✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Ef7A8HTBq/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 240 वा दिवस 🚩 ठळक घटना :-• १८४५: अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक 'सायंटिफिक अमेरिकन'चा पहिला अंक प्रकाशित झाला. • १९१६: पहिले महायुद्ध – इटलीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले (रोमानियावरही आक्रमण केले गेले). • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनमध्ये शस्त्रसंधी करार झाला. • १९३७: टोयोटा मोटर्स स्वतंत्र कंपनी म्हणून स्थापन झाली. • १९९०: इराकने कुवेतला आपलाच प्रांत असल्याचे जाहीर केले. 🎂 जन्म :-• १७४९: योहान वोल्फगाँग फॉन ग्यॉटे – जर्मन महाकवी व लेखक. • १८९६: रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी – प्रसिद्ध उर्दू शायर. • १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद (मामा पेंडसे). • १९१८: राम कदम – मराठी चित्रपटांचा प्रसिद्ध संगीतकार. • १९२८: एम. जी. के. मेनन (भारतीय पदार्थवैज्ञानिक); तसेच उस्ताद विलायत खाँ (सतारवादक). • १९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा. • १९३८: पॉल मार्टिन – कॅनडाचे पंतप्रधान. • १९५४: रवी कंबुर – भारतीय-इंग्रिश अर्थशास्त्रज्ञ. • १९६५: सातोशी ताजीरी – पोकेमॉनचे निर्माता. • १९६६: प्रिया दत्त – समाजसेवक व माजी खासदार. • १९६१: दीपक तिजोरी – अभिनेते आणि दिग्दर्शक. • १९८३: लसिथ मलिंगा – श्रीलंका क्रिकेटपटू. 🌹 स्मृतिदिन• १६६७: जयपूरचे राजा मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. • १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन. • २००१: व्यंकटेश माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार यांचे निधन.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी सिनेमा आज आणि उद्या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गणपती बाप्पाचे महाराष्ट्रात वाजत-गाजत स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन, देशावरील संकट दूर व्हावेत असे मुख्यमंत्र्यांचे बाप्पाकडे साकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नझुल जमिनींच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ, नागपूर-अमरावती विभागात १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत योजना सुरू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन 40 टक्के वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून 500 कोटींची तरतूद - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ, 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय, 7332 कोटींचा खर्च येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंना 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटी शर्ती सह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मूमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे 8 जणांचा मृत्यू; 22 जवानांची सुटका, मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचे स्टार क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची लवकरच होणार फिटनेस टेस्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश घुले, शिक्षक तथा साहित्यिक 👤 D. S. P. पाटील, साहित्यिक, सोलापूर 👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली 👤 सुनिता महाडिक, शिक्षिका, मुंबई 👤 संजय बंटी पाटील, बाळापूर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 गजानन वासमवार 👤 अशोक मामीडवार 👤 साईनाथ गोणारकर 👤 तिरुपती अंगरोड 👤 आनंद आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 62*असे काय आहे, जे आपल्या जवळच असते पण क्षणात जगभर फिरून येते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बटाटा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पूर्वानुभवाच्या मदतीने जीवनातील पुढील प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत गर्भाशयमुख कर्करोगाच्या बाबतीत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे ?२) सोवियत संघातून युक्रेन कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला आहे ?३) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'स्वतःबद्दल अभिमान नसलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'भारताचे उद्यान' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) चौथ्या २) सन १९९१ ३) ४,०९६ किमी ४) स्वाभिमानशून्य ५) बेंगलोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरेश्वर गणपती (मूळ विनायक)*• स्थान : मोरेगाव, ता. बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र).• नदी : करहे नदीच्या काठी मोरेगाव वसलेले आहे.• अष्टविनायकांमध्ये प्रथम क्रमांक : मोरेश्वर गणपतीला "मूळ विनायक" असेही म्हणतात. कारण अष्टविनायक यात्रेची सुरुवात व शेवट मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने करायची प्रथा आहे.*इतिहास व महत्त्व*• मोरेश्वर गणपतीचे मंदिर 14 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते.• मंदिराचे जीर्णोद्धार चिमाजीअप्पांनी (बाजीराव पेशव्यांचे बंधू) व इतर पेशव्यांनी केला होता.• गणपतीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.• मूर्तीची दोन सोंडे व चार हात आहेत.• येथेच गणेशाने सिंधुरासुराचा वध करून लोकांना त्रासातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.*मंदिराची वैशिष्ट्ये*• मंदिर 50 फूट उंच किल्ल्यासारख्या भिंतींनी वेढलेले आहे.• चारही बाजूंना चौकटी असून त्यावर मिनारांसारख्या उंच बुरूज आहेत.• मंदिराच्या आवारात नेमके 23 वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्ती आहेत.• यात्रेकरूंची श्रद्धा अशी आहे की, मोरेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा अपूर्ण राहते.*यात्रा व उत्सव*• गणेशोत्सव व माघ शुद्ध चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते.• देशभरातून भाविक येथे येतात.👉 त्यामुळे मोरेश्वर गणपती हा अष्टविनायक यात्रेचा आरंभ आणि शेवट मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची गजसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग … || धृ ||ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा गमऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर गअशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गअशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला गचला चला करूया नमन गणरायाला गत्याच्या आशीर्वादाने करू सुरुवातशुभ कार्याला ग || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते. तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हि-यापेक्षा जनता महत्‍वाची*एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''तात्‍पर्य :- आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/177LMD6K2o/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 238 वा दिवस 🚩 ऐतिहासिक घटना :- • 1303 - अल्लाउद्दीन खिलजींनी चित्तोडगड जिंकला. • 1498 - मायकेल अँजेलो यांनी ‘पिएटा’ शिल्पाकृतीवर कार्य सुरू केले. • 1768 - कॅप्टन जेम्स कुक त्यांच्या पहिल्या प्रवासावर रवाना झाले. • 1791 - जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकन पेटंट मिळाले. • 1883 - इंडोनेशियातील क्राकाटाऊ ज्वालामुख्याचा उद्रेक; सुमारे 36,000 लोकांचा बळी. • 1972 - म्युनिच येथे २० वा ऑलिंपिक स्पर्धांला सुरुवात. 🎂 जन्म :-• 1910 - प्रसिद्ध समाजसेविका ख्रिश्चन धर्मगुरु मदर तेरेसा • 1956 - प्रसिद्ध राजकारणी मनेका गांधी• 1968 - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर🌹 मृत्यू :- • 2012 - वरिष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यसैनिक ए. के. हंगल यांचे निधन. ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधी वंदू तुज मोरया*गणपती बाप्पा मोरया - गणेशोत्सव आता राज्य उत्सव झाला आहे. ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नव्या शालेय अभ्यासक्रमात आरोग्य, स्वच्छतेसोबत शेती, स्वयंपाकघरातील विज्ञानाचेही मिळणार धडे; मुलांना अनुभवात्मक अभ्यास, तर्कशक्ती शिकता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अकरावीकरिता अंतिम फेरी प्रवेश प्रक्रिया होणार 26, 27 ऑगस्टला, गुणवत्ता यादी 29 ला; 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पिंपरी चिंचवड विद्यापीठात दीक्षारंभ समारंभ, कृत्रिम बुद्धिमत्तेसह बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा - कांचन भोंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे - गणेशोत्सव आता राज्य महोत्सव, सार्वजनिक मंडळांना 7 दिवस ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा; सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी संघटनांचा एकजूट, कर्जमाफी आणि हमी भावासाठी 28 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आजच होणार पगार जमा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑनलाइन गेमिंगचे विधेयक आल्यानंतर ड्रीम ११ आणि बीसीसीआय यांच्यातील करार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, सांगली 👤 मधुकर बोईनवाड, विशेष शिक्षक, देगलूर👤 संदीप आवरे, धर्माबाद 👤 प्रशांत बोनडलवाड 👤 सुमेध भंडारे 👤 प्रशांत इबितवार, धर्माबाद 👤 संदीप सोनकांबळे 👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 61*मला डोळे आहेत पण मी पाहू शकत नाही.**सांगा मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती किंवा पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयेमुळे दुर्बलांना जग मृदू भासते आणि पराक्रमी माणसांना ते उदात्त वाटते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी खलाशी होता ?२) आझाद हिंद सेनेची घोषणा कोणती होती ?३) जैन साहित्याला काय म्हणतात ?४) 'स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारत व चीन यांच्यातील सीमा किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) पोर्तुगीज २) चलो दिल्ली ३) आगम ४) स्वार्थी ५) ३,९१७ किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीचे आठ प्रसिद्ध व प्राचीन मंदिरांचा समूह. ही मंदिरे प्रामुख्याने पुणे व अहमदनगर जिल्ह्यात आहेत. गणेश भक्तांसाठी ही यात्रा अतिशय पवित्र मानली जाते.अष्टविनायक मंदिरे :1. मोहट्या (मोरेश्वर) गणपती – मोरेगाव, पुणेअष्टविनायक यात्रेतील पहिले स्थान.चांदीच्या नागफणीने सजलेली मूर्ती.गणपतीला "मोरेश्वर" म्हणतात.2. सिद्धिविनायक – सिद्धटेक, अहमदनगरभीमा नदीच्या काठावर.गणपती पार्वतीदेवीच्या इच्छेने येथे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे.3. बल्लाळविनायक – पाळी, रायगडगणपतीचा प्रिय भक्त "बल्लाळ" याचं नाव याला जोडलेले आहे.गणपतीने बल्लाळाला दर्शन दिल्यामुळे या गणपतीला "बल्लाळविनायक" म्हणतात.4. वरदविनायक – महड, रायगडगणपती इच्छित वरदान देतो, म्हणून "वरदविनायक".मूर्ती तलावात सापडली आणि मंदिरात प्रतिष्ठापित केली गेली.5. चिंतामणि गणपती – थेऊर, पुणेमहर्षी कापिलांचा आश्रम येथे होता.चिंतेपासून मुक्त करणारा गणपती.6. गिरिजात्मज विनायक – लेण्याद्री, जुन्नर, पुणेएकमेव गणपती लेण्यामध्ये (गुहेत).पार्वतीच्या इच्छेने येथे गणेश बालरूपात प्रकट झाला.7. विघ्नहर विनायक – ओझर, पुणेविघ्नांचा नाश करणारा गणपती.या मूर्तीवर सोन्याचा कळस आणि सुंदर दीपमाळ आहे.8. महागणपती – रांजणगाव, पुणेगणेशाने येथे त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे.येथे गणपतीला अष्टभुजा व उग्र रूप आहे.• विशेष माहिती :अष्टविनायक यात्रा नेहमी मोरेगावपासून सुरू करून तेथेच समाप्त केली जाते.या आठही ठिकाणांना भक्त वर्षभर मोठ्या श्रद्धेने भेट देतात, पण गणेशोत्सव व अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष गर्दी असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्शपुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचेहाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचेसेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते. निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीसतात्‍पर्य - लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1E71m1Dz68/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 ऐतिहासिक घटना :• १६०९: गॅलिलिओने जगातील पहिली दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले• १८२५: उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला• १९१९: लंडन ते पॅरिस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली• १९४४: द्वितीय महायुद्धात मित्र राष्ट्रांनी पॅरिसला मोकळं केलं• १९८९: व्हॉयेजर 2 नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचला .• १९८१: व्हॉयेजर 2 शनी ग्रहाच्या जवळ पोहोचला• १९९१: बेलारूसला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले• २०१२: व्हॉयेजर 1 अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली .🎂 जन्म :• १९२३: मराठी साहित्य आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गोपाळ गाडगीळ• १९३०: जेम्स बॉंडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेता शॉन कॉनरी• १९४१: संगीतकार अशोक पत्की• १९५२ - दुलीप मेंडिस• १९६२ - डॉ. तस्लीमा नसरीन• १९६५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक संजीव शर्मा• १९६९: क्रिकेटपटू आणि स्पोर्ट्सकास्टर विवेक राजदान• १९७६ - जावेद कादीर• १९९४: भारतीय लेखक-कादंबरीकार काजोल आयकट🌹 मृत्यू :• १२७०: फ्रान्सचा राजा लुई नववा यांचे निधन .• १८१९: संशोधक जेम्स वॅट यांच्या निधनाचा वर्षदिवस .• १८२२: खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन .• १८६७: शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे यांचे निधन .• २०१२: चंद्रावर पाऊल टाकणारे पहिले मानव, नील आर्मस्ट्रॉंग यांचे निधन .••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकट काळात मन प्रसन्न ठेवा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे दीड लाख मोदकांचे वाटप, यावर्षी ही संस्थानच्या वतीने जय्यत तयारी, पोलिस प्रशासनही सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्ली - भारत जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांत 6 पाणबुड्या खरेदी करणार, सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र देखील खरेदी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ही शेवटची लढाई, प्रत्येकाने मुंबईला या, राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका - मनोज जरांगे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गगनयानची तयारी- क्रू मॉड्यूलची एअर ड्रॉप टेस्ट, चिनूकने 4 किमी उंचीवरून सोडले; ISRO-DRDO, एअरफोर्स, कोस्टगार्डचे जॉइंट ऑपरेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सातनवरी बनले देशातील पहिले स्मार्ट गाव, राज्यातील 3500 गावांमध्ये राबवणार स्मार्ट व्हिलेज प्रकल्प; 18 आधुनिक सेवा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ उद्योजक, 'मॉडर्न ऑप्टिशियन'चे संचालक अनिल गानू यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे होते उपाध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा केला दारुण पराभव मात्र द. आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश चौधरी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, नांदेड 👤 आसावरी टाक👤 नयन पेडगावकर 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदी रामचंद्र, म्युजिक डायरेक्टर👤 प्रमोद गुरुपवार, बिलोली *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 60*मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ढोल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सज्जनतेचा बुरखा पांघरून मनाची दुष्टता जात नाही मनाच्या दुष्टतेचे मूळच नष्ट केले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वनराई' या संस्थेचे संस्थापक कोण ?२) सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो ?३) 'भारताचा नेपोलियन' असे कोणाला म्हटले जाते ?४) 'स्वतः श्रम न करता खाणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. मोहन धारिया २) भूमध्य समुद्र व लाल समुद्र ३) समुद्रगुप्त ४) ऐतखाऊ ५) फलोत्पादन व मध*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 *************************रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवराशुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||प्रसन्न होऊनी विघ्न हरावेनम्र कलेचे सार्थक व्हावेतुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||वंदन करुनी तुजला देवारसिक जनाची करितो सेवाकौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुराहे शिवशंकर गिरीजा तनया || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात.पण, माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते. म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लघुकथा Link - http://kathamaala.blogspot.com/2024/01/paisa-samrat.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्वाच्या घटना :- • १८३३ : इंग्लंडमध्ये गुलामगिरी प्रथा बंद करणारा कायदा पारित झाला.