✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म. १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. 💥 जन्म :- १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन. १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *बकिंघमशायर : आयल्सबरी जवळील वाडेसडोन टेकड्यावर एका विमानाची हेलिकॉप्टरसोबत हवेत टक्कर झाल्याने अनेक जण ठार* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : अयोध्या प्रकरणात सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास आहे, मी सकारात्मक दृष्टीने बघतो - श्री श्री रविशंकर* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : आॅनलाइन नोंदणी व इतर जाचक अटींमुळे शेतक-यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे फिरवली पाठ, १७ दिवसांत झाली केवळ २९९० क्विंटल खरेदी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : मागण्या मान्य न झाल्यास इंटकच्या नेतृत्वातील एसटी कामगार संघटना २६ डिसेंबर रोजी संपाची नोटीस देणार; १४ जानेवारीपासून पुन्हा संपाची हाक.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या, रामचंद्र शिंदे सोलापूरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीच्या बांधकामासाठी दिली सशर्त परवानगी* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात पुजाराचा एकाकी संघर्ष, भारताच्या ५ बाद ७४ धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्ही. शांताराम* शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली. दो आँखे बारा हात, झनक झनक पायल बाजे, डॉक्टर कोटनिस की अमर कहानी, गीत गाया पत्थरोने, नवरंग, पिंजरा, शेजारी ही त्यांची काही गाजलेली प्रमुख चित्रपट आहेत. व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉. देवेंद्र फडणवीस *२). महाराष्ट्राच शालेय शिक्षणेमंत्री कोण आहेत?* 👉. विनोद तावडे *३) महाराष्ट्रा चे गृहराज्यमंत्री कोण आहेत?* 👉 दीपक केसरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरविंद काळे, सहशिक्षक पीपल्स हायस्कूल, नांदेड 👤 नितीन रायपुरे, अकोला 👤 पिराजी भूमन्ना, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "मऊ लागलं की " मऊ लागलं की लोक कोपराने खणतात जिथे नाही तिथे ते टोला हाणतात लाचारी वाटेल असा मऊपणा ही नसावा बोलण्यात अन् वागण्यात स्वाभिमान असावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ======== *गर्भाशयाच्या अंधार विवरातूनच मनुष्यप्राण्याचा जन्म होतो आणि अंधाराच्याच अथांग अवकाशात तो अखेर विलीन होतो. तरीही अंधार हा अप्रिय आणि अमंगल ठरतो, असे का? अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. आपण सहज बोलून जातो 'तो कसला सुखी? त्याच्या जीवनात नुसता अंधार आहे अंधार !' अंधाराचा सर्वच धिक्कार का करतात? समजा जगातून संपूर्ण अंधार नष्ट झाला तर...? तर विश्वनिद्रेचा नाश होईल, उजेडाचा वणवा दिसेल, जीवसृष्टीचे जीवप्राण कंठाशी येतील. पृथ्वीचा थरकंप वाढेल आणि अखेर प्रलय होईल.* *म्हणून अंधाराला समजून घेणं फार जरूरीचं आहे. तसा अंधार हा गरीब-श्रीमंत असा भेद पाळत नाही. पण उजेड पाळतो. म्हणूनच गरीबाचा मिणमिणता दिवा आणि श्रीमंताकडे दिव्यांचा झगमगाट! परंतु अंधार सर्वत्र सारखा असतो. अंधारच शाश्वत आहे, प्रकाश नाही. ब्रम्हांडाचा 90% भाग हा गर्द अंधार कणांनी भरलेला आहे. असं असूनही अंधार मानवी दुनियेत बदनाम आहे. अंधार निंदा थांबता थांबत नाही.