ⚜आज दि.२५/८/२०१६  रोजी *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड*
येथे गोपाळकाला या निमित्ताने *शब्दरंग दहिहंडी गोपाळकाला* हा कार्यक्रम मोठया उत्साहाने व आनंदाने घेण्यात आला.⚜
      🌷कार्यक्रमाची सुरूवात होण्यापूर्वी श्री कदम सर यांनी पर्यावरणाचे संरक्षण कसे ठेवता येईल यावर आधारित एक लेख वाचुन दाखवला व महत्त्व सांगितले.
त्यानंतर मी  स्वतः एक श्रीकृष्ण कथा सांगीतली.व कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 🌷
         🏺प्रथमतः  दोन हंडी ठेवण्यात आल्या. वर्ग १ते ४ साठी व वर्ग ५ ते ७ साठी  वेगवेगळ्या शब्दरंग दहिहंडीत विद्यार्थ्यांना त्यामधुन चिठ्ठी काढण्याची संधी दिली ज्या विद्यार्थ्यांस त्या चिठ्ठीतील जे शब्द , वाक्य येईल त्यानुसार त्या विद्यार्थ्यांनी कृती करावयाची व आपला खाऊ घ्यायचा. हा कार्यक्रम चालू असतांना मध्ये मध्ये काही वेळा  श्रीकृष्णावर आधारित माहिती श्रीमती क्षिरसागर मँडम यांनी तर  , विद्यार्थ्यांच्या सोबत श्री चव्हाण सर यांनी गवळण , गाणी श्रीमती अबुलकर, श्रीमती सेनकुडे मँडम ह्यांनी सादर केली . फलकचिञ श्री रामटेके सर व काकडे मँडम यांनी  काढले.🏺
        🎊अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा  आनंद व त्यांचा उत्साह पाहून सर्वांना समाधान वाटले हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील काही मंडळी तसेच मा.के.प्रमुख साहेब श्री पि.वाय जाधव साहेब यांची उपस्थिती लाभली.ह्या कार्यक्रमसाठी सर्व शिक्षक शिक्षिका ह्यांचे भरपूर सहकार्य लाभले.शेवटी आभार👉 झाडे मँडमनी 👈यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.🎉
       🌺प्रथम सत्रातील हा शब्दरंगी कार्यक्रम पार पडला.व व्दितिय सत्रात पूर्ववत दैनिक अध्यापन करण्यात आले.🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  *💠शब्दांकन / सुञसंचलन💠*
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
                 *शिक्षिका*
        *जि.प.प्रा.शा. वाटेगाव*
     *ता. हदगाव, जिल्हा नांदेड*
*© मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠🎀🔰🎀🔰🎀🔰🎀💠

No comments:

Post a Comment