• १९१४ : पहिल्या महायुद्धात जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.• १९६६ : नासाने "लुना ऑर्बिटर १" या उपग्रहाच्या मदतीने चंद्राचे छायाचित्र पृथ्वीवर पाठवले.• १९७६ : चीनमध्ये भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला.• २००५ : इराकमध्ये नवीन घटनाला मान्यता मिळाली.📌 जन्म :-• १८७२ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – प्रख्यात गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत.• १९१९ : प्रभाकर पाध्ये – मराठी कथाकार, कादंबरीकार व समीक्षक.• १९३१ : व्ही. एस. नायपॉल – भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.• १९७८ : कोबे ब्रायंट – अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.📌 मृत्यू :-• १९२६ : रघुनाथ काशिनाथ फडके – भारतीय शिल्पकार.• १९८८ : एम. के. त्यागी – स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.📌 जागतिक दिन / विशेष दिन :-🌍 गुलामगिरी स्मृती दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - पैसा-सम्राट*लक्ष्मीकांत हा एक करोडपती, त्याला पैश्याची काही कमी नव्हती. तरी तो सुखी व समाधानी होता का ? त्याला कौटुंबिक सुख मिळाले का ? अंत्यसंस्काराला त्याची दोन्ही मुलं नव्हती, तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का ? ..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे 5200 कोटी रुपयाच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील अ, ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून 'निवडणूक' कामाला वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन; पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ SIT प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग, मात्र कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सगळे खड्डे बुजणार, मुख्यमंत्र्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओबीसीत 29 नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली, राज्य मागासवर्ग आयोगाकडून शिफारशींचा प्रस्ताव, केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील घेतला मोठा निर्णय, पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन बोरसे, नांदेड ( सध्या जर्मनी )👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद 👤 डॉ. सुनील भेंडे, वसमत 👤 प्रा. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, लेखिका, नांदेड 👤 यादव ढोणे 👤 भारत सर्वे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 59*असे काय आहे, ज्याला मारताना लोकांना खूप मज्जा येते ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुबळ्याच्या रस्त्यातील अडसर बनलेला पाषाण हा बलवानांच्या मार्गातील यशाचा एक टप्पा पायरी ठरतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक कोणत्या धातूचे असते ?२) भारतीय टी - ट्वेंटी क्रिकेट संघाचा कप्तान कोण आहे ?३) कोणत्या उपकरणाच्या मदतीने ध्वनीचे मापन केले जाते ?४) 'स्वर्गातील इंद्राची बाग' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) चांदी २) सूर्यकुमार यादव ३) सोनोमीटर ४) नंदनवन ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈 ************************पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते.इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे. स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो. इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश वाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार प्रधान रूप गणेशाचेहे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णूमकार महेश जाणियेला || १ ||ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्नतो हा गजानन मायबाप ….. || २ ||तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणीपहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही. अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते. ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महिलेचा निर्भीडपणा*एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्‍नही विचारले. त्‍यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्‍स्‍युक्‍य असणा-या लोकांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्‍न केले. तो म्‍हणाला,'' जर मी तुम्‍हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्‍येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्‍हटले,'' नाही, आम्‍ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्‍यक्‍त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्‍यास सुचविले. त्‍या महिलेला याचे कारण विचारले असताती म्‍हणाली,''तुम्‍ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्‍यापर्यंतही येत नाही यावरून असे स्‍पष्‍ट होते की तुमच्‍या शाही भांडारामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या हिश्‍श्‍यापेक्षा जास्‍त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्‍याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्‍हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्‍याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्‍श्‍याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्‍यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्‍या महिलेला धन्‍यवाद देऊ लागले कारण खलिफाच्‍या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्‍याला किंवा धर्माला धोका नसतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Fy9n7S7X3/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏛️ महत्वाच्या घटना :- • १६३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वडीलदारांच्या मदतीने मद्रास (चेन्नई) येथे वसाहत स्थापन केली.• १९०२ – कै. बाळ गंगाधर टिळक यांच्यावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला दाखल केला.• १९०७ – भारताचे राष्ट्रगीत “वंदे मातरम्” प्रथमच जपानमध्ये गायले गेले.• १९७९ – केबुल शहरात सौरऊर्जेवर चालणारे पहिले वीज केंद्र सुरू झाले.🎂 जन्मदिवस :-• १७६२ – जॉर्ज चौथा, ब्रिटनचा राजा.• १८६२ – क्लॉड डेब्युसी, फ्रेंच संगीतकार.• १९०२ – पॉल डिरॅक, नोबेल पारितोषिक विजेते इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ.• १९२० – रे ब्रॅडबरी, अमेरिकन विज्ञानकथा लेखक.• १९३२ – शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे जनक व पहिले राष्ट्रपती.• १९६७ – गणेश आचार्य, प्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक.🕯️ पुण्यतिथी :-• १९२२ – मायकेल कॉलिन्स, आयर्लंडचा क्रांतिकारक नेता.• १९८० – जयप्रकाश नारायण, समाजवादी नेता.• १९८० – रमेश बेंद्रे, मराठी साहित्यिक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलाचा सण : पोळा*शेतीकामासाठी वा अन्य कामासाठी लोकांना उपयोगी पडणारा प्राणी म्हणजे बैल. बळीराजासाठी तो वर्षभर राबराब राबतो, त्याचे ऋण फेडण्यासाठी श्रावण अमावस्याच्या दिवशी जो सण साजरा केला जातो तो म्हणजे बैलपोळा...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपराष्ट्रपती निवडणूक; राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी फडणवीसांचा शरद पवार-उद्धव ठाकरे यांना फोन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारकडून शासन निर्णय : 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व नागरिकांना प्रगत एआय टूल्सचे चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड मोफत सबस्क्रिप्शन द्यावे; संसदेत राघव चढ्ढा यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, एकूण 21 बैठका, ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा, जगदीप धनखड यांचा राजीनामा, बिहार SIR वरून गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा, 22 महिन्यांत 2.36 लाख प्रमाणपत्रे वितरित; 2.21 कोटी अभिलेखांची तपासणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन सुरू, देशभरातील 12 संस्थांचा सहभाग, विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शार्दूल ठाकूर मुंबई संघाचा नवा कर्णधार, अजिंक्य रहाणे पायउतार होताच MCA चा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हमंद, केंद्रप्रमुख बिलोली 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशिष देशपांडे, कुंडलवाडी 👤 शिवा गैनवार, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 58*दोन वाट्या त्यात दोन गारगोट्या**ओळखा पाहू काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - भेंडी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्याला मरण नसते आणि खरे जरी क्षणभर मागे पडल्यासारखे वाटले तरी परिणामी त्याचाच जय होतो. हे शाश्वत सत्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वप्रथम परीक्षेत ओपन बुक प्रणाली कोठे व कोणत्या वर्षी सुरु झाली ?२) आगामी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?३) भारत व नेपाळ यांच्यातील सीमा किती किमी आहे ?४) 'सुखाच्या मागे लागलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रात रेल्वे कोच कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) हाँगकाँग ( १९५३ ) २) भारत व श्रीलंका ३) १,७५२ किमी ४) सुखलोलुप ५) लातूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का ?* 📙एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणाऱ्या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणाऱ्या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात सर्वस्व गाजवणारे (Dominant) व दबावाला बळी पडणारे (recessive) असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुणात दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो.एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलाबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर गुणसुत्रांमधील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचे गुण मुलाबाळांत येतात. वेडसरपणा, कोड, रक्ताचे विकार, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार असे अनेक रोग, अशाप्रकारे लग्न केलेल्या व्यक्तींच्या मुलांना होऊ शकतात. त्यामुळे काका पुतणी, मामा भाची, बहीण भाऊ अशी लग्ने होऊ देऊ नयेत; हेच बरे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कविता - गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आला आला पोळा*( तीन शब्दाची कविता )आला आला पोळा लोकं झाली गोळा पोळ्याचा हा दिन बैलाचा आहे सण चिखलाचा बैल करू यथासांग पूजा करू सजवू त्याची शिंगे लावू कपाळाला भिंगे पैंजण बांधू पायावरझूल घालू अंगावर बैलासंगे आपणही मिरवू सायंकाळी गावात फिरवू पुरणपोळीचा नैवेद्य देऊसणासुदीचा आनंद घेऊ - नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्याकडे सर्वच काही आहे. त्यांना मानसन्मान देणे वाईट नाही. पण ज्यांच्याकडे काहीच नाही अशांचे वास्तव जगणे आणि परिस्थिती व त्यांच्यात असलेलं प्रामाणिकपणा बघून त्यांची मदत जर कोणी करत असेल तर याला माणुसकी धर्म म्हणता येईल. अशा एका मदतीने किंवा त्यांची कदर केल्याने माणुसकी जिवंत राहते आणि इतरांना त्यातून बोध मिळत असतो आणि ज्या माणसाला अशा एका मदतीने जगण्याला आधार मिळतो त्याच आधाराची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्मनियंत्रणाचे महत्व*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,' 'मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले, ''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 विशेष दिन :- • जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन• इंटरनेट दिन🚩 महत्त्वाच्या घडामोडी :- • १८२१ – पेरू देश स्वतंत्र झाला.• १९११ – लिओनार्डो दा विंचीचे सुप्रसिद्ध चित्र मोनालिसा पॅरिसच्या लुव्हर संग्रहालयातून चोरीस गेले.• १९४७ – भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेपाळने भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.• १९८३ – फिलिपाईन्सचे नेते बेनिग्नो अक्विनो यांची मनिलामध्ये हत्या झाली.🔹 जन्म :- • १८७९ – भारताचे सहावे सरन्यायाधीश मीर्ज़ा हामिदुल्ला बेग.• १९०४ – कॉमेडियन अभिनेते केशवराव कोळे.• १९०४ – कवी, लेखक, समीक्षक शंकर पाटील.• १९३१ – नोबेल पारितोषिक विजेते लेखिका टोनी मॉरिसन.🔹 मृत्यू :- • १९४० – प्रसिद्ध रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की.• १९६४ – प्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर.• २००२ – ज्येष्ठ नाटककार व अभिनेते जयवंत दळवी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे *शालेय परिपाठ* व्यवस्थितपणे राबविण्यासाठी परिश्रम घेत आहे. तेव्हा आपण देखील या whatsapp समूहात जरूर join व्हावे. ..... समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून 15631 पदांच्या पोलीस शिपाई भरतीला मान्यता, शासन निर्णय जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकत मैदान मारलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर नवी मार्गिका, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करणार, सात दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी; मंत्री आशिष शेलार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या; पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताज्या वनडे क्रमवारीची केली घोषणा, फलंदाजीत शुभमन गिल तर गोलंदाजीत केशव महाराज पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमाशंकर जुजगार, सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ राचेवाड, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 रघुनाथ सोनटक्के, साहित्यिक, तळेगाव दाभाडे, पुणे 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 संतोष गुम्मलवार, मनपा, नांदेड 👤 दत्ता नरवाडे, शिक्षक, बिलोली 👤 विश्वास बदापूरकर, येताळा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 57*हिरवी पेटी काट्यात पडली**उघडून पाहिली तर मोत्याने भरली**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ट्रॅक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदाचार, कर्तव्यनिष्ठा हे माणसाचे अलंकार आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत ?३) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या ठिकाणी पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली ?४) 'सिनेमाच्या कथा लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'जागतिक आदिवासी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सी. पी. राधाकृष्णन २) महाराष्ट्र, २९ ३) सुरत ४) पटकथालेखक ५) ९ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात ?* 📙 स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात.दुय्यम लैंगिक लक्षणात आवाज फाटणे, कंठ फूटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे ह्यांचा समावेश मुले मुली या दोहोत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते. मुली मुलांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी मिशा येत नाहीत. तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन असतो. पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यांमुळे वा विकारांमुळे या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी मिशासारखी पुरुषी लक्षणे तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तहान पाण्याने भागत असते. भूक अन्नाने मिटत असते. एखाद्या व्यक्तीजवळ दु:ख सांगल्याने मन थोडे हलके होते आणि योग्य माणसावर विश्वास केल्याने आपला कधीच विश्वासघात होत नाही. आज अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. म्हणून आधी स्वतःला ओळखावे आणि मगच योग्य व्यक्तीला वाचण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16w1jcKRk9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- *सदभावना दिवस*• १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.• १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.• १९१७ : अमेरिकेतल्या पहिल्या एरोनॉटिकल सोसायटीची स्थापना.• १९७९ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक पटकावले.• १९८८ : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब मिळाला.• २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.📌 जन्मदिवस :- • १९१३ : प्रसिद्ध मराठी साहित्यिक कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर• १९४४ : भारताचे सहावे पंतप्रधान, राजीव गांधी• १९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती• १९४६ : सईद जाफरी, हिंदी व इंग्रजी चित्रपट अभिनेते.