* *'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप'* *असं पाप-पुण्याच्या मार्केटिंगमध्ये बिंबवलं जातं. पाप-पुण्य या दोन्ही बाबी ब-याच प्रमाणात समाज, प्रदेश आणि धर्मसापेक्ष आहेत. एका समाजात प्राणीहत्या पाप, तर दुस-या समाजात ते धर्माचरण. असत्य पाप आहे तर, पुण्यशिल सत्याला सुळावर चढविले जाते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या कणखर दगडावर टाकीचे घाव घालून त्याला एखाद्या देवाचे रुप देऊन देव मानून नतमस्तक होतो. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन एखादी सुंदर मूर्ती बनवून कलेचा आस्वाद घेतो. तेवढेच अंत:करणातून प्रयत्न केले तर माणसातल्या माणुसकीला जागे करुन त्यांच्यातील मनुष्यत्व जागृत करुन त्यास आदर्श माणूस घडवून निर्माण केले आणि माणुसकीचे नाते जोडलेे गेले तर तुमच्या इतके सुखाने, समाधानाने व आपुलकीचे नाते जोडण्यासाठी अधिक मदत होईल.त्यांच्याशी नाते जोडले म्हणजे परमेश्वराशी नाते जोडल्यासारखेच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता- अबोल प्रित* तिला मी जाताना सहजच पाहिले हरिणीची डोळे तिचे ह्रदयात कोरले... वाटेवर तिच्या रोज डोळे माझे खिळे बघता क्षणी तिला मन माझे डोले ... रोज त्या वाटेवर काम नव्हते काही फक्त तिला पाहण्याचा बहाणा मात्र राही... रोज असे वाटे काही जाऊन तिला भेटावे मनातील गूज तिच्या कानी हळू सांगावे... असे करता करता अनेक दिवस गेली अबोल प्रीत माझी कधी बोलकी नाही झाली मनातील भाव माझे कधीच सांगता तिला नाही आले एके दिवशी जोडीदारसह पाहताच तिला डोळे माझे पाणावले... अशी राहीली माझी अबोल प्रित समजली नाही मला प्रेमाची रित गात बसलो विरह गीत मिळाला ना माझा मीत... *सौ. सुचिता नाईक, किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्य कौटिल्य* आचार्य चाणक्याकडे म्हणे कोणीतरी एक चिनी प्रवासी आला होता. ज्यावेळी तो भेटायला आला त्यावेळी हा विष्णुगुप्त (चाणक्य कौटिल्य) लिहित बसलेला होता. त्याकाळी मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती, आपल्याला ज्ञात आहे. तेलाचे दिवे लावलेले असत. त्या तेलाच्या दिव्यामध्ये विष्णुगुप्त लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता. काही महत्वाची कागदपत्रे लिहित होता. लिहित असताना तो चिनी आला, त्याचेआचार्य चाणक्यानेस्वागत केले, त्याला बसवले, आणि मग आपल्या हातातले लेखन कार्य विष्णुगुप्ताने पूर्ण केले. पूर्ण केल्यानंतर त्याने काय केले? त्याच्यासमोर दोन दिवे होते. एक प्रज्वलित झालेला होता व एक तसाच होता. चाणक्याने प्रथम आपल्या समोरचा दिवा विझवला आणि दुसरा दिवा प्रज्वलित केला. त्यावेळी तो चिनी प्रवासी कुतुहलाने पाहू लागला. हे असे कशासाठी करतो आहे चाणक्य? त्याला असे वाटले की बहुधा भारतातील ही प्रथा असावी. पाहुणा आला की बहुधा असे करत असावेत. मग कुतुहलाने त्याने प्रश्न विचारला चाणक्याला, 'आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला की असे करावे?' एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा?. तेव्हा चाणक्य म्हणाला, 'असे नाही. मी ज्या दिव्याच्या प्रकाशात आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचे काम होते, माझ्या राष्ट्राचे काम होते आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेले होते ते राष्ट्राच्या पैशातून भरलेले आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार हा माझा व्यक्तिगत संवाद असेल. हा संवाद राष्ट्राचा नाही! ते राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला, आणि दुसऱ्यात माझ्या स्वकष्टाचे तेल घातले आहे. म्हणून तो दुसरा दिवा पेटविला.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment