श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती

आनंदाच्या झाडाचं गणित कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं.

झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र टपटपायची रुक्मिणीच्या अंगणात !

रुक्मिणीला झाडाचं मूळ काही शोधता नाही आलं पण प्राजक्ताच्या सुगंधाचा आनंद मात्र मिळाला.

सत्यभामेचा चडफडाट झाला तो झालाचं कारण तिनं शोधायचा प्रयत्न करुन ते फुलांचं टपटपणं थांबवायचा प्रयत्न केला.   त्यामूळं अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या  सहवासाचा तिला आनंद नाही उपभोगता आला.

रुक्मिणीनं मात्र झाडाच्या मूळाचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात टपटपणाऱ्या फुलांचा आनंद घेत राहिली.

आनंदाचं तसंच असतं. तो कुठून मिळतोय याचा शोध घेत राहिलं तर आनंद संपून जातो. उरते  . . . .
फक्त बेचैनी !

आनंद घ्यावा आणि द्यावा...प्रत्येक क्षण महोत्सव करावा.... तो कुणामुळे, कशामुळे याचा विचार शक्य झाल्यास नंतर करावा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून !

कृष्णं म्हणजे आनंदोत्सव....

No comments:

Post a Comment