📌 स्मृतिदिन :- • १८२८ : फ्रान्सचे प्रसिद्ध लेखक ऑनरे द बल्झॅक • १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने • १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे • १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे • १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा • २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता • २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी • २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा • २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर • २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर • २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार • २०२२: भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू समर बॅनर्जी • २०२२: भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट ऑस्टॅथिओस पॅथ्रोस• २०२२: भारतीय राजकारणी, खासदार सय्यद सिब्ते रझी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिण्याला पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, अंतराळात फडकावलेला तिरंगा दिली खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यांचा नवा पक्ष - जनशक्ती जनता दल, 2024 मध्ये स्थापना, बासरी चिन्हावर बिहारची निवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन, पुण्यात होणार ऑगस्टमध्ये आयोजन, 12 संस्थांचा सहभाग, मान्यवरांचा पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन, दीवार, धर्मात्मा, मुन्नाभाई MBBS, लगान, 3 इडियट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांत केलं काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 हरीश बुटले, संपादक तथा संस्थापक डिपर👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली 👤 गणेश येवतीकर, धर्माबाद 👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद 👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील 👤 जयपाल दावनगीरकर 👤 प्रमोद मुधोळकर 👤 कांतीलाल घोडके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 56*दोन पाय मोठे दोन पाय लहान**शेतात राबतो ताकद महान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - जीभ व दात ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई, वडील आणि गुरुजन व वडीलधारी माणसे यांच्याशी नम्रतेने वागावे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रचिन्हावरती असलेले देवनागरी लिपीतील 'सत्यमेव जयते' कोठून घेतले आहे ?२) पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या बदलामुळे होते ?३) रिझर्व बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत ?४) 'स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) मंडूक उपनिषद २) उष्णता ऊर्जा ३) ब्रिटिश भारत सरकार ४) सांगकाम्या ५) सिंधुदुर्ग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोड म्हणजे काय ?* 📙अंगावर पांढरे चट्टे असलेली व्यक्ती तुम्ही पाहिली असेलच ! तुमच्या घरात कोणत्या तरी नातेवाईकाला किंवा शेजाऱ्या-पाजार्‍यांमधील कोणाला असा रोग झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. या रोगाला *'पांढरे कोड'* असे म्हणतात. पांढरे कोड का होते याचे संपूर्ण शास्त्रशुद्ध अशी कारणमीमांसा आपल्याला ज्ञात नसली तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे त्वचेखालच्या मेलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणात घट झाली तर कोड होते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीमधून मेलॅनीन या रंग द्रव्याची निर्मिती होते. या पेशी मेलॅनोसाईट स्टिम्युलेटिंग हार्मोन या अंतःस्रावाच्या प्रभावाखाली कार्य करतात. या सर्व यंत्रणेत कोणत्याही भागात बिघाड झाल्यास कोड होऊ शकते. त्यामुळे त्याला रोग म्हणण्यापेक्षा शारीरिक बिघाड म्हणणे अधिक योग्य.काही प्रकारचे कोड थोड्या प्रमाणात अनुवांशिक आहे. म्हणजे पुढच्या पिढीत ते उतरू शकते. कोडाबद्दल बरेच गैरसमज आहेत. कोड झालेल्या व्यक्तीच्या शेजारी बसल्यास वा तिला स्पर्श केल्यास कोड होईल, असे बऱ्याच जणांना वाटते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोड हा संसर्गजन्य तर नाहीच. त्यामुळे अशा प्रकारे त्याचा प्रसार होणे अशक्य आहे.कोडामुळे बऱ्याचदा विद्रुपता येते. त्यामुळे कोड झालेली व्यक्ती न्यूनगंडाची शिकार होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच समाजात कोडाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे परिस्थिती जास्तच बिकट बनते. वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या "अमुक तमुक यांचे कोड संपूर्णत: बरे झाले. . ." अशा जाहिरातीकडे या रुग्णांचे लक्ष न गेले तरच नवल ! मग अनेक भोंदू डॉक्टर, वैदू, वैद्य अशा रुग्णाच्या अज्ञानाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. ती म्हणजे कोडावर हमखास परिणामकारक ठरेल असे औषध व उपचार अजून तरी सापडलेला नाही. कोडाच्या उपचारावर संशोधन चालू असून त्यात अतिनील किरणे, काही रसायने वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लंबोदर गिरीजा नंदना देवापूर्ण करी मनोकामना देवा || धृ ||हे मन पावन तव पदी सेवनबुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||पायी घागुऱ्या वाजती रुणझुणनाचत यावे गजानन देवा … || २ ||एका जनार्दनी विनवितो तुजविद्या द्यावी गजनना देवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने वैराग्य धारण केले असते त्याला कशाचीही अपेक्षा नसते. अशा व्यक्तीला व्यर्थ विकार सुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणून ती व्यक्ती, जीवन जगत असताना इतर गोष्टींच्या मागे न धावता कार्य करत असते हीच त्याच्यात असलेली खरी वैराग्यतेची ओळख असते.म्हणून त्याला दु:खी होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आपल्यात असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साधू आणि यक्ष*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.तात्‍पर्य - एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/176rQKx7nF/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विश्व मानवतावादी दिवस**जागतिक फोटोग्राफी दिवस*🚩 ऐतिहासिक घटना :- • १९१९ – अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य. • १९४५ – व्हिएतनाममध्ये होची मिन्ह यांनी सत्ता प्राप्त केली. • १९९१ – मिखाईल गोर्बाचेव्ह यांची फोरोस येथे नजरकैद; सोव्हिएत संघात अर्धसैनिक ताबा. • १९९९ – बेलग्रेडमध्ये युगोस्लाव्हियातील जनतेने राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. 🎂 जन्म :- • १९२२ - बबनराव नावडीकर – प्रसिद्ध मराठी गायकार• १९१८ - शंकरदयाळ शर्मा, भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती• १९५१ - सुधा मूर्ती, शिक्षिका व लेखक, Infosys Foundation प्रमुख• १९४६ - बिल क्लिंटन, ४६वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष• १९६७ - जेन् सत्या नडेला, Microsoft चे सीईओ🌹 निधन :-• १९७५ - डॉ. विनायक विश्वनाथ (अप्पासाहेब) पेंडसे, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, ज्ञानप्रबोधिनी संस्थापक• १९९३ उत्पल दत्त, रंगभूमी आणि चित्रपट कलाकार• १९९३ - य. द. लोकुरकर, पत्रकार• १९९४ - लिनस कार्ल पॉलिंग, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेता रसायनशास्त्रज्ञ, अण्वस्त्रविरोधी कार्यकर्ता••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पौर्णिमा-अमावस्या आणि सण*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हवामानविभागाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता ठाणे व मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी बांधवांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी 24 तास सुरू राहणारे तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' उभारणे गरजेचे आहे, असं पत्र खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली :- येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर धरण भरले, पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NDA उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहिल्यानगर - ९ हजार विद्यार्थ्यांना जायचंय इस्त्रोला, झेडपी पाठवणार टॉपर ४२ विद्यार्थ्यांना, २० लाख निधीची तरतूद, इस्त्रोला जाण्यासाठी दिली ८९५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उत्तम सदाकाळ, शिक्षक तथा साहित्यिक 👤 डॉ. शिवा टाले, मुख्याध्यापक, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड👤 संदीपराजे गायकवाड, मुख्याध्यापक, साईबाबा प्राथमिक विद्यालय, बिलोली 👤 महेश हातझाडे 👤 मन्मथ चपळे👤 मोहन शिंदे 👤 कवयित्री अंतरा 👤 योगेश मठपती 👤 संभाजी वैराळे👤 संतोष कडवाईकर 👤 विलास वाघमारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 55*अवतीभोवती आहे लाल रान**32 पिंपळाना फक्त एकच पान**सांग भाऊ मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - Chair••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो ?२) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे ?३) अफजल खानाला कोणत्या गडाच्या पायथ्याशी मारले गेले ?४) 'संकट दूर करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) जिल्हाधिकारी २) ६२ वर्षे ३) प्रतापगड ४) विघ्नहर्ता ५) १,४५८ किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 'मीठा जहर' म्हणजे काय ? 📕 गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच 'मीठा जहर' असे म्हणतात. ॲकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात ॲकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे.पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसू येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ ग्रॅम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके ॲकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो.वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो.पोटात गेलेले विष टॅनिक ॲसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमॅगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे 'मीठा जहर' चवीला गोड, पण भयंकर.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरीदुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरीकधी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटीपाहून सेवा घर, थांबला हरी तो पाहे विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || १ ||नाम देव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगलाटाळ घेउनी तरी, चला वारकरी, तो पहा विटेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || २ ||संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाईमाझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाईविठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,रखुमाई मंदिरी ऐकली परी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसात एकमेकांप्रती आपुलकीची भावना व आदर असायला पाहिजे आणि एकमेकांच्या भावनांची कदर सुद्धा केली पाहिजे. यामुळे संवाद टिकून राहतो पण, ती भावना मर्यादित राहणे गरजेचे आहे. पण,असे न होता त्या भावनेमध्ये जास्त वाहत गेल्याने विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून संवाद साधताना मर्यादा बाळगणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धर्म म्हणजे काय ?*एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑगस्ट 2025💠 वार - श्रावण सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1D5HzBPxPQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्त्वाची घटनाक्रम :- • १८६८ – फ्रान्समध्ये पॅरिस मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातग्रस्त झाले अशी घोषणा करण्यात आली.• १९६३ – अमेरिकेतील जेम्स मेरीडिथ या कृष्णवर्णीय विद्यार्थ्याने मिसिसिपी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.• १९७७ – सोव्हिएत संघाने "सोयुझ-२४" या अंतराळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले.🎂 जन्म :- • १७७४ – मेरिवेदर लुईस, अमेरिकन शोधक.• १९०० – विजयनगरकर बाबूराव (बाबूराव पेंटर), मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व कला दिग्दर्शक.• १९१० – फ्लॉरेन्स नाईटिंगेल डेव्हिड, नामवंत ब्रिटिश गणितज्ञ.• १९३३ – रोमन पोलंस्की, प्रसिद्ध पोलिश चित्रपट दिग्दर्शक.• १९४४ – शशी देशपांडे, भारतीय इंग्रजी साहित्यिक.🌹 मृत्यू :- • १८५० – ऑनरे द बल्झाक, फ्रेंच कादंबरीकार.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९६७ – जे. रॉबर्ट ओपेनहायमर, अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन शास्त्रज्ञ.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी .......!*मनुष्याच्या जीवनातील कोणकोणते वाढदिवस खूप महत्वाचे असतात याचा मागोवा घेणारा लेख जरूर वाचा.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन NDA कडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित, 21 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, संत साहित्याचा अभ्यास न्यायदानात मार्गदर्शक ठरतो, न्यायमूर्ती जमादार यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळची ऐतिहासिक झेप, देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य, 21 ऑगस्ट रोजी होणार अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संगमेश्वरचे सुपुत्र रांगोळी कलाकार सूरज धावडे यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर :- सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन, डिव्हिजन बेंचचीही व्यवस्था, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 296 विशेष रेल्वे; ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 साठी भारतीय संघ मंगळवारी जाहीर केला जाणार, 19 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठकीची पार पडेल आणि त्यानंतर संघाची अधिकृत घोषणा केली जाईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 समधानी शेख, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 प्रा. गजानन देवकर, भाषा विभाग प्रमुख 👤 शेखर हेमके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *इंग्रजी मध्ये असा कोणता शब्द आहे ज्यात डोक्यावरील केस, वारा आणि खुर्ची हे तीन ही शब्द येतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गुलाजाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात कितीही दुःख, शल्य, वाईट गोष्टी असल्या तरी जीवनात आनंदही आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अलीकडेच कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे ?२) 'बचपन बचाव' आंदोलनाचे प्रणेते कोण ?३) मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?४) 'सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) न्या. यशवंत वर्मा २) कैलाश सत्यार्थी ३) चार ४) कल्पवृक्ष ५) वाशी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 *************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला … || धृ ||वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया … || १ ||गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे … || २ ||तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की वयाने, अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण ?*एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑगस्ट 2025💠 वार - श्रावण सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1D5HzBPxPQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्त्वाची घटनाक्रम :- • १८६८ – फ्रान्समध्ये पॅरिस मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातग्रस्त झाले अशी घोषणा करण्यात आली.• १९६३ – अमेरिकेतील जेम्स मेरीडिथ या कृष्णवर्णीय विद्यार्थ्याने मिसिसिपी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.• १९७७ – सोव्हिएत संघाने "सोयुझ-२४" या अंतराळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले.🎂 जन्म :- • १७७४ – मेरिवेदर लुईस, अमेरिकन शोधक.• १९०० – विजयनगरकर बाबूराव (बाबूराव पेंटर), मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व कला दिग्दर्शक.• १९१० – फ्लॉरेन्स नाईटिंगेल डेव्हिड, नामवंत ब्रिटिश गणितज्ञ.• १९३३ – रोमन पोलंस्की, प्रसिद्ध पोलिश चित्रपट दिग्दर्शक.• १९४४ – शशी देशपांडे, भारतीय इंग्रजी साहित्यिक.🌹 मृत्यू :- • १८५० – ऑनरे द बल्झाक, फ्रेंच कादंबरीकार.• १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.• १९६७ – जे. रॉबर्ट ओपेनहायमर, अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन शास्त्रज्ञ.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी .......!*मनुष्याच्या जीवनातील कोणकोणते वाढदिवस खूप महत्वाचे असतात याचा मागोवा घेणारा लेख जरूर वाचा.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन NDA कडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित, 21 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, संत साहित्याचा अभ्यास न्यायदानात मार्गदर्शक ठरतो, न्यायमूर्ती जमादार यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळची ऐतिहासिक झेप, देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य, 21 ऑगस्ट रोजी होणार अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संगमेश्वरचे सुपुत्र रांगोळी कलाकार सूरज धावडे यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर :- सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन, डिव्हिजन बेंचचीही व्यवस्था, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 296 विशेष रेल्वे; ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 साठी भारतीय संघ मंगळवारी जाहीर केला जाणार, 19 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठकीची पार पडेल आणि त्यानंतर संघाची अधिकृत घोषणा केली जाईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 समधानी शेख, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 प्रा. गजानन देवकर, भाषा विभाग प्रमुख 👤 शेखर हेमके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *इंग्रजी मध्ये असा कोणता शब्द आहे ज्यात डोक्यावरील केस, वारा आणि खुर्ची हे तीन ही शब्द येतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गुलाजाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात कितीही दुःख, शल्य, वाईट गोष्टी असल्या तरी जीवनात आनंदही आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अलीकडेच कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे ?२) 'बचपन बचाव' आंदोलनाचे प्रणेते कोण ?३) मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?४) 'सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) न्या. यशवंत वर्मा २) कैलाश सत्यार्थी ३) चार ४) कल्पवृक्ष ५) वाशी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 *************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला … || धृ ||वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया … || १ ||गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे … || २ ||तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की वयाने, अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण ?*एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घडामोडी :-• १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.• १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.• १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.• १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :-• १९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान• १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार• १९५४: पार्श्वगायिका हेमलता• १९५७: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील • १९६८: आप पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल• १९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला• १९७०: अभिनेता सैफ अली खान 🌹 मृत्यू • १८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय• १८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन• १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक• १९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर • १९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान• २०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा • २०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे• २०१८: भारताचे १० वे पंतप्रधान व कवी अटलबिहारी वाजपेयी• २०२२: भारतीय अभिनेते नेदुंबरम गोपी • २०२२: भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण • २०२२: भारतीय राजकारणी, खासदार रुपचंद पाल • २०२२: भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार सुभाष सिंग• २०२०: भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार चेतन प्रतापसिंग चौहान••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन ला काल 15 ऑगस्ट ला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षात आमच्या टीमने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक डोळ्यासमोर ठेवून माहिती देण्याचे काम करत आले आहे. आपण सर्व वाचकांनी देखील खूप प्रतिसाद दिलात त्यामुळे गेली 10 वर्षे सलगपणे ( कोराना काळ वगळून ) ही पोस्ट अजून ही जोमात चालू आहे. या बुलेटीनसाठी अनेकांचे हातभार लाभले, त्या सर्वांचे टीम आभार व्यक्त करते. रोज सकाळी सूर्य किरणासोबत येणारी पोस्ट म्हणून फ्रेश मॉर्निंग बुलेटिन ला ओळखले जाते. यापुढे ही उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही पोस्ट सर्वदूर पोहोचण्यासाठी सर्व Admin मंडळीनी आपल्या समूहात पोस्ट करून सहकार्य करावे. ही नम्र विनंती. ..... या समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.नासा येवतीकर, संयोजक ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, काश्मीरमध्ये ट्रेन पोहोचणे ही मोठी कामगिरी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला राज्य पातळीवर मोठा मान, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालेय शिक्षणात नवे उपक्रम येणार, छत्रपती संभाजीनगरमधील दशसूत्री उपक्रमाची मंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात, कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास शासन कटिबद्ध - पालकमंत्री झिरवाळ यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे भाषण, 103 मिनिटे, त्यांनी त्यांचाच 98 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला; 2017 मध्ये सर्वात छोटे 56 मिनिटे भाषण दिले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 25 हजार कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत, कायम सेवेसह 18 मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन, आरोग्यसेवेवर परिणाम होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देशभरात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रवीण खुमसे, MIT अंबाजोगाई 👤 सदानंद वटपलवाड👤 अशपाक सय्यद 👤 रमेश बारसमवार👤 प्रसाद कामूलवार 👤 निखिल देवेंद्र खराबे, कुही नागपूर 👤 सुभाष पालदेवार 👤 कोंगारी राम मोहन *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 53*पाच अक्षराचा एक पदार्थ**पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव**पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज**पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरमी / उष्णता ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून परमेश्वर दिसेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १५ ऑगस्ट २०२५ ला आपण कितवा 'स्वातंत्र्य दिन' सोहळा साजरा केला आहे ?२) भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल कितव्यांदा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब जिंकला ?३) 'रानकवी' म्हणून कोणत्या कवीला ओळखले जाते ?४) 'सतत निंदानालस्ती करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) औरंगजेबाची कबर कोठे आहे ? *उत्तरे :-* १) ७९ वा २) चौथ्यांदा ३) ना. धों. महानोर ४) निंदक ५) खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय चलनी नोटांमध्ये गांधीजींचे चित्र कधी आणि कुठून घेतले ?देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे योगदान कधीही विसरता येणार नाही. देशाने त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा दिला आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचे चित्र भारतीय चलनी नोटांमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की पूर्वी चलनी नोटांमध्ये गांधीजींऐवजी इतर चित्रे असायची. अनेक वर्षांपासून अशोक स्तंभ, तंजोर मंदिर, लॉयन कॅपिटल, गेट वे ऑफ इंडियाची चित्रे भारतीय चलनी नोटांवर छापली जात होती. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश नोटांवर किंग जॉर्जची चित्रे छापत असत. नोटांवर गांधीजींचे चित्र प्रथम 1969 मध्ये छापण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र नोटांवर छापले. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या सेवाग्राम आश्रमाचे चित्रही त्याच्या मागे होते. या आश्रमात गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाची 14 वर्षे व्यतीत केली होती. तथापि, नंतर त्याचे चित्र अनेक नोटांवर छापले जाऊ लागले. गांधीजींचे हे हसणारे चित्र कोठून घेतले आहे हे तुम्हाला माहिती आहे का?स्वातंत्र्यानंतरही छापले ब्रिटिश राजाचे चित्र!आजकालच्या नोटांवर छापलेल्या गांधीजींच्या चित्राबाबत जाणून घेऊ, पण त्याआधी हे जाणून घ्या की ब्रिटिशांनी भारत सोडण्यापूर्वी ब्रिटिश किंग जॉर्जचे चित्र भारतीय चलनात छापले होते. 1947 पर्यंत असे चलन देशात चालू होते. वास्तविक, ब्रिटिश किंग जॉर्जचे चित्र नोटांवर राहू नये अशी सरकार आणि सामान्य जनतेची इच्छा होती. परंतु यासाठी सरकारला थोडा वेळ हवा होता. काही काळानंतर, सरकारने किंग जॉर्जचे चित्र भारतीय चलनातून काढून टाकले आणि त्याच्या जागी सारनाथमधील लायन कॅपिटलचे चित्र लावले.गांधीजींच्या चित्रासह नोटा कधी छापल्या गेल्या ?रिझर्व्ह बँकेने 1969 मध्ये पहिल्यांदा नोटांवर गांधीजींचे चित्र स्मरणपत्र म्हणून छापले होते. त्यावेळी गांधीजींच्या चित्रासह 100 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. 1869 मध्ये जन्मलेल्या गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त हे करण्यात आले होते. सेवाग्राम आश्रमात राहताना गांधीजींचे हे चित्र काढण्यात आले. आजकाल नोटांमध्ये गांधीजींचे हसणारे चित्र असते, ते चित्र पहिल्यांदा 1987 मध्ये चलनी नोटांवर छापले गेले. ऑक्टोबर 1987 मध्ये गांधीजींच्या चित्रासह 500 रुपयांची पहिली नोट चलनात आली. तेव्हापासून त्याचे हेच चित्र इतर चलनी नोटांवरही छापले गेले.1996 मध्ये छापल्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटाकेंद्रीय बँक RBI ने 1996 मध्ये नोटमध्ये अनेक बदल केले. वॉटरमार्क बदलला. यासह, विंडोड सिक्युरिटी थ्रेड, लेटेंड प्रतिमा आणि दृश्य अपंग लोकांसाठी इंटॅग्लिओ वैशिष्ट्ये देखील जोडली गेली. आता गांधीजींच्या चित्रासह 5, 10, 20, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. या दरम्यान, अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचे चित्र लावण्यात आले आणि राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ नोटांच्या खालच्या डाव्या बाजूला स्थानांतरित करण्यात आले. तेव्हापासून या स्वरूपात नोट्स छापल्या जात आहेत.गांधीजींचे हे चित्र कुठले आहे ?नोटांवर छापलेले महात्मा गांधींचे छायाचित्र सध्याच्या राष्ट्रपती भवनात म्हणजेच 1946 मध्ये व्हाईसराय हाऊसमध्ये काढण्यात आले होते, जेव्हा गांधीजी म्यानमार म्हणजेच तत्कालीन सचिव फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तिथेच त्यांचा फोटा काढला होता. फोटो कोणी काढला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन नोटांचे रंग बरेच बदलले आहेत. पण एक गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे गांधीजींचे हसणारे चित्र.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोपाला गोपाला देवकीनंदन*गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापालाही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःच देती त्यास योग्यता देव म्हणुनी कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला !कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी यासाठी ही झिजते वाणी मी जातीचा धोबी देवा, धुवीन कपडा मळलेला !हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळी त्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको रिणकरी, कुणी न विटो नर जन्माला !••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही गोष्टी विचारपूर्वक असतील तर त्या ऐकून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्या प्रकारची मानसिकता असणे गरजेचे असते. या प्रकारची मानसिकता असल्याने बरंच काही चांगले घडून येते. आणि इतरांना ही त्यातून शिकायला मिळत असते.म्हणून कोणत्याही गोष्टींवर बोलताना त्या पासून स्वतःला ही आणि इतरांनाही काही घेता येईल अशाच विचारपूर्वक गोष्टी असायला पाहिजेत🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ*एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2025/08/independence-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.• १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.• १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.• १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.• १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.• १९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.🎂 जन्म :- • १९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर • १९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी • १९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी • १९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर🌹 मृत्यू :-• १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव• २०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर • २०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख • २०२२: भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक राकेश झुनझुनवाला • २०२२: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार विनायक मेटे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त *विचार बदला : देश बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोफत 'सूर्यघर'चा डंका, घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला 1 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा, सरकारकडून 1870 कोटींचे अनुदान मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी विषयी जनजागृती करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमरावती जिल्ह्याचा कौतुकास्पद उपक्रम, शिष्यवृत्तीच्या सरावातून स्पर्धा परीक्षेची तयारी‎, आता नियमित प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा पुढाकार, गुणवत्ता उंचावणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे स्थानकातील गर्दीचा भार होणार हलका, पर्यायी स्टेशन लवकरच सेवेत; पुणेकरांना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *SC/ST आरक्षणात 'क्रीमी लेयर' लागू करण्याची याचिका स्वीकारली, 10 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; केंद्राने लागू केले जाणार नाही म्हटले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी, मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची सांभाळणार धुरा, अजित पवारांनी दर्शवला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज ने पाकिस्तानला 202 धावाने हरविले, कर्णधार शे होप याची वादळी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर 👤 राजू टोम्पे, उपक्रमशील शिक्षक, नांदेड 👤 शंकर कळसकर, शिक्षक, देगलूर 👤 गजानन गंगाधरराव रामोड, सामाजिक कार्यकर्ते, जारीकोट 👤 पवन वळंकी👤 गजानन पाटील 👤 अहमद मुजावर 👤 राम दिगंबर होले 👤 सुनील गुडेवार 👤 मुनेश्वर सुतार 👤 गणेश इबितवार, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 52*असं काय असतं, जे मे मध्ये असतं, पण नोव्हेंबर मध्ये नसतं…आगीत असतं, पण पाण्यात नसतं…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चुंबक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या ठिकाणी कोणत्याही अपेक्षेला थारा नसतो त्याचे जीवन सुखाने दुथडी भरून वाहत असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अहिल्याबाई होळकरांना घराण्यात काय म्हणून ओळखले जाई ?२) कोणत्या तृणधान्यांमध्ये सर्वात जास्त तेल असते ?३) 'मुसाफिर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?४) 'शेती करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हायड्रोक्लोरिक आम्लाचे सूत्र काय आहे ? *उत्तरे :-* १) तत्त्वज्ञानी राणी २) मका ३) अच्युत गोडबोले ४) शेतकरी ५) HCL*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वस्त्रांसाठी धागे* 📙नैसर्गिक धाग्यांनी वस्त्रे विणण्याची कला कित्येक शतके माहिती आहे. अत्युत्तम रेशमी वा तलम कापडाचा वापर करण्याचा हव्यास जगभरच्या अनेकांनी केला आहे. थंडीसाठी विविध जनावरांची लोकर वापरली गेली आहे, तर वस्तूंच्या बांधणी साठवणीसाठी गोणपाटाचा वापर अजूनही करावाच लागतो. या प्रत्येक गोष्टीसाठी धाग्यांची आवश्यकता असते. धागा जितका पक्का, जितका सलग, जितका बारीक, तितके वस्त्र घट्ट विणले जाणार व तलम बनणार.कापूस, लिनन ज्युट यांचे धागे गरजेनुसार बनवणे व वापरणे माणूस करतच आला आहे. त्यांचे उत्पादन, साठवण व त्यापासून हाताने वा यंत्राने निर्मिती करण्याची कला दिवसेंदिवस प्रगत होत जात आज घटकेला इतकी प्रगत झाली आहे की, शेतातील कापूस काढण्यापासून ते यंत्राद्वारे कापडाचा तागा बाहेर पडेपर्यंत कुठेही मानवी स्पर्शही झाला नाही तरी अडत नाही; किंबहुना तशी गरजच राहिलेली नाही.रेशीम व सिल्कचा धागा हा रेशमाच्या किड्यांपासून बनवण्याची पद्धत आता मागे पडून कृत्रिम रेशीम वापरण्याकडे कल वाढत आहे. रेशमाच्या किड्यांची पैदास, त्यांची रोगराईपासून निगा राखणे व या रेशमाला रंग देणे यांसाठी होणारा खर्च अफाट वाढत गेला आहे, हे या मागचे कारण. लोकरी धागे व लोकरीच्या धाग्यांनी विणलेले कापड थंड प्रदेशात वापरले जाण्याचा प्रघातही हळूहळू मागे पडत आहे. त्याऐवजी लोकरीचा धागा कृत्रिम धाग्याबरोबर मिसळून त्याची ऊब व कृत्रिम धाग्याचा टिकाऊपणा यांचे सांगड हल्ली घातली जाते. कृत्रिम धागा बळकटही असतो. टेरिवुल या प्रकारचे धागे त्यामुळे वापरात आहेत.