✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.  १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.  २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विकासासाठी महिला सशक्तीकरण आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नाह्युल पेरेझ बिस्कियार्ट याला मिळाला बेस्ट एक्टरचा इफ्फी पुरस्कार, 120 बीपीएम सिनेमातल्या अभिनयासाठी मिळाला पुरस्कार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे नवे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक* ----------------------------------------------------- 4⃣ *समाजसेवक अण्णा हजारे 23 मार्चपासून मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार सुरु* ----------------------------------------------------- 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते झालं हैदराबाद मेट्रोचं उद्धाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्या स्थानी तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========            *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर  (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉      postal Index Number *२)  पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉      ६ *३)  भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉      १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *डोक्यातला किडा* कोणा कोणाच्या डोक्यात वळवळता किडा असतो सर्वांच्या विचारा पेक्षा त्याचा विचार बडा असतो घाई गडबडीत तो त्याचा निर्णय घेतो घाईत निर्णय घेऊन तो परेशान होतो   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात!  नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.*             ‼ *रामकृष्णहरी* ‼    🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸🌸      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची  जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*    संवाद..९४२१८३९५९०/              ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ☀☀ सर्व श्रेष्ठ बळी ☀☀ सर्व श्रेष्ठ आहे जगी बळराजाचा हा मान । चाढ्यावर मूठ सदा काढी मातीतून सोन।।      कष्ट हे आयुष्य भर      समीकरण हेत्याचे ।      राब राबून शिवारी      जगन्याला वेचायचे ।। कीरती बळीराजाची आहे जगात चौफेर  । जगने फक्त जनासाठी प्रामाणिक तो विचार  ।।       चढ ऊतार हे जीवनी       येतात हे कधी कधी  ।       मात्र बळी राजाचीअसते       हमेशा मंदीत गाधी  ।। विचाराचे ते वादळ घोंगावत राही सदा । बळी फक्त सोशीतसे कधी सँल होईल ?मूद्दा ।।       आसा माझा बळी त्याला       राजा म्हणतात सगळे  ।       मासा नाही गावला तर       ऊडून जातात हे बगळे ।। ✍ सुभाष पांचाळ, परभणी...       9822431457 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                      *वात्सल्य* एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले. माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे...' तात्पर्य -  आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment