कथा क्रमांक ४९.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४९. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *♻सिंह आणि तीन बैल*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका कुराणात तीन मस्त बैल एकत्रितपणे चरत असत. त्यांना मारुन खाण्याची एका सिंहाला इच्छा झाली; परंतु त्या तिघात आत्यंतिक एकोपा असल्याने , ' आपण त्यांच्यापैकी एकाला मारायला गेलो तर बाकीचे दोघे शिंगे खुपसून आपल्या पोटातला कोथळा बाहेर काढतील,'  अशी त्या सिंहाला भीती वाटे.

      अखेर त्याने त्या तिघांनाही परस्परविरोधी खोटेनाटे सांगून त्यांच्यात फूट पाडली. त्यानंतर ते एकमेकांच्यापासून दूर राहून  चरु लागले.

  ही संधी साधून त्या सिंहाने एकेकाला गाठून ठार केले व खाल्ले.

*तात्पर्यः कपटी लोक भोळसर लोकांमध्ये फूट पाडतात व स्वतःचा फायदा साधून घेतात.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃🐁🐇

No comments:

Post a Comment