नैसर्गिक धाग्यांचा वापर वस्त्रांसाठी कमी होण्याची प्रमुख कारणे म्हणजे झटपट होणारी झीज, चकचकीतपणा कमी असणे, माल साठवण्याची त्यांची क्षमता जास्त असणे ही आहेत. याशिवाय सहजपणे हे धागे खाणारे किडे निसर्गात आहेत. त्यांचा प्रतिबंध करणे हाही एक उद्योग होऊन बसतो. ठेवणीतल्या कपड्यांना वा स्वेटर्सना कसरीचे किडे लागणे हे अनेकांनी अनुभवले असेल. उत्तम कपड्यांना पडलेली आरपार बारीक भोके कपड्यांचा पूर्ण नाश करतात व त्यांची भारी किंमत पार वाया जाते.कृत्रिम धाग्यांचा वापर मुख्यतः नायलॉन या प्रकारापासून सुरू झाला. आज त्यापुढील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नायलॉन, टेरीलीन, पॉलिएस्टर, कृत्रिम सिल्क, ऑरलॉन या धाग्यांचा वापर आज होतो आहे. पेट्रोलियम पदार्थांपासून अनेक प्रक्रिया करून हे धागे बनतात. दमटपणा शोषून घेण्याची त्यांची क्षमता फार कमी असल्याने शरीरात घाम शोषला जावा म्हणून कापडी धागा व हे कृत्रिम धागे यांचे संयुक्त कापड बनवण्याची पद्धत आहे.सुंदर, आकर्षक दिसावे, यासाठी माणसाची धडपड जोवर चालू आहे, तोवर नवनवीन धाग्यांचा शोध अजूनही चालूच राहील. म्हणतात ना, 'एक नूर आदमी, तो दस नूर कपडा !' 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीनसाई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यानसाई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||वाट असेती वळणाची आले पायाला ते फोडतुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाईतुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीनसाई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात आनंद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे सोबतच इतरांना ही आनंद देणे सर्वाचे कर्तव्य आहे. पण, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. कारण वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही आणि त्या वेळेला कोणी कितीही ताकदवान असेल तरी थांबवू शकत नाही. म्हणून वेळेची किंमत करून आपल्या जीवनाचे सार्थक कशाप्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरं बोलणाऱ्या मुलाची गोष्टएक मुलगा त्याच्या वडिलांसोबत जंगलात गेला होता. त्याला एक मोठा दगड दिसला आणि त्याने वडिलांना विचारले की हा दगड किती मोठा आहे. वडिलांनी सांगितले की हा दगड खूप मोठा आहे. मुलगा म्हणाला, "बाबा, मी त्याला उचलून दाखवतो." वडिलांनी त्याला दगड उचलण्यास सांगितले. मुलगा खूप प्रयत्न करूनही दगड उचलू शकला नाही. तेव्हा वडिलांनी सांगितले की, तू प्रयत्न करत आहेस, हेच खूप महत्त्वाचे आहे.तात्पर्य : प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, जरी यश मिळाले नाही तरी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/08/2020.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.• १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.• २००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.🎂 जन्म :- • १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी• १८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे• १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर• १९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला• १९६३: भारतीय अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी कपूर 🌹 मृत्यू :- • १७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर• १८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क• १९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर• १९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा• १९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स• १९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले• १९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे• १९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट• १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार• २०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल• २०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज• २०११: बांगलादेशी दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक तारेक मसूद••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लेख, कविता आणि लघुकथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस विभागात 15 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीस दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा, नवीन आयकरमध्ये सुधारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर घातलेली बंदी आणि त्यास उच्च न्यायालयाने दिलेला दुजोरा याला सर्वोच्च न्यायालयानेही दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गरजवंतांची सेवा करता आली; पद्मश्री पुरस्कार समाजाला बहाल- डॉ. डांगरे, नागरी सत्काराला मान्यवरांची उपस्थिती, संस्था व संघटनांकडून सन्मान‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचा असणार सहभाग, जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील आठ लाख विद्यार्थी उद्या गाणार पसायदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचे कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 53 धावाने हरविले, मालिकेत 1-1 ची बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 सुयोग पेनकर, शिक्षणतज्ञ, मुंबई 👤 चंद्रकांत पाटील जुन्नीकर, सचिव, धर्माबाद मार्केट कमिटी 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 गणेश डाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 51*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो**पण रबरासमोर मी हरतो**ओळखा पाहू मी कोण ......?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शून्यातून दुनिया निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे ?२) अवकाशात उपग्रह सोडणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते ?३) लिटमस चाचणीत निळा लिटमस कागद आम्लात बुडवल्यास त्याचा रंग कसा होतो ?४) 'शिकारीसाठी उंच बांधलेला माळा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ? *उत्तरे :-* १) शिपाई २) रशिया ३) लाल ४) मचाण ५) पं. जवाहरलाल नेहरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *कर्करोग म्हणजे काय ?* 📕‘कर्करोग' हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच गरज आहे का, ते आता पाहू.सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे, श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागांचे कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड, तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी संबंधित असतात.शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात फुप्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना हानी पोहोचते.कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, अनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत. कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे उपयुक्त ठरतात. या वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर अचानक जास्त रक्तस्त्राव होणे, स्तनामध्ये गाठ वा व्रण होणे, आवाज बदलणे वा बसणे, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्त्राव होणे इत्यादींचा समावेश होतो.कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. कर्करोग असेल म्हणून घाबरून काही लोक डॉक्टरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त निदान लवकर व्हायला हवे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थाअनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||नमो मायबापा गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहामोहजाळ माझे कोण नीरशीलतुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुरावगुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाशज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूपस्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||एका जनार्दनी गुरुपरब्रम्, तयाचे पै सदामुखी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात, हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जशास तसे एकदा एका कोल्ह्याने एका करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्यापुढे ठेवले. करकोच्याला लांब चोचीमुळे ते काही खाता येईना. कोल्ह्याने मात्र ताट चाटून पुसून लख्ख केले. बिचारा करकोचा तसाच उपाशी राहिला. थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला मेजवानीस बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंबरस घालून त्याला दिला. सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खाता येईना. करकोच्याने मात्र आपली लांब चोच खुपसून तो आंबरस संपवला. तात्पर्य - दुसर्‍याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/08/2020.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.• १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.• २००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.🎂 जन्म :- • १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी• १८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे• १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर• १९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला• १९६३: भारतीय अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी कपूर 🌹 मृत्यू :- • १७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर• १८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क• १९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर• १९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा• १९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स• १९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले• १९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे• १९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट• १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार• २०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल• २०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज• २०११: बांगलादेशी दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक तारेक मसूद••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लेख, कविता आणि लघुकथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस विभागात 15 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीस दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा, नवीन आयकरमध्ये सुधारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर घातलेली बंदी आणि त्यास उच्च न्यायालयाने दिलेला दुजोरा याला सर्वोच्च न्यायालयानेही दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गरजवंतांची सेवा करता आली; पद्मश्री पुरस्कार समाजाला बहाल- डॉ. डांगरे, नागरी सत्काराला मान्यवरांची उपस्थिती, संस्था व संघटनांकडून सन्मान‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचा असणार सहभाग, जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील आठ लाख विद्यार्थी उद्या गाणार पसायदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचे कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 53 धावाने हरविले, मालिकेत 1-1 ची बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 सुयोग पेनकर, शिक्षणतज्ञ, मुंबई 👤 चंद्रकांत पाटील जुन्नीकर, सचिव, धर्माबाद मार्केट कमिटी 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 गणेश डाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 51*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो**पण रबरासमोर मी हरतो**ओळखा पाहू मी कोण ......?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शून्यातून दुनिया निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे ?२) अवकाशात उपग्रह सोडणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते ?३) लिटमस चाचणीत निळा लिटमस कागद आम्लात बुडवल्यास त्याचा रंग कसा होतो ?४) 'शिकारीसाठी उंच बांधलेला माळा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ? *उत्तरे :-* १) शिपाई २) रशिया ३) लाल ४) मचाण ५) पं. जवाहरलाल नेहरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *कर्करोग म्हणजे काय ?* 📕‘कर्करोग' हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच गरज आहे का, ते आता पाहू.सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे, श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागांचे कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड, तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी संबंधित असतात.शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात फुप्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना हानी पोहोचते.कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, अनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत. कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे उपयुक्त ठरतात. या वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर अचानक जास्त रक्तस्त्राव होणे, स्तनामध्ये गाठ वा व्रण होणे, आवाज बदलणे वा बसणे, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्त्राव होणे इत्यादींचा समावेश होतो.कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. कर्करोग असेल म्हणून घाबरून काही लोक डॉक्टरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त निदान लवकर व्हायला हवे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थाअनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||नमो मायबापा गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहामोहजाळ माझे कोण नीरशीलतुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुरावगुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाशज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूपस्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||एका जनार्दनी गुरुपरब्रम्, तयाचे पै सदामुखी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात, हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जशास तसे एकदा एका कोल्ह्याने एका करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्यापुढे ठेवले. करकोच्याला लांब चोचीमुळे ते काही खाता येईना. कोल्ह्याने मात्र ताट चाटून पुसून लख्ख केले. बिचारा करकोचा तसाच उपाशी राहिला. थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला मेजवानीस बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंबरस घालून त्याला दिला. सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खाता येईना. करकोच्याने मात्र आपली लांब चोच खुपसून तो आंबरस संपवला. तात्पर्य - दुसर्‍याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15uxyQAb5B/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📅 विशेष दिवस :- *आंतरराष्ट्रीय युवा दिन**विश्व हत्ती दिन*🌟 महत्त्वाच्या घटना :- • १६०२ – मुघल बादशाह अकबर यांचा मंत्री अबुल फजल याची बुंदेलखंड येथे हत्या झाली.• १७६५ – इलाहाबाद तहानुसार बंगाल, बिहार व उडीसा प्रांताची दीवानी (राजस्व व प्रशासन हक्क) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली.• १८७७ – थॉमस अल्वा एडीसन यांनी फोनोग्राफ या ध्वनी रेकॉर्डिंग यंत्राचा शोध लावला.• १९५३ – सोव्हिएत संघाने आपला पहिला हायड्रोजन बॉम्ब यशस्वीरीत्या परीक्षण केला.• १९९० – अमेरिकेत सर्वाधिक जतन केलेला टायरेनोसॉरस रेक्स (Sue) या डायनासोरचा सांगाडा सापडला.🎂 जन्म :-• १९१९ – डॉ. विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक.• १९२८ – मोहम्मद अली मिर्झा, पाकिस्तानी इस्लामी विद्वान.🕯️ मृत्यु :-• १९६४ – इयान फ्लेमिंग, जेम्स बॉण्ड मालिकेचे सुप्रसिद्ध लेखक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अन्न हे पूर्णब्रह्म आहे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी; 15 ऑगस्टपासून नवी नियमावली, आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हर घर तिरंगा मोहिम अंतर्गत देशभरात तीन दिवसीय देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाची सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर, रायगडमध्ये अदिती तटकरे, तर अमरावतीमध्ये दादाजी भुसे यांच्याकडे जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे 5 नवीन विक्रम, एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान, अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल- राजेंद्र पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करण्याची मुलींना संधी, एक दिवस मुलींसाठी उपक्रम, जिल्हाधिकारी व सीईओंचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पोतन्ना लखमावाड, माजी गटशिक्षणाधिकारी, धर्माबाद 👤 वसंत हंकारे, प्रसिद्ध युवा व्याख्याते, सांगली 👤 प्राचार्य पी. एन. कोतेवार होटाळकर, श्री दत्त माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, खंडगाव 👤 दीपक कोकरे 👤 भीमा भंडारी 👤 आशिष अग्रवाल 👤 बालाजी घायाळ👤 पांडुरंग गायकवाड 👤 श्रीनिवास बिचकेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 50*सांगा पाहू**अशी कोणती वस्तू आहे**जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ऑक्सिजन व रक्त ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य व शील यांच्या संरक्षणासाठी धाव घेणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोण ओळखले जातात ?२) 'चायना कप' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?३) भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?४) 'शत्रूला सामील झालेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी भारतास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे ?*उत्तरे :-* १) संत नामदेव २) जिम्नॅस्टिक ३) पं. जवाहरलाल नेहरू ४) फितूर ५) रशिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबातुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेतफिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||आई ग अंबे माते केस सोनियाच्या ताराकेस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||ढोल वाले दादा ढोल वाजव जोरातढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||टाळ वाले दादा टाळ वाजव जोमानटाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संयम* एक कोल्हा पाण्यात पोहत असताना बराच खाली गेला व दमल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तो एका चिखलाच्या जागी जाऊन बसला. तेव्हा त्याच्या अंगावर एक मोठा माशांचा थवा आला आणि त्याला चावू लागला. जवळच बसलेल्या एका साळूने त्याला विचारले, 'मी यांना हाकलून देऊ का ?' तेव्हा कोल्हा म्हणाला, 'नको ग बाई, इतका वेळ माझं रक्त पिऊन त्याचं पोटं भरलं असेल. तेव्हा आता त्या त्रास देणार नाहीत. त्यांना जर तू हाकलून लावशील तर मात्र ताज्या दमाचा दुसरा थवा माझ्या अंगावर येईल अन् माझं रक्त शोषू लागेल त्याचं काय ?'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14Kh2PqKmFG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासातील घटना :-• 1908 – क्रांतिकारक खुदीराम बोस यांना मुजफ्फरपूर येथे फाशी देण्यात आली. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले.• 1947 – पाकिस्तानच्या संविधान सभेत मोहम्मद अली जिन्ना यांचे प्रसिद्ध भाषण; तसेच पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.• 1961 – दादरा आणि नगर हवेली यांचे भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विलयन.• 2004 – भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यर्पण करारासंदर्भातील गुन्हेगारांची यादी अदलाबदल.• 2007 – मोहम्मद हमीद अन्सारी भारताचे 12 वे उपराष्ट्रपती झाले.• 2008 – अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.🎂 जन्म :- • १८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन• १९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया• १९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे• १९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा• १९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा🌹 मृत्यू :- • १९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे• १९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर• २०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज• २०१३ : भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली• २०२२: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू - पद्मश्री जे. एस. ग्रेवाल• २०२२: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार बाबुराव पाचर्णे• २०२२: भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शिमोगा सुबन्ना• २०२२: भारतीय पटकथा लेखक रणजित पटनायक यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मन करा रे प्रसन्न*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा, 14 ऑगस्टपासून प्रवासाला सुरुवात, सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बेल्जियममध्ये गणेशोत्सवात होणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना, महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने पुण्यातून अडीच फुटांची मूर्ती बेल्जियमला रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाभार्थ्यांकडून जादा रक्कम घेताल तर परवाना रद्द करणार, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्राला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लासूर स्टेशन :- दोन लाख भाविकांनी घेतले महारुद्र मारुतीरायाचे दर्शन, साडेतीन क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारच्या मतदार यादीतून 65 लाख नावे वेगळली, निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रो गोविंदा सीझन 3 च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने उमटवली विजयाची मोहोर, 75 लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कपमध्ये शुभमन गिलला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता, लवकरच होणार संघाची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सतिश सोनवणे, संपादक, नांदेड 👤 निळकंठ चोंडे, शिक्षक नेते, नांदेड 👤 उमेश खोसे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकदत्ताहरी पाटील पवार 👤 याहीया खान पठाण, संपादक👤 आशिष देशपांडे, पत्रकार, नांदेड 👤 ओमप्रकाश कहाळेकर 👤 भास्कर कुमारे, धर्माबाद 👤 विलास सूर्यवंशी 👤 विशाल ढगे 👤 शरद सूत्रावे👤 साईप्रसाद मठपती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 49*अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फुकट मिळते**पण हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते ?**सांगा पाहू काय आहे .....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तहान ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेलच असे नाही, पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात 'इनोव्हेशन'मध्ये कोणता देश आघाडीवर आहे ?२) मानवी शरीरातील हृदयाच्या ठोक्याची संख्या किती असते ?३) देशातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली ?४) घटक राज्यांच्या बाबत धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या अधिकार कोणाला असतो ?५) आम्ल म्हणजे काय ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) ७० ते ८० ३) वडधामना ४) विधानसभा अध्यक्ष ५) आंबट चवीचे पदार्थ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विजेचे उत्पादन व वाटप *📙 आपण अलीकडे क्वचित वर्तमानपत्रात वाचतो, 'काल साऱ्या महाराष्ट्रात वीज गेली होती.' आता मनात येते की, महाराष्ट्र तर एवढा मोठा, तिथे कितीतरी वीजकेंद्रे आहेत. औष्णिक आहेत, जलविद्युत आहेत, आण्विक आहेत. मग सगळीच्या सगळी बंद पडून अख्खा महाराष्ट्र अंधारात कसा जातो ? फार पूर्वी असे नव्हते. कोयनेची वीज मुंबईला जाई. भुसावळ कोराडीचे उत्तर महाराष्ट्राला जाई. तर पुण्याला स्वतःचेच वीजकेंद्र काम करत होते. या पद्धतीत त्या त्या गावापुरते वीजनिर्मिती पुरवठा करण्याचे काम सोपवलेले असे.पण ही पद्धत महागडी होती, अनिश्चित होती. गाव वाढेल, तसतशी ही पद्धत अपुरी पडत असे. मग तेथील पुरवठा नेहमीसाठीच कमी पडे.यावर उपाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मोठी केंद्रे एकमेकांना प्रथम थेट जोडली गेली. याला 'इलेक्ट्रिक ग्रिड' किंवा 'विद्युतकेंद्रांची साखळी' असे म्हणतात. मग या साखळीतून पुढे प्रत्येक गावांकडे फाटे काढून पुरवठा केला गेला.आता समजा, तुम्ही एकमेकांचे हात धरून साखळीची शिवाशिवी खेळत आहात आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला. सर्वच मुले बदाबद पडतात की नाही ? अगदी हाच प्रकार या ग्रीडमुळे वीजकेंद्राच्या बाबतीत होतो.एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला की, ते बंद पडते. पण दुसऱ्याच्या पायात पाय घालून ते दुसऱ्यालाही ओढते. पण हा प्रकार येथेच थांबावा, यासाठी तात्काळ त्या केंद्राशी असलेला जोड आपोआप काम करण्याचे थांबवतो. याच पद्धतीत सर्व जोड काम करेनासे होतात. सर्व महाराष्ट्रात अंधार पडतो, तो असा.पण मूळ केंद्रातील बिघाड थोड्या वेळात दुरुस्त केला जातो. ते सुरू झाले की, ओळीने सर्व जोड पुन्हा काम करू लागतात. अंधारात विझत गेलेले जाळे पुन्हा उजेडात प्रकाशू लागते. संपूर्ण भारतात आता नॅशनल ग्रिडचे जाळे जोडले गेले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरा …. शंकराहे भॊळ्या शंकरा ….. महादेवाहे भॊळ्या शंकरा ….. हे भॊळ्या शंकराबेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरा – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरागळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळागळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळाआवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीत्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती …. हॊ – २ त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीभॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २ भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाची••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्याचा घमंड, संपत्तीचा मोह आणि इतर गोष्टीचा ज्याला जास्त प्रमाणात अहंकार असते ती, व्यक्ती एक दिवस मनात दु:खी असते. मात्र त्यावेळी आपले दु:ख कोणासमोर व्यक्त करू शकत नाही. त्याचे कारण असे की, जेव्हा सर्व काही त्याच्याजवळ असते त्यावेळी इतरांना तुच्छ लेखत असल्यामुळे कोणीच त्यावेळी जवळचे आपुलकीचे माणसे नसतात. म्हणून जी वस्तू शेवटपर्यंत आपली कायम राहू शकत नाही अशा गोष्टीच्या जास्त लोभात, मोहात पडू नये. कारण ते, एक दिवस दु:खाचे कारण बनत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मूर्ख कोळी* एकदा एक चिमणी माशा मारून खात होती. ते पाहून एका कोळ्याला फार राग आला. त्याला वाटले, माशा मारण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे म्हणून त्याने चिमणीभोवती जाळे विणण्यास सुरुवात केली. परंतु, ते तोडून चिमणी उडून गेली. ते पाहून तो म्हणाला, 'पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो. ते माझं काम नाही.'तात्पर्य - आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठली गोष्ट करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AkYWf7dMs/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.• १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.• १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.• १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.• १९४२: भारत छोडो दिन🎂 जन्म :- • १९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक• १९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब• १९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू• १९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी🌹 मृत्यू :- • १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे• १९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर• २००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी• २०२२: भारतीय अभिनेते प्रदीप पटवर्धन • २०२२: भारतीय राजकारणी, खासदार माया थेवर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राखी : एक अतूट बंधन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत अमेरिकेकडून शस्त्रे-विमाने खरेदी करणार नाही, संरक्षणमंत्र्यांनी वॉशिंग्टन दौरा रद्द केला; ट्रम्पच्या 50% करवाढीनंतर मोदी सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार, लष्कराला 120 आणि हवाई दलाला 80*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कर्जमाफी आणि हमीभावासाठी राज्यव्यापी आंदोलन, शेतकरी संघटनांचे एकत्रित लढ्याचे आवाहन, राजू शेट्टींचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील वाहतूक वेग प्रतितास 30 किमी करण्याचा प्रयत्न, पुढील 30 वर्षांसाठी 1 लाख 30 हजार कोटींचा विकास प्रकल्प राबवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद, महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली जिल्ह्यात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता विशेष मोहिम राबविणार मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपूरचे प्रसिद्ध गझलकार वैभव कुलकर्णी यांना गझलदीप पुरस्कार प्रदान, गझल करताना संयम आणि तटस्थता आवश्यक, गझलभान निर्माण करणे महत्त्वाचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बुद्धभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर 👤 नवाब पाशा शेख, पंचायत समिती, धर्माबाद 👤 समाधान बोरुडे 👤 शिवाजी अंबूलगेकर, अध्यक्ष, मायबोली परिषद, मुखेड 👤 विलास कोळनूरकर, शिक्षक तथा कवी, उमरी 👤 गणेश पांचाळ 👤 बालाजी तेलंग, शिक्षक, कंधार 👤 विलास पानसरे 👤 सुशीलकुमार भालके👤 ऋषिकेश जाधव👤 विलास पाटील करखेलीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*अशी कोणती गोष्ट आहे**जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेलिफोन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सुवर्णाला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे घाव सोसावे लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते इंद्रिय करते ?२) नकाशात हिरवा रंग कशासाठी वापरतात ?३) कमलापुरा हे शासकीय हत्ती संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) 'व्याख्यान देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संदेश वहनासाठी वातावरणाच्या कोणत्या थराचा उपयोग केला जातो ? *उत्तरे :-* १) मूत्रपिंड ( किडनी ) २) वनक्षेत्र ३) गडचिरोली ४) व्याख्याता ५) आयनांबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *प्लीहा म्हणजे काय ?* 📕प्लीहा हे इंद्रिय आपल्या शरीरात डाव्या बाजूला असते. छातीच्या पिंजऱ्यामध्ये छाती व पोट यांमध्ये असलेल्या डायफ्रेंम या स्नायूच्या खाली प्लीहा असते. श्वसनाबरोबर प्लीहा वरखाली होत असते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीसाठी एखाद्या लसिकाग्रंथीप्रमाणे प्लीहा कार्य करते. शरीरात कोणताही 'परकीय' पदार्थ शिरला की, प्लीहेमध्ये टी व बी प्रकारच्या लिम्फोसाईट्स (पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार होण्याचे प्रमाण वाढते. या पेशी रोगप्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत असतात. 'बी' प्रकारच्या लिम्फोसाईट्स परकीय पदार्थ वा अँटीजेनच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार करतात, तर 'टी' प्रकारच्या पेशी अँटीजेन बाबत 'स्मरणशक्ती' निर्माण करतात.प्लीहेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुखापत झालेल्या निरुपयोगी झालेल्या रक्तपेशींचा नाश करणे. याचबरोबर लाल रक्तपेशीतील हिवतापाच्या जंतूंना मारण्याचे कामही प्लीहेतील पेशी करतात. त्यामुळेच हिवतापात प्लीहेचा आकार वाढलेला असतो. प्लीहा रक्तातील एकूण रक्तबिंबीकांपैकी (प्लॅटलेट) ३० ते ४०० टक्के रक्तबिंबीका गाळून साठवून ठेवते.गर्भावस्थेत ५ व्या महिन्यापासून मूल जन्माला येईपर्यंत प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीचे कार्य होत असते. मूल जन्माला आल्यानंतर मात्र हे कार्य थांबते.कधीकधी काही रोगांमुळे प्लीहा लाल रक्तपेशींचा खूपच जास्त प्रमाणात नाश करू लागते. त्यामुळे लीहेचा आकार वाढतोच, पण त्याबरोबरच अॅनेमिया वा रक्तपांढरीही होते. अशावेळी किंवा प्लीहेमध्ये कर्करोग झाल्यास प्लीहा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग …..हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग …..लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग …..उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुलामगिरी एकदा एक कुत्रा एका सिंहाला म्हणाला, 'अरे, तुझं जीवन किती दुःखी आहे. सगळा दिवस उपाशीपोटी भक्ष्य शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून रहावं. मला तर तुझी कीवच येते. त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे, सुखी आहे.' यावर सिंहाने उत्तर दिले, 'मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. तुला वेळच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळीही सतत बाळगावी लागते. माझं तसं नाही. मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे. गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं !'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCJvnwhaW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 इतिहासातील ठळक घटना :-• १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.• १९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.• १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.• २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.🎂 जन्म :-• १९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील• १९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके• १९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी• १९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर• १९८९: भारतीय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माली🌹 मृत्यू :- • १९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे• १९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची युवा भारत म्हणून ओळख निर्माण करू या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरजू, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, कर्जमाफीसाठी समिती नियुक्त, अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मूत CRPFची गाडी 200 फूट दरीत कोसळली:उधमपूरच्या बसंतगड भागात अपघात; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NDA चा निर्णय- उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदी-नड्डा ठरवतील, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *Deep fake साठी सरकार कठोर कायदा करणार, वाढत्या धोक्यामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारने नारळी पौर्णिमा आणि जेष्ठा गौरी विसर्जनानिमित्त मुंबई व उपनगर पुरते मर्यादित सुट्टी जाहीर केली, मुंबईतील विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, बालसाहित्यिक, पुणे 👤 घनश्याम पाटील संपादक, चपराक प्रकाशन 👤 अवधूत पाटील सालेगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर 👤 अतुल उदाडे 👤 योगेश पाटील ढगे 👤 ऋषिकेश सोनकांबळे 👤 लक्ष्मण कामशेट्टी 👤 नागेश कानगुलवार 👤 रावजी मारोती बोडके 👤 संतोष वाढवे 👤 चंदू नागूल👤 संतोष हसगुंडे 👤 रवी वाघमारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 47*रिंग आहे, परंतु बोट नाही**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कणीस ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसांना कर्तव्याचा मार्ग दाखवणारा आचारधर्म म्हणजे सुधारणा. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करतो तेव्हा त्या वस्तूवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या कराला काय म्हणतात ?२) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण ?३) 'आदि पेरुक्कू' हा सण ( नदीची पूजा ) कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?४) 'विमान चालवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? *उत्तरे :-* १) टॅरिफ २) जगदीशचंद्र बोस ३) तामिळनाडू ४) वैमानिक ५) खलिल जमिल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाण कणीस*पाण कणी (रामबाण, जंगली बाजरी; हिं. पटेर, गोंड पटेर; गु. घबाजरीन; क. आपिनतैन; सं. एरका; इं. बुलरश, कॅट टेल,एलेफंट ग्रास; लॅ. टायफा अँगुस्टॅटा; कुल-टायफेसी). ही गवतासारखी दिसणारी, परंतु एकदलिकित फुलझाडांपैकी टायफेसी कुलातील व सु. १.५-३ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात आढळते. भारतात सर्वत्र दलदली जमिनीत वाढलेली आढळते. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, फार लांब, अरुंद व जाड असून पर्णतल आवरक (खोडास वेढणारा) व अर्धचितीय असतो. मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जाडजूड असून त्यावर बहुतेक पाने दोन रांगांत असतात. ह्या भूमिस्थित (जमिनीतील) बहुवर्षायू खोडावर ऑगस्ट महिन्यात लांब, सरळ व दंडगोलासारखा फुलोरा (स्थूलकणिश) येतो; तो बाजरीच्या कणसासारखा दिसतो. त्याच्या अक्षावर काही पाने येतात. फुले एकलिंगी, फार लहान, एकाच अक्षावर, लवकर गळून पडणाऱ्या महाछदाच्या बगलेत, पुं-पुष्पे वर व स्त्री-पुष्पे खाली अशी येतात. परिदले केसासारखी; पुं-पुष्पात तीन एकसंध केसरदले, क्वचित अधिक; स्त्री-पुष्पात एकच किंजदल असून किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजधर व किंजल लांबट आणि किंजल्क जिव्हिकाकृती [⟶ फूल]. बीजक एकच व लोंबते असते. कधीकधी दोन प्रकारची फुले भिन्न झाडांवर असतात. वंध्य किंजदले ही स्त्री-पुष्पात आढळतात. फळ (पकालिका) शुष्क व लहान. बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांशयुक्त), एकच व रेषांकित असते.खोडाचा व पानांचा अनेक प्रकारे उपयोग करतात. काश्मीरमध्ये चाळणी आणि झोपड्यांच्या व शिकाऱ्यांच्या छपरांकरिता उपयोग करतात; पंजाबमध्ये चटया, दोर व टोपल्या करतात. मुळे नदीकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात व त्यामुळे धूप थांबते; याकरिता ही झाडे लावली जातात. नदी पार करण्यास खोड व पाने यांच्या ‘तिन्हो’ नावाच्या तात्पुरत्या नावा करतात. फुलांपासून सिंधी लोक ‘बूर’ हा खाद्यपदार्थ बनवितात. सुकी फुले उष्णतारोधक वजनाने फार हलकी असतात. गाद्या व उशा भरण्यास ती वापरतात. मूलक्षोड स्तंभक (आकुंचन करणारे) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून कांजिण्या, हगवण व प्रमेह यांवर उपयुक्त असते. पक्व कणसातील मऊ भाग जखमेत भरल्यास जखम भरून येण्यास मदत होते.एलेफंट ग्रास हे इंग्रजी नाव दोन गवतांच्या जातींसही वापरतात. टायफा एलेफंटिना ही पाणकणसाची दुसरी जाती असून ती भारतात सामान्यपणे आढळते. तिचे उपयोग वर दिल्याप्रमाणेच आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र‌ आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बगळा व लांडगा एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्‍या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्‍याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, 'तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?'तात्पर्य- दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1ZkQKdjaYh/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०५: बंगालच्या विभाजनाविरोधात स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा.• २०१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केले.🎂 जन्म :• १८७८: जतींद्रनाथ मुखर्जी – क्रांतिकारक, 'बघा जतिन' म्हणून प्रसिद्ध.• १९४२: चेल्ला कुमार – भारतीय राजकारणी.• १९७५: चार्ली हूनॅम – इंग्रज अभिनेता ("Sons of Anarchy" प्रसिद्ध मालिका).🕯️ मृत्यू :• १९७४: वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय – क्रांतिकारक, सरोजिनी नायडू यांचे बंधू.• २०२०: बिक्रमजीत कंवरपाल – भारतीय अभिनेता आणि माजी सैन्य अधिकारी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त लेख*हातमाग उद्योगाला अच्छे दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 120 नव्या वसतिगृहाची उभारणी, 25 हजार विद्यार्थ्यांना मिळणार निवासी सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठ मोळी अभिनेत्री अमृता खानविलकरळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 302 विशेष गाड्या जाहीर, मुंबई व पुणे येथून कोकणासाठी स्पेशल ट्रेन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - 15 व्या वित्त आयोगाची रक्कम ग्रामपंचायतींना देताना भेदभाव, जि. प.कडून पाठपुरावा तरीही सरकारकडून प्रतिसाद मिळेना‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तराखंड दुर्घटना- 5 जणांचा मृत्यू, 11 सैनिकांसह 100 हून अधिक जण बेपत्ता, 400 जणांना वाचवले; केरळमधील 28 प्रवाशी बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के टॅरिफ लावले, भारतावर एकूण टॅरिफ आता 50 टक्के झाले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, कवी व साहित्यिक, नांदेड 👤 रवींद्र चातरमल, फोटोग्राफर, धर्माबाद 👤 मंगेश पेटेकर 👤 तुकडेदास डुमलवाड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 मोहन हडोळे👤 शिवाज्ञा साकोरे, दुगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 46*पाटील बुवा राम राम**दाढी मिशा लांब लांब ?**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - Keyboard••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अविरत उद्योग हा शांती- समाधानाचा अखंड पाया होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'दिशोम गुरु' असे कोणत्या आदिवासी नेत्याला ओळखले जाते ?२) नुकत्याच झालेल्या भारत - इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेचा मालिकावीर पुरस्कार कोणी पटकावला ?३) 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमात एका महिन्यात सर्वाधिक नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे कोणत्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली ?४) 'वाडवडिलांकडून मिळालेली' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) रक्तातील ऑक्सिजनचे वाहकतत्व कोणते आहे ? *उत्तरे :-* १) शिबू सोरेन २) शुभमन गिल, भारत - ७५४ धावा हॅरी ब्रूक, इंग्लंड - ४८१ धावा ३) गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ४) वडिलोपार्जित ५) हिमोग्लोबिन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕*पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वयअसताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांची देवाणघेवाण झाली की, संवाद वाढायला सुरूवात होते. त्यातून बऱ्याच अडीअडचणी, समस्या सुटत असतात. आणि एकमेकांना मदत होत असते. म्हणून एकमेकांच्या विचारांचा आदर करावा व स्नेहबंधनाचे धागे विणण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मधमाशी पोळे* एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'तात्पर्य - कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7GxTy2W4/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔥 महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना :-• 1945 – हिरोशिमा दिवस: दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर "लिटल बॉय" नावाची अणुबॉम्ब टाकला. या भीषण घटनेत लाखो लोक मृत्युमुखी पडले व ही मानवतेसाठी काळीकपाटी ठरली.• 1962 – जमैका या देशाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.🎂 जन्म :- • 1888 – सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग, पेनिसिलिन या प्रतिजैविक औषधाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.• 1928 – अँडी वॉरहॉल, प्रसिद्ध अमेरिकन चित्रकार आणि पॉप आर्ट चळवळीचे प्रवर्तक.🕯️ मृत्यू• 1978 – पोप पॉल सहावा, कॅथोलिक चर्चचे प्रमुख.• 2004 – रूथ एलिस, इंग्लंडमध्ये फाशी दिली गेलेली शेवटची महिला.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे असं का घडतं ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी सिनेमाला मिळणार अधिक शोज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय समिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दिवाळी नंतर; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दिल्लीत झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी पुण्यात वाहतूक बदल, 25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक रात्री बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. मनिषा मोरे 👤 गंगाधर दगडे, बिलोली 👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 दिनेश दारमोड 👤 राजेंद्र पोकलवार 👤 दीपक पाटील हिवराळे👤 गणेश धुप्पे 👤 हर्ष पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 45*माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत**तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही**सांगा पाहू मी आहे कोण…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख भारताची कितवी महिला ग्रँडमास्टर झाली ?२) श्वसनसंस्थेतील फुप्फुसाचे कार्य काय आहे ?३) भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत ?४) 'डोंगरकपारीत राहणारे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ? *उत्तरे :-* १) चौथी २) ऑक्सीजन रक्तात शोषून घेणे ३) अमित शहा ४) गिरिजन ५) मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞 ************************सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल. स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फिरत्या चाकावरती देसी मातीला आकारविठ्ठला तू वेडा कुंभार … || धृ ||माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसाराआभाळाच मग ये आकारातुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार … || १ ||घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळेमुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार … || २ ||तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशीन कळे यातून काय सांधीशीदेसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाचे मन दुखावून स्वतः आनंदीत रहाणे याला माणुसकी म्हणत नाही. बरेचदा अशा वागण्याने एखाद्याच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून कोणी सावरतात तर कोणी चुकीचे पाऊल उचलतात. म्हणून कोणाचे मन जाणता येत नसेल तर कोणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ*विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले. तो एक साधू होता. साधू बघतच चोरोबांना फार आनंद झाला. एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला,'' बेटा सुखी राहा!'' तरी चोरोबांनी साधूच्या चरणावरून डोके उचलले नाही, ''बोल, काय हवं तुला ? तू मागशील ते मी देईल.'' ''साधू महाराज , मी एक चोर आहे. मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही अस करा .'' साधूबाबांच्या गालाला खळी पडली. ते म्हणाले,' ठीक आहे ! ही घे जादूची भुकटी नाकात ओढताच तू दिसेनासा होशील, '' चोरोबा खुश झाले. चांदोबा डोईवर आला, भुकटी कमरेला खोचून ते कामगिरीला निघाला. सावकाराच घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली, खिडकीतून तिजोरी जवळ गेले. तिजोरी उघडायचे समान मेजावर ठेवले आणि साधू बाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबली . ''फड....! फड......!आ ..क शी!!'' चोरोबांना शिंकांनी अगदी हैराण केले. जानवे चाचपत सावकार उठला. दांडे सावरीत नोकर उठले..दिवे लागले... उजेडात तिजोरीशी खाट-खुट करीत असलेले चोरोबा दिसले. ताबडतोब या मंडळींनी चोराला पकडले. भोळसट चोरोबांना जादूची भुकटी चांगलीच भोवली ! कारण ती तपकीर होती . तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15T8BNngCe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घडामोडी :- • १८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.• १९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.• १९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.• १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.• १८८२: स्टँडर्ड ऑइल कंपनी (एक्सॉनमोबिल) - स्थापन झाली.• १८७४: जपान या देशाने टपाल बचत योजना सुरू केली.🎂 जन्म :- • १८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे• १८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार • १९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग • १९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष • १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा • १९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद • १९७४: भारतीय अभिनेत्री काजोल• १९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा🎂मृत्यू :- • १९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा• १९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन• १९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन • २०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज• २००१: अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका • २०२२: भारतीय नृत्यांगना गोरिमा हजारिका••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला मित्र बनवू या .........!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *PPC 2025 ने रचला इतिहास, परीक्षा पे चर्चा ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत गोंधळ, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब, विरोधकांचा फेर तपासणीवर आक्षेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *OBC आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 102 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी व घरगुती ग्राहकांसाठी 24 तास वीज, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावाने ऐतिहासिक विजय, मालिका 2-2 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पा. जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 अभिनंदन प्रचंड, पदवीधर शिक्षक, धर्माबाद 👤 भारती सावंत, लेखिका, मुंबई 👤 दत्तात्रय सितावार, कराटे मास्टर, धर्माबाद 👤 किरण सोनकांबळे 👤 देवराव कोलावाड 👤 शेख वाजीद👤 सय्यद जाफर 👤 विकास कांबळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 44*ऊन बघता मी येतो**सावली पाहता मी लाजतो**वाऱ्याचे स्पर्श होताच**मी नाहीसा होतो**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नाणे coin••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कित्येक संकटे येतात आणि जातात, परंतु या संकटांना न्याय आणि सत्याचा पाठपुरावा करीत जो सामोरा जातो तोच खरा शूर.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात किती व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे ?२) 'भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना ...आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना' या प्रसिद्ध गीताचे गीतकार कोण ?३) यकृत कोणत्या इंद्रिय संस्थेचा भाग आहे ?४) 'वनात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ? *उत्तरे :-* १) सहा - सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग २) कविवर्य सुरेश भट ३) पचनसंस्था ४) वनचर ५) आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वनस्पतींची अन्नप्रक्रिया* 📙 *************************वनस्पती व प्राणी यांत फरक काय ? या प्रश्नाची उत्तरे विविध प्रकारे पटापट दिली जातात. म्हणजे हालचाल करीत नाहीत, प्राण्यांप्रमाणे आक्रमण करीत नाहीत, आरडाओरडा करीत नाहीत वगैरे वगैरे. पण सर्वात महत्त्वाचे उत्तर सहसा कोणीच देत नाही. ते आहे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, प्राणी तसे करू शकत नाहीत. हे उत्तर पटवून घ्यायलासुद्धा अनेकदा अनेकांना जड जाते. अर्थात पटल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट वेगळी. केवळ सूर्यप्रकाशातून मिळणारी ऊर्जा, जमिनीतून पाणी व अनावश्यक नत्र पदार्थ व हवेतून कार्बन डायऑक्साइड मिळाला की, वनस्पतींची अन्नप्रक्रिया सुरू होते. त्यातूनच त्यांचे पोषण व वाढ होते. एवढेच नव्हे, तर त्या वनस्पतींवरच अन्य प्राण्यांचे उपोषण सुरू होते. ही सारी किमया वनस्पतींतील हरितद्रव्यामुळे घडते. सजीवाची उत्पत्ती झाली, तेव्हा दोन प्रकारच्या पेशी निर्माण झाल्या. एकीमध्ये हरितद्रव्य होते (Chlorophyll) व त्या पेशीला पेशीभित्तिकाही होती. ही झाली वनस्पतिज पेशी. दुसरी होती प्राणिजपेशी. तिच्या पेशीभित्तिकेमध्ये कडकपणा नव्हता. सेल्युलोज या घटकाचा त्यात अभाव होता. सूर्यप्रकाशातील किरणांतून वनस्पतींची पाने जी मुख्यत: हरितद्रव्यांनी जास्त भारीत असतात, ज्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशकिरण पडावेत, अशी त्यांची रचना असते ती उर्जा घेतात. जमिनीतून नत्र पदार्थांचे शोषण पाण्याबरोबर होतच असते. पण मुख्यतः हरितद्रव्यामुळे पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड यांपासून विविध पिष्टमय पदार्थ व शर्करांची निर्मिती होते. त्यातूनच मग वनस्पतीच्या वाढीला पोषक अशी अन्यद्रव्ये बनतात व ती योग्य जागी म्हणजे खोडात वा मुळात साठवली जातात. झाडाच्या स्वरूपाप्रमाणे मग त्यांचे नंतर रूपांतर फळे व बियांतही होत जाते.केवळ जमिनीवरील वनस्पतींतच ही प्रक्रिया घडते, असे नाही; तर पाण्यातील, समुद्रातील वनस्पतीसुद्धा याच पद्धतीने अन्न तयार करतात. यामुळेच पाण्यामध्ये जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथवरच वनस्पतींची वाढ झालेली आढळते. याखालील पातळीवर वनस्पतिजीवन आढळत नाही. जमिनीवरसुद्धा ज्या भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तेथे वनस्पतिजीवन फार वाढू शकत नाही.वनस्पती स्वतःचे अन्न तयार करताना समस्त प्राणिजीवनावर दोन प्रकारे उपकार करत असतात. एकात प्राणवायू बाहेर टाकला जात असल्याने प्राण्यांना अत्यंत आवश्यक अशा वायूचे वातावरणातील प्रमाण कायम राखले जाते, तर अनावश्यक असा, प्राण्यांनी हवेत सोडलेला कार्बन डायऑक्साइड त्यात शोषून घेत असतात. वनस्पतींची अन्नप्रक्रिया अन्न तयार करूनच थांबते, असे नव्हे; तर ज्या वेळी वनस्पती नाश पावतात, त्या वेळी त्यांच्या अवशेषांतूनसुद्धा पुन्हा वनस्पतींना उपयुक्त अशा स्वरूपाचे घटक तयार होऊन जमिनीला मिळतात. अन्नसाखळीचा वनस्पती हा एक प्रमुख घटक आहे, तो यामुळेच.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड टाळ चीपल्याचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आईआ आ आ लेकरांची सेवाकस पांग फेडू आता कस उतराईतुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाईजन्मभरी पूजा तुझ्या पाउलाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो. पण अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेणाच्या सड्याएवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते. तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये. कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा व साप* एकदा एक साप नदीच्या किनारी झोपून उन्हाचा आस्वाद घेत होता. त्यावेळी तिथे अचानकपणे एक कावळा आला व त्याने त्या विषारी सापाला आपल्या पायांच्या नखांनी घायाळ करून त्याला आपल्या नखांमध्ये घेऊन उडू लागला. त्या सापाने कावळ्याच्या पंजातून निघण्याचा खूप प्रयत्न केला. सापाने कावळ्याच्या शरीरास दंश केला व त्याच्या दंशाने कावळा जखमी झाला. तो आकाशातून थेट जमिनीवर येऊन पडला. साप कावळ्याच्या पंजातून पळ काढून निघून गेला. पण कावळ्याच्या शरीरात विष पसरल्याने तो मरणाच्या दारात आला. मग त्याने मनात विचार केला की, जर मी त्या सापाला पंजात उचलले नसते, तर आज तोच साप माझ्या मृत्यूचे कारण झाला नसता. तात्पर्य :- विचारी माणसं विचार करून कृती करतात ; परंतु अविचारी माणस कृती केल्यानंतर विचार करत बसतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16UpuAfG35/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १९४७ – भारताची पहिली महिला पोलीस अधिकारी के. हेमलता पोलीस सेवेत दाखल• १९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.• १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.• २००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.🎂 जन्म :- • १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके• १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार• १९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर• १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी• १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा🌹 मृत्यू :- • १९९७ – जी. एम. करवे, नामवंत मराठी लेखक, समीक्षक व इतिहासकार यांचे निधन.• २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला कवितेच्या जगात*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर महसूल परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरणत्मक निर्णयावर भाष्य, जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओबीसींच्या जागरासाठी नागपुरातून मंडल यात्रा, 9 ऑगष्टपासून शरद पवार करणार प्रारंभ, विदर्भातील 11 जिल्ह्यांत होणार सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी नगरपरिषदच्या हद्दीमध्ये ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली - राज्यात 03 ते 15 ऑगस्ट काळात अवयवदान पंधरवाडा, विविध उपक्रमाद्वारे होणार जनजागृती, आरोग्य विभागाचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- उल्हास-वैतरणा नदजोड प्रकल्पाचे उदघाटन, मंत्री विखे पाटील, छगन भुजबळ यांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मतदार याद्यासाठी काम करणाऱ्या बिलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात केली वाढ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंड समोर ठेवले 374 धावाचे लक्ष, इंग्लंडला विजयासाठी 35 धावाची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अहमद मुल्ला, शिक्षक, मुखेड 👤 निवेदक विठ्ठल पवार, बीड 👤 व्यंकटेश अमृतवार, उमरी 👤 गणेश गं. उदावंत 👤 शिलानंद बुद्धेवार, बिलोली 👤 अमित सूर्यवंशी👤 प्रभाकर रेब्बावार, देगलूर👤 आनंदराव आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 43*मला Head पण आहे.**मला Tail पण आहे.**पण मला Body नाही.**सांगा पाहू मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहीत होऊन केलेले आत्मसमर्पण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मॉर्निंग स्टार/इव्हिनिंग स्टार असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?२) पाण्याच्या गोठणबिंदू किती असतो ?३) अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ?४) 'लोकांचे नेतृत्व करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोल्हापूर येथे केव्हा स्थापन होणार आहे ? *उत्तरे :-* १) शुक्र २) ०° सेल्सियस ३) -११४° सेल्सिअस ४) लोकनायक ५) १८ ऑगस्ट २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *नारू म्हणजे काय ?* 📕नारू, 'नारू निर्मूलन' या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू बाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्क्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतः त्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतक्या सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायक्लोप नावाचे कीटक या अळ्यांना खातात सायक्लोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसऱ्या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायवलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायक्लोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात.९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायऱ्या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायच्या नसाव्यात. त्या पक्क्या बांधणीच्या असाव्यात. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावेप्यावे लागणाऱ्या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायक्लोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायक्लोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षापूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी … || धृ ||बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई … || १ ||पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय … || २ ||माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा … || ३ ||एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण … || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपले दु:ख इतरांना, आपली माणसं समजून सांगत असतो. पण आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ* एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन एका हरणीला यमसदन दाखविले .पण गंमत अशी की ,ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरु झाली. दोघांचाही संघर्ष समतोल सुरु होता व हे सर्व दृश्य एक कोल्हा लपून बघत होता .त्यांचे युद्ध थांबले .अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले ते एवढे थकले होते की ,त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते .या सर्व गोष्टींची खात्री करून तो कोल्हा पुढे सरकू लागला .त्याने त्या हरिणीला त्या दोघांमधून उचलून पळवून नेले .तेव्हा तो सिंह म्हणाला ,''अरे ,अरे ! काय आपलं भाग्य बघा .हा एवढा जीवाचा आटापिटा, हा त्रास कशासाठी सोसला? तर या कोल्ह्यासाठी.''तात्पर्य - दोघांच्या भांडणात कधी कधी तिसऱ्याचाच लाभ होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1XtQS8ETGz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासात आजचा दिवस:• १८५८ – ब्रिटीश संसदेमध्ये "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट" मंजूर, ज्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपवून ब्रिटीश सरकारने थेट प्रशासन सुरु केले.• १८७६ – व्हाईल्ड वेस्ट शोचे जनक "वाईल्ड बिल हिकॉक" याचा मृत्यू.• १९३२ – महात्मा गांधींनी "हरिजन" या शब्दाचा वापर पहिल्यांदा केला.• १९८० – भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय.🎖️ जन्म :• १९२४ – जेम्स बाल्डविन, अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता.• १९७५ – सनी देओल, बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी.🕯️ पुण्यतिथी :• १९२२ – सर एडवर्ड हेनरी, भारतीय पोलिस सेवेतील "फिंगरप्रिंट सिस्टीम"चे जनक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी अप्रगत का राहतो...?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन, अण्णा भाऊंच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं असून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यरत होणार, नोटिफिकेशन जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची खास भेट, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्तम अभिनेतेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकोला - घरोघर येणाऱ्या घंटागाडी चालकाला द्यावा लागेल आता 50 रुपये महिना, महानगर पालिकेचा दरमहा लाख रुपयांचा खर्च वाचणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामान्यात दुसऱ्या दिवशी भारत 224 धावावर सर्वबाद तर इंग्लंड सर्वबाद 247 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, पत्रकार संघटना अध्यक्ष, धर्माबाद 👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार 👤 आनंद पाटील धानोरकर 👤 दयानंद भूत्ते 👤 दुर्गा डांगे 👤 प्रतिक गाडे 👤 शिलानंद गायकवाड 👤 रवींद्र वाघमारे 👤 काशिनाथ उशलवार, धर्माबाद 👤 कैलास बी. चांदोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग आहे माझा काळा**उजेडात मी दिसते**अंधारात मी लपते**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेबल, खुर्ची, पलंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाहीतर त्या कामाच्या चांगुलपणाला बट्टा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होणार आहे ?२) भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणार आहे ?३) राष्ट्रीय सहकार धोरण - २०२५ कधी जाहीर करण्यात आले ?४) 'लोकांचा आवडता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) शाश्वत शेती दिन २) सन २०३५ ३) २४ जुलै २०२५ ४) लोकप्रिय ५) २९०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परागफुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील;⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकेश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक-बीजुके-पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल].पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणुंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो.बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात; म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत.एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात.परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी अॅसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षा-वरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्तपरागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] ; संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासून निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.परागकणप्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी ध्यास २४-५० μ (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो; द्विदलिकित वनस्पतींता तो २-२५० μआणि एकदलिकितांत १५ - १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५-१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११-३०० μअसा व्यासांचा पल्ला आढळतो.एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही; त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०.०००००३५ ते ०.००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते.प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा; प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात.अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात.त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते; परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात.चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात; मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रा व नोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ ||दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ ||जन सेवेपायी काया झिजवावीघाव सोसुनिया मने रिझवावीताल देऊनिया बोलतो मृदुंग …. || २ ||हरीभजनाचे सुख मी लुटावेगात गात माझे डोळे मी मिटावेनका करू कोणी माझ्या समाधीचा भंग …. || ३ ||ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाईएक एक खांब वारकरी होईकैलासीचा राणा, झाला पांडुरंग …. || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे* सातवीतला तनिष हा नकला चांगल्या करायचा. मित्रांच्या बोलण्याच्या लकबी, शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे. शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय, पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षकदिनाच्या दिवशी सगळी मूले वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते. तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला. त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या. फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, याचा विचारच त्याने केला नव्हता. सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली.तात्पर्य - नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~